ETV Bharat / health-and-lifestyle
तुम्ही देखील मासिक पाळीच्या समस्येनं त्रस्त आहात काय? 'या' गोष्टी तपासणे गरजेचं
मानसिक ताणासोबतच, जास्त व्यायाम मासिक पाळीच्या समस्यांचे कारण असू शकते. वाचा सविस्तर...,

Published : February 13, 2026 at 1:56 PM IST
causes of irregular menstrual cycle: कधीकधी लवकर किंवा उशिरा मासिक पाळी येणे सामान्य आहे. मात्र, काही महिलांना नेहमी मासिक पाळी उशिरा येते. हार्मोनल असंतुलन हे त्याचं कारण मानलं जातं. परंतु तज्ञ म्हणतात की हे खरे नाही. जीवनशैलीतील बदल आणि विविध आरोग्य समस्या देखील याचं कारण असू शकतात. म्हणूनच जर तुम्हाला असं लक्षात आलं की, तुमची मासिक पाळी दर महिन्याला लवकर किंवा उशिरा येत आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच स्वत:ला काही प्रश्न विचारले पाहिजे यामुळे तुम्ही खरी समस्या ओळखून लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता आणि उपचार घेऊ शकता. चला तर अशावेळी स्वत:ला कोणते प्रश्न विचारले पाहेज ते पाहूया...
तुम्ही तणावात आहात का?: सध्या अनेक लोक लहान सहान गोष्टींवरून ताण-तणावामध्ये येतात. तज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा जेव्हा तुम्ही ताणतणावात असता तेव्हा शरीर जास्त कॉर्टिसोल तयार करते. याचा इतर संप्रेरकांच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या प्रक्रियेत, असं म्हटलं जातं की, मासिक पाळीचे नियमन करणारे ल्युटिनायझिंग हार्मोन, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या संप्रेरकांची पातळी नियंत्रणाबाहेर जाते. याचा मासिक पाळीवर परिणाम होतो आणि मासिक पाळी अनियमित होते. म्हणून, जर तुमची मासिक पाळी उशिरा येत असेल, तर तुम्ही स्वतःला विचारावे, "आपल्याला कोणत्याही गोष्टीचा ताण आहे का?" परिणामी, तुमच्या अनियमित मासिक पाळीचे कारण ताण आहे की नाही हे तुम्हाला कळेल असा सल्ला दिला जातो. क्लीव्हलँड क्लिनिकच्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की ताण मासिक पाळीवर परिणाम करतो.
हे डाएटिंगमुळे आहे का?: जेव्हा शरीराला सर्व पोषक तत्वे मिळतात, तेव्हाच हार्मोन्स योग्यरित्या कार्य करतात. परंतु, काही लोक डाएटिंगच्या नावाखाली उपाशी राहतात . याचा अर्थ असा की, शरीराला पुरेसे पोषक तत्वे आणि कॅलरीज मिळत नाहीत. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं आहे की, यामुळे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन सारख्या प्रजनन संप्रेरकांचे असंतुलन देखील होते. तज्ञ म्हणतात की, यामुळे मासिक पाळी अनियमित येते आणि विलंब होतो. म्हणूनच जर दर महिन्याला मासिक पाळी उशिरा येत असेल तर, तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केलं आहेत का? तुम्ही कॅलरीज कमी केल्या आहेत का? याबद्दलही विचार करायचा आहे. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या एका अभ्यासात असं म्हटलं आहे की, मासिक पाळीचा विकार असलेल्या महिला जास्त साखरयुक्त पदार्थ किंवा पेये खातात आणि पुरेसे पोषक तत्वे घेत नाहीत.
व्यायाम जास्त आहे का?: सहसा, जे वर्कआउट रूटीन सुरू करतात ते कमी तीव्रतेच्या साध्या व्यायामांनी सुरुवात करतात. तज्ञ म्हणतात, की काही लोक सुरुवातीला वजन लवकर कमी करण्यासाठी त्यांच्या दिनचर्येत उच्च-तीव्रतेच्या व्यायामांचा समावेश करतात. याव्यतिरिक्त काही महिला योग्यरित्या खात देखील नाहीत. परिणामी, शरीराची ऊर्जा पातळी कमी होते. याचा मासिक पाळीवर नकारात्मक परिणाम होतो. परिणामी मासिक पाळी उशिरा येते आणि काही प्रकरणांमध्ये ती थांबते. वजन कमी झाले किंवा वाढले तरीही मासिक पाळीच्या समस्या अपरिहार्य असतात. याचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळी नियंत्रित करणारे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन्समधील चढ-उतार! म्हणूनच तुमची मासिक पाळी उशिरा येत असेल. अशावेळी तुम्ही वजन आणि व्यायामाबद्दल प्रश्न विचारल्यास तुम्हाला खरे कारण समजेल.
औषधांचा परिणाम आहे का?: जे लोक बराच काळ औषधं घेतात त्यांना सुरुवातीला काही वर्षे अनियमित मासिक पाळी येऊ शकते. तज्ञांचं म्हणणं आहे की, गर्भनिरोधक गोळ्या, रक्तदाबाची औषधे, थायरॉईड-स्थूलपणाची औषधे आणि काही प्रकारच्या वेदनाशामक औषधांचा देखील मासिक पाळीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. शिवाय रक्तस्त्रावामध्ये देखील चढ-उतार निर्माण होऊ शकतो. म्हणूनच जर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीत काही बदल दिसले तर स्वतःला एक किंवा दोनदा विचारणे उचित आहे की, मी घेत असलेल्या नवीन औषधांमुळे हे होत आहे का?
तुम्हाला पुरेशी झोप मिळत आहे का?: कामाच्या ताणामुळे आणि शिफ्टमुळे आता बरेच लोक शांत झोप घेऊ शकत नाहीत . याचा आरोग्यावर परिणाम होत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. यामुळे वजन वाढणे, लठ्ठपणा आणि PCOS सारख्या समस्या उद्भवू शकतात. असं म्हटलं जातं की, दीर्घकाळ झोपेचा अभाव मासिक पाळीवर देखील नकारात्मक परिणाम करू शकतो. म्हणूनच, जेव्हा मासिक पाळी नियंत्रणाबाहेर जाते तेव्हा प्रत्येकाने स्वतःला झोपेबद्दल काही प्रश्न विचारणे उचित आहे.
तज्ञांचं म्हणणं आहे की, जीवनशैलीतील बदलांबद्दल स्वतःचे परीक्षण करून, लोक मासिक पाळी येण्यास उशीर होण्याची कारणे ओळखू शकतात. तुम्ही हे सर्व डॉक्टरांच्या लक्षात आणून दिले तर तुमच्या समस्येवर योग्य उपचार करणे सोपे होईल. परिणामी, तुमची मासिक पाळी नियमितपणे येईल आणि तुमचे आरोग्य सुधारेल.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

