ETV Bharat / health-and-lifestyle
चिकन की मटण; मधुमेह ग्रस्तांनी काय खावं? जाणून घ्या तज्ञांचं मत
मधुमेही रूग्णांना आहाराची योग्य काळजी घेणं महत्वाचं आहे. साखरेच्या श्रेणीत येणारी कोणतीही गोष्ट त्यांनी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. वाचा सविस्तर..,

Published : December 27, 2025 at 1:39 PM IST
which meat better for diabetes: आजकाल मधुमेह खूप सामान्य झाला आहे. हा एक असा आजार आहे ज्यामध्ये शरीर पुरेसे इन्सुलिन हार्मोन तयार करू शकत नाही. भारतात मधुमेहाचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. मधुमेहावर कायमस्वरूपी उपचार नाही. जीवनशैलीत बदल करून आणि खाण्यापिण्याव कंट्रोल करून हे नियंत्रित केलं जाऊ शकतं. थोडक्यात, मधुमेह असलेल्या लोकांना निरोगी जीवनशैलीसोबतच निरोगी खाण्याच्या सवयींची देखील आवश्यकता असते.
आता, बरेच लोक मांसाहारी पदार्थ खाणं पसंत करतात. रविवार आला की बरेच लोक चिकन किंवा मटण खातात. परंतु मधुमेहाच्या रुग्णांनी ते खात असलेल्या अन्नाबद्दल काळजी घेतली पाहिजे. मधुमेहाच्या रुग्णांनी कार्बोहायड्रेट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स कमी प्रमाणात सेवन करावेत. तसेच चिकन किंवा मटण यापैकी काय खावे आणि त्यांच्यासाठी कोणते चांगले आहे हे अनेकांना माहित नसते. डॉ. राजेंद्र यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर चिकन आणि मटण खाण्याबाबद काही गोष्टी शेअर केल्या. ती संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

- लाल मांस: साधारणपणे, डुकराचे मांस, गोमांस, बकरी आणि कोकरू हे लाल मांसात मोडते. भारतात मटण हे सर्वात लोकप्रिय मांस आहे. मटण म्हणजे कोकरू किंवा बकरीचे मांस असू शकते. मटणामध्ये लोह, जस्त, फॉस्फरस, रिबोफ्लेविन, थायामिन आणि व्हिटॅमिन बी१२ सारखे पोषक घटक असतात. जास्त प्रमाणात लाल मांस खाल्ल्याने मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो. हे त्यात असलेल्या संतृप्त चरबीमुळे होते. लाल मांसातील सोडियम आणि नायट्रेट्समुळे इन्सुलिन प्रतिरोध आणि टाइप 2 मधुमेह होऊ शकतो. यामुळे जळजळ होते. ज्यामुळे काही प्रकारचे कर्करोग होऊ शकतात. परंतु, मटणाच्या बाबतीत हे धोके कमी होतात.

- मधुमेही लोक मटण खाऊ शकतात का? इतर लाल मासांपेक्षा कोकरू किंवा बकरीचं मांस प्रत्यक्षात जास्त पौष्टिक असते. म्हणून बकरीचं मांस हे इतर लाल मांसापेक्षा चांगला पर्याय मानले जाते. त्यात सोडियमपेक्षा जास्त पोटॅशियम असते. त्यामुळे, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी ते एक चांगला पर्याय असू शकते. परंतु, जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही कमी प्रमाणात मटण खावं असं डॉक्टरांचं मत आहे.
- चिकन: चिकन हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. म्हणूनच जगभरातील फिटनेस उत्साही लोक चिकन आवडीनं खाणं पसंत करतात. यूएस डिपार्टमेंट ऑफ अॅाग्रीकल्चर (USDA) नुसार, प्रत्येक 100 ग्रॅम चिकनमधून आपल्याला 143 कॅलरीज मिळतात. या 100 ग्रॅम चिकनमध्ये 24.11 ग्रॅम प्रथिने, 2.68 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स आणि 3.12 ग्रॅम फॅट देखील असते. इतकेच नाही तर चिकनमध्ये कॅल्शियम, लोह, सोडियम, व्हिटॅमिन ए आणि सी देखील चांगल्या प्रमाणात असतात. चिकन हे रेड मीटसाठी एक उत्तम पर्याय आहे.
- मधुमेही लोक चिकन खाऊ शकतात का? चिकनमध्ये प्रथिने जास्त असतात. त्यात चरबीचे प्रमाण खूप कमी असते. म्हणूनच मधुमेह असलेल्या लोकांसाठी चिकन हा एक उत्तम पर्याय आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, जर चिकन निरोगी पद्धतीने शिजवले तर मधुमेह असलेल्या लोकांसाठी चिकन सर्वोत्तम आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्याचे ग्लायसेमिक इंडेक्स मूल्य खूप कमी असते. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी कधीही वाढत नाही. म्हणूनच डॉक्टर म्हणतात की मधुमेह असलेले लोक चिकन खाऊ शकतात.
- मधुमेहींसाठी कोणते चांगले आहे, मटण की चिकन? बरेच लोक मटण सर्वोत्तम मानतात. मटण हे मुळात लाल मांस आहे. मधुमेहींसाठी ते आरोग्यदायी नाही. मात्र, मधुमेह असलेले लोक ते माफक प्रमाणात खाऊ शकतात. दुसरीकडे, चिकनमध्ये अशा कोणत्याही समस्या नाहीत. म्हणून मधुमेह असलेले लोक काळजी न करता चिकन खाऊ शकतात. मटण माफक प्रमाणात खावे. परंतु, दोन्ही खाताना, ते योग्यरित्या शिजवलं आहे की नाही हे लक्षात घ्यावं.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

