ETV Bharat / health-and-lifestyle
मोमोज प्रेमींनो सावधान! जावू शकतो जीव
मोमोज आणि सोया चाप खाल्ल्याने बहीन भावाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. वाचा सविस्तर...,

Published : March 10, 2026 at 7:57 PM IST
DEATH DUE TO MOMOS CHAAP: पंजाबमधील तरन तारण येथून एक हृदयद्रावक बातमी समोर आलीय. रविवारी सकाळी दोन निष्पाप भावंडांचे मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळले. कुटुंबियांनी दिलेल्या महितीनुसार आदल्यारात्री मुलांनी फास्ट फूड( मोमोज आणि चाप) खाल्ली होती. हे खाल्ल्यानंतर त्यांना काही वेळातच उलट्या होऊ लागल्या. कुटुंबियांनी हे सामान्य समजून त्यांना उलट्याविरोधी औषध दिले. यानंतर मुलं झोपी गेली. रविवारी सकाळी पाहिल्यास ते दोघेही निळे पडले होते . रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या बातमीमुळे सर्वत्र खडबडी उडाली आहे.
मोमोजमुळे अनेक आजारांना आमंत्रण: मोमोज प्रेमींना त्याच्या गंभीर आरोग्य धोक्याबद्दल देखील माहिती असणं आवश्यक आहे. मोमोजच्या बाह्य थरात मैदा असतो. मैदा थेट आपल्या लिव्हरवर परिणाम करतो. ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. तसंच त्यात सोबत दिली जाणारी लाल चटणी देखील कमी धोकादायक नाही. लाल चटणीमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त असते. जे हृदरोग आणि रक्तदाबाचे एक मुख्य कारण आहे. तसंच मोमोज तळण्यासाठी बहुतांश दुकानदार निकृष्ट दर्जाच्या तेलाचा वापर करतात ज्यामुळे नसांमध्ये ब्लॉकेज होऊ शकते. जे आजकाल तरुणांमधील हार्ट अटॅकचे वाढण्याचे प्रमुख कारण आहे. तोंडाची चव सुधारणारे मोमोजचे सेवन दीर्घकाळ केल्याने कर्करोगासारख्या घातक आजारांचा धोका देखील वाढतो.
मोमोज खाण्याचे दुष्परिणाम
पचनक्रियेत व्यत्यय: मोमोजचा बाहेरील थर मैद्यापासून तयार केला जातो. मैदा बचण्यास वेळ लागते. तसंच ते आतड्यांना चिकटते. ज्यामुळे गॅस, आम्लता, बद्धकोष्ठता आणि जडपणा यासारख्या पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. म्हणून पोटाचे आजार असलेल्यांना मोमोजचे सेवन हानिकारक ठरू सकते.
वजन जास्त: मोमोजमध्ये कॅलरीज जास्त प्रमाणात असतात. याच्या दररोज सेवनाने वजन वाढू शकते. लठ्ठपणा ही आजकाल भेडसावणारी एक मुख्य समस्या आहे. लठ्ठपणा अनेक गंभीर आरोग्य समस्यांचे कारण ठरू शकते. म्हणून वजन कमी करणाऱ्या लोकांनी मोमोजचं सेवन टाळावं. मोमोजमध्ये चवीकरिता मोनो सोडियम ग्लूटामेट मिसळलं जातं. सोडियम ग्लूटामेटमुळे केवळ लठ्ठपनाचा धोका वाढत नाही तर घाम येणे, दुखणे, हृदय गती वाढणे, मज्जातंतू विकार यासारखे आरोग्य धोके देखील निर्माण होऊ शकतात.
हाडे पोकळ: मोमोज तयार करण्यासाठी रिफाइंड पीठ वापरले जाते. ज्यामुळे त्यात फक्त मृत स्टार्च शिल्लक राहते. हे प्रोटीन मुक्त पीठ खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होतो. तसंच त्यातील आम्लयुक्त स्वभावामुळे ते हाडांमधील कॅल्शियम शोषून घेते. ज्यामुळे हाडे कमकुवत होतात. तसंच रिफाइंड पीठ पचायला देखील कठीण असते. यामुळे ते आतडे देखील ब्लॉक करू शकते.
संसर्ग: बऱ्याच मोमोज स्टॉलवर मोमोज बाहेर धूळ आणि सूर्यप्रकाशात तयार केली जातात. तसंच वारंवार एकाच तेलात तळले जातात. त्याचबरोबर बाजारत उपलब्ध असलेल्या निकृष्ट दर्जाच्या आणि भरपूर बॅक्टेरीया असलेल्या भाज्या वापरल्या जातात. जर त्या न धूतल्यास शरीरात अनेक धोकादायक बॅक्टेरीया प्रवेश करण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला तर माहिती आहे रस्त्यावरील अन्न विक्रेत घाईगळबळीत भाज्या व्यवस्थित स्वच्छ करत नाहीत. तसंच मोमोजस्टॉलवर बऱ्याचदा स्वच्छता नसते. यामुळे बॅक्टेरीया आणि संसर्गाचा धोका वाढतो. परिणामी विषबाधा, पोटाचे आजार आणि अतिसाराची समस्या उद्भवू शकते.
धोकादायक टेपवर्मचा: व्हेज मोमोजमध्ये कोबीची स्टफिंग केली जाते. कोबी व्यवस्थित शिवजली गेली नाही तर त्यात टेपवर्मचे बीजाणू राहू शकतात. टेपवर्मची अंडी चुकून रक्तप्रवाहात गेली तर ते मेंदूच्या नसा पर्यंत पोहोचू शकतात, ज्यामुळे मेंदूशी संबंधित गंभीर आजार होऊ शकतो आणि संपूर्ण शरीरात संसर्ग देखील पसरू शकतो
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

