ETV Bharat / entertainment

यशनं वाढदिवसापूर्वी 'टॉक्सिक'मधील पोस्टर केलं रिलीज, पुन्हा एकदा मिळणार चाहत्यांना सरप्राईज

केजीएफ फेम यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटामधील पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. आता अभिनेता त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना एक भेट देणार आहे.

Toxic movie
'टॉक्सिक' चित्रपट (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 7, 2026 at 5:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : रॉकिंग स्टार यश 8 जानेवारी रोजी त्याचा 40वा वाढदिवस साजरा करणार आहे. यशनं आपल्या वाढदिवसापूर्वी म्हणजेच 7 जानेवारी रोजी त्याच्या आगामी 'टॉक्सिक' चित्रपटातील आणखी एक पोस्टर शेअर केलं आहे. आता ही त्याच्या चाहत्यांसाठी एक मोठी भेट आहे. या अभिनेत्यानं चाहत्यांना एक मोठे सरप्राईज देऊन खुश केलं आहे. 'टॉक्सिक' चित्रपटातील यशचा पोस्टर प्रदर्शित झाला असून पुन्हा उद्या सकाळी देखील प्रेक्षकांना एक सरप्राईज मिळणार आहे. 'टॉक्सिक'चा टीझर किंवा ट्रेलर उद्या प्रदर्शित होईल की नाही, याबद्दल काहीही समोर आलेलं नाही. दरम्यान यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटातील नवीन पोस्टरनं त्याच्या चाहत्यांच्या मनाचे ठोके वाढवले ​​आहेत. या चित्रपटामधील हा पोस्टर खूप दमदार आहे.

8 जानेवारी रोजी सकाळी 10:10 वाजता होईल धमाका : 'टॉक्सिक' पोस्टरमध्ये यश हा एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. तो पूर्णपणे काळ्या रंगाच्या लूकमध्ये आहे . अभिनेत्याचं लूक हृतिक रोशनच्या क्रिश लूकशीही जुळणारे आहे. आग आणि धुराच्या दरम्यान, हातात बंदूक घेऊन यशचा धाडसी लूक खूप दमदार आहे. यश या चित्रपटाद्वारे बॉक्स ऑफिसवर धमाका करेल याची खात्री आहे. या पोस्टसह, निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी एक सरप्राईज सोडले आहे. पोस्टमध्ये निर्मात्यांनी लिहिलं आहे, 'उद्या, 8 जानेवारी रोजी सकाळी 10:10 वाजता एक धमाका होईल." आता हे सरप्राईज काय असेल, हे कोणालाही माहिती नाही. कॅप्शनमध्ये असेही लिहिलं आहे की, 'त्यांनी तुम्हाला ज्या गोष्टीबद्दल इशारा दिला होता ती उघड होईल.' आता उद्या पोस्टरमागील उद्देशचा उद्या खुलासा होईल.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : 'टॉक्सिक: अ फेयरी टेल फॉर ग्रोन-अप्स' या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना खूप काही वेगळं पाहायला मिळणार आहे. आता यशच्या चाहत्यांना या चित्रपटाच्या रिलीजची थोडी वाट पाहावी लागणार आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 'धुरंधर 2' देखील त्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल. आतापर्यंत 2026मधील सर्वात मोठी टक्कर 'धुरंधर 2' आणि 'टॉक्सिक' यांच्यात होण्याची अपेक्षा आहे. 'धुरंधर' गेल्या महिन्यापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. आताही या चित्रपटाचा क्रेझ कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता लोक 'धुरंधर 2'ची देखील आतुरतेनं वाट पाहत आहेत. दरम्यान, यश चार वर्षांनी 'टॉक्सिक' घेऊन थिएटरमध्ये परतत आहे. आता, प्रेक्षकांना कोणता चित्रपट आधी पाहायचा या दुविधेचा सामना करावा लागेल. मात्र 'टॉक्सिक' या चित्रपटाच्या कमाईवर 'धुरंधर 2' मोठा परिणाम करू शकतो, असं सध्याचे चित्र दिसत आहे.

हेही वाचा :

  1. यशराज फिल्म्स बॅनरनं केलं 'धुरंधर'साठी दिग्दर्शक आदित्य धरसह त्यांच्या टीमचं कौतुक, पोस्ट व्हायरल...
  2. यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपटातील मेलिसाच्या भूमिकेतील रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक प्रदर्शित...
  3. 'टॉक्सिक'मधील तारा सुतारियाचा फर्स्ट लूक आला समोर, 'या' भूमिकेत चित्रपटात झळकणार