ETV Bharat / health-and-lifestyle
'या' समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी चुकूनही खाऊ नये काकडी
लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच काकडी फार आवडीनं खातात. शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी काकडी उत्तम आहे. परंतु काही आरोग्य समस्या असलेल्या लोकांनी ती खाणं टाळावं.

Published : December 13, 2025 at 11:31 AM IST
who should not eat cucumber: काकडी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. काकडी काल्ल्यांने आरोग्यदायी अनेक फायदे होतात. काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी काकडी एक चांगला पर्याय असल्याचे तज्ञांचं म्हणणं आहे. काही जण काकडी थेट खातात तर काहीजण ती सॅलड, रायता, ज्यूस आणि स्मूदीच्या स्वरूपात सेवन करतात. काकडीमध्ये 95 टक्क्यांहून अधिक पाण्याचे प्रमाण असते, त्यात व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर सारख्या पोषक घटकांचा समावेश असतो. काकडी हायड्रेशन, हाडांच्या आरोग्यासाठी आणि पचनासाठी फायदेशीर असते. त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीरातील जळजळ कमी करतात.
तसंच काकडी रक्तदाब कमी करण्यास मदत करते. त्वचेच्या आरोग्यासाठी देखील काकडी उत्तम असल्याचं म्हटलं जातं. जरी काकडी खाण्याचे असंख्य फायदे असले तरी पोषणतज्ञ श्वेता शाह यांच्या मते, काही लोकांनी ती खाऊ नये. चला तर जाणून घेऊया काकडी कुणी खाऊ नये.

- कफ: आयुर्वेदानुसार, काकडीमध्ये शरीराला थंडावा देणारा प्रभाव असतो, असं पोषणतज्ञ श्वेता शाह यांचं म्हणणं आहे. यामुळे शरीरातील कफ दोष वाढू शकतो. ज्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला, श्लेष्मा, सायनस, दमा किंवा कफचा त्रास होतो त्यांनी काकडी पूर्णपणे टाळावी. या लोकांसाठी, काकडी खाल्ल्याने त्यांचे नाक बंद होऊ शकते किंवा खोकला होऊ शकतो. यामुळे समस्या आणखी वाढू शकतात. ज्यांना या समस्या आहेत त्यांनी हिवाळ्याच्या महिन्यांत काकडीपासून दूर राहणं चांगलं. सायनुसायटिस, दमा, ब्राँकायटिस किंवा जुनाट सर्दी असलेल्यांसाठी हे योग्य नसू शकते.

- कमकुवत पचनसंस्था: काकडीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. हे पचनसंस्थेसाठी खूप चांगले आहे. मात्र, संवेदनशील पचनसंस्था असलेल्यांसाठी ते योग्य नाही. काकडीमध्ये क्युकरबिटासिन असते, जे नैसर्गिकरित्या आढळणारे संयुग असते जे कडूपणा निर्माण करते. इरिटेबल बोवेल सिंड्रोम (IBS) आणि पचनाच्या समस्या असलेल्या लोकांसाठी हे चांगले नाही. याचे सेवन केल्याने गॅस, पोटफुगी किंवा अपचन यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी काकडी न खाणे किंवा कमीत कमी प्रमाणात सेवन करणं चांगलं.
- सांधेदुखी: आजकाल अनेकांना सांधेदुखीचा त्रास होतो. हिवाळ्यात या समस्या तीव्र होतात. वाढत्या थंडीमुळे सांधेदुखी सहन करणे कठीण होते. म्हणून सांधेदुखीच्या समस्या असलेल्या लोकांनी काकडी न खाणेच चांगलं असं तज्ञांचं म्हणणं आहे. आयुर्वेदानुसार, काकडीतील थंडावा वात दोष वाढवू शकतो. यामुळे काही संवेदनशील व्यक्तींमध्ये सांधेदुखी किंवा सूज येऊ शकते. ज्यांना आधीच सांधेदुखीचा त्रास आहे त्यांची स्थिती आणखी बिकट होऊ शकते.
- मूत्रमार्गाच्या समस्या: काकडीमध्ये नैसर्गिकरित्या मूत्रवर्धक गुणधर्म असतात कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते. मात्र, ज्यांना आधीच मूत्रमार्गाच्या समस्या आहेत त्यांनी काकडीचं सेवन न करणं चांगलं. कारण काकडी खाल्ल्याने समस्या वाढू शकतात. मूत्रमार्गाच्या समस्या असलेल्या लोकांनी काकडी खाऊ नये किंवा सेवन मर्यादित करावं.
- मधुमेह: काकडीमध्ये सामान्यतः कॅलरीज आणि कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते सुरक्षित आहेत. मात्र, काकडीच्या बिया इन्सुलिन किंवा ग्लुकोज कमी करणारी औषधे घेणाऱ्यांसाठी समस्या निर्माण करू शकतात. काकडीच्या बिया जास्त प्रमाणात खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. यामुळे थरथरणे, चक्कर येणे, थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो. जर तुम्हाला मधुमेह असेल आणि तुम्ही नियमितपणे काकडी खात असाल, विशेषतः बियाण्यांसह, तर अचानक हायपोग्लाइसेमिया होऊ शकतो. तज्ञ अशा लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात.
- रात्री खाऊ नका: जेवणानंतर काकडी खाण्याचा सल्ला तज्ञ अनेकदा देतात. काकडी पचायला थोडा वेळ लागतो. त्यात जास्त प्रमाणात पाण्याचे प्रमाण असल्याने रात्री वारंवार शौचालयात जावे लागू शकते. यामुळे तुमची झोप बिघडू शकते. शिवाय, काकडी शरीराला थंडावा देणारी असल्यामुळे पोषणतज्ञ श्वेता शाह म्हणतात की रात्री त्या खाणे चांगले नाही.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

