ETV Bharat / health-and-lifestyle

चुकूनही या 3 भाज्या कच्च्या खाऊ नका; पोटातून मेंदूपर्यंत पसरू शकतो संसर्ग, फोर्टिस गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा इशारा

आपण सर्वजण भाज्या खातो, परंतु काही भाज्या कच्च्या खाल्ल्या जातात. मात्र, डॉक्टरांच्या मते भाज्या कच्च्या खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. वाचा सविस्तर..,

NEVER EAT THESE 3 VEGETABLES RAW  RAW VEGETABLES DANGEROUS  DONT EAT THESE THREE VEGETABLES RAW
चुकूनही या 3 भाज्या कच्च्या खाऊ नका; पोटातून मेंदूपर्यंत पसरू शकतो संसर्ग, फोर्टिस गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्टचा इशारा (Getty Images)
author img

By ETV Bharat Health Team

Published : March 11, 2026 at 1:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

dont eat These Three vegetables raw: भाज्या खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि प्रत्येकजण आपल्याला भरपूर हिरव्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात. मात्र, अशा अनेक भाज्या आहेत ज्या आपण अनेकदा कच्च्या खातो, जसे की वाटाणे, टोमॅटो, पत्ताकोबी आणि फुलकोबी. परंतु, काही भाज्या अशा आहेत ज्या कच्च्या खाल्ल्यास आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. यामुळे तुम्ही आजारी देखील पडू शकता. तसंच यामुळे संसर्ग देखील पसरू शकतो. आपल्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये, फोर्टिस दिल्लीचे गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. शुभम वत्स यांनी अशा तीन भाज्यांबद्दल चर्चा केली आहे, ज्या कधीही कच्च्या खाऊ नयेत. ते म्हणतात की, जर तुम्ही या भाज्या कच्च्या खाल्ल्या तर तुम्हाला डॉक्टरांना भेटावच लागेल. चला तर पाहूया त्यांच्या मते कोणत्या भाज्या कच्च्या खाऊ नयेत...

कोणत्या भाज्या कच्च्या टाळाव्यात?

पालक: डॉ. शुभम म्हणतात यात पालक नंबर वन आहे. पालकामध्ये ई. कोलाय बॅक्टेरिया आणि टेपवर्म अंडी असतात, जे पालक अनेक वेळा धुतल्यानंतरही टिकून राहतात. पालक कच्चा स्वरुपात खाल्ल्याने पोटदुखी, अतिसार आणि आतड्यांसंबंधी गंभीर संसर्ग होऊ शकतो. कच्चा पालक ऑक्सलेट्स देखील असतो, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो.

फायदे काय आहेत? शिजवलेला पालक लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे. पालक जीवनसत्त्वे (के, ए, सी) आणि फोलेटचे पॉवरहाऊस आहे. त्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम आणि महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीरासाठी चांगले मानले जातात. तुम्ही पालकाची डाळ बनवू शकता आणि ती भाजी म्हणून खाऊ शकता.

NEVER EAT THESE 3 VEGETABLES RAW  RAW VEGETABLES DANGEROUS  DONT EAT THESE THREE VEGETABLES RAW
पालक (Getty Images)

पत्ताकोबी: पत्ताकोबीच्या पानांमध्ये लहान टेपवर्म अंडी असतात, जी अदृश्य असतात. बरेच लोक कोबीच्या पानांचा वापर सॅलडमध्ये करतात. जर तुम्ही ते कच्चे खाल्ले आणि त्यातील अंडी चुकून रक्तप्रवाहात गेली तर ते मेंदूच्या नसा पर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे मेंदूशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतो आणि संपूर्ण शरीरात संसर्ग देखील पसरू शकतो. कोबीशी संबंधित काही प्रकरणे आधीच नोंदवली गेली आहेत.

फायदे: कोबीमध्ये व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी, फोलेट (व्हिटॅमिन बी9), फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळतात. त्यात बीटा-कॅरोटीन आणि अँथोसायनिन्स देखील असतात, जे जळजळ कमी करण्यास मदत करतात आणि हृदयासाठी चांगले आहेत.

NEVER EAT THESE 3 VEGETABLES RAW  RAW VEGETABLES DANGEROUS  DONT EAT THESE THREE VEGETABLES RAW
पत्तागोबी (Getty Images)

वांगी: वांग्याची करी किंवा भरीत हा एक लोकप्रिय पर्याय आहे. आपल्यापैकी क्वचितच लोक वांगी कच्च्या स्वरुपात खात असणार. परंतु जर जे लोक ते खात असतील तर त्यात सोलानाइन विषारी पदार्थ असतात. या विषारी पदार्थांमुळे उलट्या, अतिसार आणि पोटात संसर्ग होऊ शकतो. वांगी शिजवल्याने सोलानाइन नष्ट होते, ज्यामुळे ते फायदेशीर ठरते.

फायदे: वांग्यामध्ये फायबर, पोटॅशियम आणि महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स (जसे की नासुनिन) भरपूर प्रमाणात आढळते, जे हृदय आणि पचनासाठी चांगले मानले जातात. वांगी खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहण्यास देखील मदत होते. त्यात जीवनसत्त्वे बी6, सी, के आणि ए मुबलक प्रमाणात आढळते.

NEVER EAT THESE 3 VEGETABLES RAW  RAW VEGETABLES DANGEROUS  DONT EAT THESE THREE VEGETABLES RAW
वांगी (Getty Images)

हेही वाचा