ETV Bharat / health-and-lifestyle

'या' लोकांनी खाऊ नये बोकडाच्या रक्ताची भाजी

बोकडाचे रक्त अनेक पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थ आहे.अशक्तपणा तसंच स्नायूंच्या आरोग्यासाठी ते उत्तम मानलं जातं. परंतु तंज्ञांच्या मते, काही लोकांनी त्याच सेवन कमी प्रमाणात कराव.

HEALTH BENEFITS GOAT BLOOD FRY  SIDE EFFECTS OF EATING GOAT BLOOD  DR SANTHOSH JACOB  GOAT BLOOD POWER
'या' लोकांनी खाऊ नये बोकडाच्या रक्ताची भाजी (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : January 2, 2026 at 7:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

side effects of eating goat blood: आपल्यापैकी अनेकांना मांसाहारी खायला आवडते. चिकन, मटण, मासे , कोळंबी वेगवेगळ्या प्रकारे पदार्थ आपण खातो. रविवार आला की, बहुतेक घरामध्ये मांसाहारी पदार्थ खाण्याचा बेत असतो. अनेकांना बोकडाचं मटण खायला आवडते. मटणामध्ये विविधता असते. कुणाला भेजा फ्राय, पाया सूप, गोधळी तसंच बरेच लोक रक्तही शिवजवू खातात. कांदा, हिरवी मरिची आणि किसलेला नारळ घालून अनेक जण बोकडाचं ब्लड फ्राय तयार करतात. मात्र बोकडाचं रक्त खाणे खरोखर आरोग्यासाठी चांगले आहे का? डॉ. संतोष जेकब यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केलाय त्यात त्यांनी बोकडाचं रक्त खाल्ल्यानंतर काय होते ते सांगितले. चला तर जाणून घेऊया बोकडाचं रक्त खरोखरचं खाण्यायोग्य आहे की नाही.

बकरीच्या रक्ताचे आरोग्य फायदे: मानवी रक्ताप्रमाणेच, बोकडाच्या रक्तातही हिमोग्लोबिन भरपूर प्रमाणात असते. त्यात प्रथिने, लोह, व्हिटॅमिन बी 12 आणि अमिनो आम्ल भरपूर प्रमाणात आढळतात. डॉक्टर म्हणतात की, बकरीच्या रक्तात 17 प्रकारचे अमिनो आम्ल असतात. हे स्नायूंच्या वाढीस आणि शरीराच्या विविध हालचालींना मदत करते. बकरीच्या रक्तामुळे लाल रक्तपेशींची संख्या वाढते. तसंच ते अशक्तपणा रोखते. त्यात झिंक, सेलेनियम आणि फॉस्फरस सारखी इतर महत्त्वाची खनिजे देखील असतात. हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत.

HEALTH BENEFITS GOAT BLOOD FRY  SIDE EFFECTS OF EATING GOAT BLOOD  DR SANTHOSH JACOB  GOAT BLOOD POWER
'या' लोकांनी खाऊ नये बोकडाच्या रक्ताची भाजी (Getty Images)

बकरीचे रक्त खाण्याचे दुष्परिणाम: डॉक्टरांचे म्हणणं आहे की, बकरीच्या रक्तात लोहाचे प्रमाण जास्त असते. ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात लोहाची पातळी लक्षणीयरीत्या वाढू शकते. यामुळे हेमोक्रोमॅटोसिस नावाचा आजार होऊ शकतो. या आजाराचा यकृत आणि हृदयाच्या अवयवांच्या कार्यावर मोठा परिणाम होऊ शकतो. याशिवाय, जास्त प्रमाणात बकरीचे रक्त खाल्ल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. पचनाच्या समस्या असलेल्या लोकांनी ते खाण्याबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे.

HEALTH BENEFITS GOAT BLOOD FRY  SIDE EFFECTS OF EATING GOAT BLOOD  DR SANTHOSH JACOB  GOAT BLOOD POWER
'या' लोकांनी खाऊ नये बोकडाच्या रक्ताची भाजी (Getty Images)

डॉ. संतोष जेकब काय म्हणाले ते पहा?

युरिक अ‍ॅसिड असलेल्या लोकांनी काळजी घ्यावी: आजकाल अनेक लोकांना युरिक अ‍ॅसिडचा त्रास होत आहे. अशा लोकांनी जास्त प्रमाणात बकरीचे रक्त सेवन करू नये. बकरीच्या रक्तात प्युरिनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे गाउटची समस्या असलेल्यांना त्रास होतो. त्यामुळे गाउटची समस्या वाढते. तसंच यामुळे सांधेदुखीचा धोका वाढतो. म्हणूनच तज्ञांचा असा सल्ला आहे की गाउटची समस्या असलेल्या लोकांनी बोकडाचे रक्त सेवन करताना काळजी घ्यावी.

बोकडाचे रक्त शिजवताना घ्यावयाची खबरदारी: बोकडाच्या रक्तात संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून, सेवन करण्यापूर्वी ते स्वच्छ आणि चांगले शिजवले पाहिजे. कारण अशुद्ध रक्त गोळा केल्याने, ते शिजवून सेवन केल्याने संसर्ग, विषाणू आणि बॅक्टेरिया होऊ शकतात. जर ते शरीरात गेले तर ते ताप, पचन समस्या आणि इतर आरोग्य समस्या निर्माण करू शकतात. म्हणूनच हे रक्त स्वच्छपणे गोळा केले पाहिजे. तसंच, ते प्रथम उच्च तापमानावर मीठ घालून शिजवावे. यामुळे त्यातील संसर्ग, विषाणू आणि बॅक्टेरिया नष्ट होतील. तज्ञ ते तळून चांगले शिजवल्यानंतरच खाण्याचा सल्ला देतात.

बकरीचे रक्त खाण्याचे फायदे आणि दुष्परिणाम दोन्ही असू शकतात. मात्र, तज्ञांचा असा सल्ला आहे की, ते मर्यादित प्रमाणात सेवन करावं. शिवाय, ते खाताना गरम कराव. यामुळे सूक्ष्मजीव मरतात. चांगले शिजवल्यास ते पचण्यास देखील सोपे होते. कोणत्याही आरोग्य समस्या असलेल्यांनी ते सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा