'रिव्हॉल्व्हर राणी'मधील किसिंग सीनदरम्यान कंगना रणौतनं वीर दासला दुखापत केल्याचा दावा सत्य ? अभिनेत्यानं केला खुलासा
'रिव्हॉल्व्हर राणी'मधील कंगना रणौत आणि वीर दासचा किसिंग सीन सध्या चर्चेत आहे. अभिनेत्याला शूटिंगदरम्यान दुखापत झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 29, 2026 at 1:12 PM IST
हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील क्वीन आणि भाजप खासदार कंगना रणौत तिच्या 2014च्या 'रिव्हॉल्वर राणी' या चित्रपटामुळं पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चित्रपटामध्ये तिच्याबरोबर वीर दास झळकला होता. ज्येष्ठ पत्रकार सिमी चंडोक यांनी नुकताच एक दावा केला आहे, ज्यामुळं सोशल मीडियावर एक जुना वाद पुन्हा पेटला आहे. सिमीनं एका पॉडकास्टमध्ये खुलासा केला की, किसिंग सीनच्या चित्रीकरणादरम्यान कंगनानं वीर दासच्या ओठांना इतक्या जोरात चावा घेतला की, त्यातून रक्त आले. या व्हायरल दाव्यावर वीर दासनं स्वतः मौन सोडला आहे. त्यानं असं सांगितलं की, अशी कोणतीही घटना कधीही घडली नाही हे स्पष्ट केलंय.
वीर दासनं दिलं स्पष्टीकरण : दरम्यान वीर दासनं रविवारी 28 जून 2026 रोजी त्याच्या एक्सवर या व्हायरल झालेल्या कथेमागील सत्य उघड केलंय. अभिनेत्यानं 'रिव्हॉल्वर राणी'च्या सेटवरील कंगनाच्या काम करण्याच्या अंदाजाचे कौतुक केले आणि तिला पूर्णपणे व्यावसायिक असल्याचं म्हटलं. सोशल मीडियावर करत असलेले दावे हे निराधार आणि अयोग्य असल्याचे सांगितले आहेत. अशी कुठलेही घटना घडली नसल्याचं त्यानं सांगितलं आहे. वीर दासनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'अनेकदा इंटरनेटवर अशा गोष्टी पसरतात, ज्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नसतो. लोक त्यांची पडताळणी न करताच त्यावर विश्वास ठेवतात. कंगनाबद्दल अयोग्य गोष्टी पसरवणे चुकीचे आहे. काही वर्षांनंतर तिनं माझ्या कॉमेडीमुळं मला दहशतवादी असल्याचं म्हटलं असले तरी, सेटवर... कोणतीही अडचण नव्हती.'
'रिव्हॉल्वर राणी'मधील किसिंग दृष्य : एका मुलाखतीत सिमी यांनी सांगितलं होतं, जर तुम्ही वीर दासला तुमच्या पॉडकास्टमध्ये आमंत्रित केलं, तर हा वेदनादायक क्षण आठवून तो कदाचित रडणार. तो कंगनाबरोबर 'रिव्हॉल्वर राणी' चित्रपटाचं शूटिंग करत होता. त्या दोघांमध्ये एक किसिंग सीन दृष्य करायचं होतं. कंगना त्या सीनमध्ये इतकी रमून गेली की तिनं वीर दासच्या ओठांना चावा घेतला. दरम्यान 2014 रोजी प्रदर्शित झालेल्या 'रिव्हॉल्वर राणी' या चित्रपटात कंगनानं अलका सिंग या वर्चस्व गाजवणाऱ्या आणि विक्षिप्त स्त्रीची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली होती. या चित्रपटामध्ये वीर दासनं रोहन कपूर या महत्त्वाकांक्षी अभिनेत्याची भूमिका केली होती. या चित्रपटाची कहाणी मध्य प्रदेशातील राजकारण आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आधारित होती. यानंतर अलका सिंग (कंगना) रोहनच्या (वीर दास) प्रेमात पडते यानंतर अनेक रोमँटिक आणि किसिंग दृश्ये दाखविण्यात आली आहे.

