ETV Bharat / health-and-lifestyle
महिलांनी आहारात समाविष्ट करा ओव्हुलेशन वाढवणारे ‘हे’ पदार्थ; नैसर्गिकरित्या वाढेल गरोदर होण्याची शक्यता
जर महिलांमध्ये अंड्यांची गुणवत्ता चांगली असेल तर ते निरोगी गर्भात विकसित होतात आणि यशस्वी गर्भधारणा घडवून येते. बऱ्याचदा, ३५ वर्षांनंतर गर्भधारणेची शक्यता कमी होते.

Published : December 16, 2025 at 7:45 PM IST
Foods to improve egg quality: अस्वास्थ्यकर जीवनशैलीमुळे प्रजनन क्षमता देखील प्रभावित होते. आजकाल महिला आणि पुरुषांमध्ये प्रजनन क्षमतेची समस्या वाढत चालली आहे. स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये वंधत्व सामान्य झालं आहे. परंतु योग्य आहार घेतला तर शरीरात चांगल्या दर्जाची अंडी तयार होतात. यामुळे इम्प्लांटेशन समस्या, गर्भपात आणि गर्भधारणा अपयशी ठरण्यास प्रतिबंध होऊ शकते. म्हणून, चांगल्या दर्जाच्या अंड्यांची खात्री करण्यासाठी तुम्हाला कोणते पदार्थ खावे हे माहित असणे आवश्यक आहे.
लग्नानंतर लवकरच मुले व्हावीत अशी अनेकांची इच्छा असते. यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांचंही आरोग्य चांगलं असलं पाहिजे. यासाठी तणावमुक्त जीवन आणि पती-पत्नीमधील संवाद या सर्व गोष्टी योग्य असाव्यात. याशिवाय, चांगले अन्न देखील खूप मदत करते. ज्याप्रमाणे अन्न हे प्रत्येक समस्येचे निराकरण आहे, त्याचप्रमाणे मुलांना जन्म देण्यात अन्नाची महत्त्वाची भूमिका असते. पुरुषांमधील शुक्राणूंच्या गुणवत्तेपासून ते महिलांमध्ये अंड्यांच्या गुणवत्तेपर्यंत, योग्य अन्न खाल्ल्याने आपल्याला योग्य मार्गाने मदत होऊ शकते. याचाच एक भाग म्हणून, डॉ. ज्योती महिलांमध्ये अंड्यांची गुणवत्ता योग्य राहण्यासाठी काही पदार्थ घेण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते, महिलांनी काय खावं हे जाणून घेऊया...

- अक्रोड आणि बदाम: अक्रोड अंड्यांची गुणवत्ता वाढविण्यास मदत करतात. कारण त्यात ओमेगा ३ फॅटी अॅसिड तसंच अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व शरीरातील जळजळ कमी करतात. त्याशिवाय, ते अंडाशयातील रक्त प्रवाह सुधारतात. तसंच ते अंड्यांच्या पेशींना नुकसान होण्यापासून बचाव करतात. अक्रोड एकूण अंड्यांच्या गुणवत्तेत मदत करतात आणि प्रजनन क्षमता वाढवण्याची शक्यता वाढवतात.

- त्याचप्रमाणे, बदाम अंड्यांची गुणवत्ता देखील सुधारतात. हे बदामामधील व्हिटॅमिन ई, निरोगी चरबी, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्समुळे होते. हे अंड्यांचे नुकसान टाळण्यास मदत करतात. तसंच बदाम खाल्ल्याने ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. दररोज 10 किंवा 15 भिजवलेले बदाम खाणे चांगले. परंतु, जर तुम्हाला पित्ताशयाचा त्रास असेल तर तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं.

- जवस आणि चिया सिड्स: जवसामध्ये ओमेगा 3 असते. ते अंड्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करते. तसंच जवसातील लिग्नान्स आणि फायबर हार्मोन्स संतुलित करतात. मानिसक पाळी निमयित करण्यासाठी देखील जवस फायदेशीर मानलं जातं. जवस महिलांमधील वंध्यत्वाची समस्या टाळते. आयव्हीएफ सारख्या उपचार घेत असलेल्या प्रत्येकासाठी जवस खूप चांगलं आहे. चिया सिड्समध्ये वनस्पती-आधारित ओमेगा 3 मुबलक प्रमाणात आढळते. त्यातील फायबर आणि खनिजे जळजळ कमी करतात. तसंच चिया सिड्स हार्मोन्स संतुलित करतात आणि प्रजनन आरोग्य सुधारतात. यामुळे अंडी निर्मिती आणि गर्भाशयाचे कार्य सुधारते.

- अॅव्होकॅडो आणि अंडी: अॅव्होकॅडोमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्ससारख्या निरोगी चरबींचे प्रमाण जास्त असते. त्यात व्हिटॅमिन ई आणि फोलेट सारखे पोषक घटक देखील असतात. एवोकॅडोचं सेवन केल्यानं हार्मोन्सचे नियमन होण्यास मदत होते. तसंच ते प्रजनन अवयवांमध्ये रक्त प्रवाह देखील वाढवतात. ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यासाठी देखील एवोकॅडो सर्वोत्तम मानला जातो. हे सर्व अंडी विकास आणि एकूण प्रजनन प्रणालीला मदत करतात. त्याचप्रमाणे, अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषक तत्वे देखील मिळतात. म्हणूनच अंड्यांना सुपरफूड म्हटलं जातं. त्यात असलेले आवश्यक जीवनसत्त्वे, प्रथिने आणि चरबी प्रजनन प्रणालीसाठी खूप चांगले असतात.

- पालक आणि ब्रोकोली: पालक अंड्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत करतो. त्यात फोलेट, लोह, अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे अ, क, ई आणि खनिजे असतात. हे सर्व ओव्हुलेशन वाढवते. तसंच यामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो. परिणामी अंड्यांच्या विकासाची आणि प्रजननक्षमतेची शक्यता वाढते. ब्रोकोलीचा विचार केला तर त्यात फोलेट देखील भरपूर प्रमाणात असते. अँटिऑक्सिडंट्स, जे अंड्यांची गुणवत्ता वाढवतात. त्यात असलेले जीवनसत्त्वे अ, क आणि के, तसेच खनिजे देखील प्रजनन आरोग्यासाठी खूप चांगले आहेत.

- बेरी आणि डार्क चॉकलेट: बेरीचे अनेक प्रकार आहेत. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी या सर्वांमध्ये चांगले अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व अंड्याची गुणवत्ता देखील सुधारतात. शिवाय, ते ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. याव्यतिरिक्त, त्यातील फोलेट फायबर प्रजनन प्रणाली सुधारते आणि ओव्हुलेशन नियंत्रित करते.
- डार्क चॉकलेट कमी प्रमाणात खाणे चांगले. त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. हे सर्व फ्री रॅडिकल्सशी लढतात आणि पुनरुत्पादक अवयवांचे कार्य सुधारतात. त्यातील मॅग्नेशियम आणि झिंक खनिजे अंड्यांची गुणवत्ता सुधारतात.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा

