ETV Bharat / entertainment

दोन्ही हात गमावल्यानंतरही 'या' 'मास्टरशेफ' स्पर्धकानी केलं परीक्षकांनी प्रभावित, व्हिडिओ व्हायरल

'मास्टरशेफ' शो सुरू झाला असून अनेक ठिकाणी ऑडिशन्स घेण्यात येत आहेत. आता एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन्ही हात नसलेला व्यक्ती स्वयंपाक बनवत आहे.

MasterChef show
'मास्टरशेफ' शो (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 7, 2026 at 4:13 PM IST

|

Updated : January 7, 2026 at 4:18 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : 'मास्टरशेफ'चा आठवा सीझन खूप गाजला होता. आता पुन्हा एकदा हा शो आपल्या नवीन सीझनसह छोट्या पडद्यावर परत येत आहे. 'मास्टरशेफ'चा 9वा सीझन सुरू झाला आहे. सध्या या शोसाठी ऑडिशन्स घेणं सुरू आहेत. आता सोशल मीडियावर एव व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. यामध्ये एका व्यक्तीनं सर्वांना आश्चर्यचकित केलं आहे. आता हा व्हिडिओ पाहून चाहते देखील खूप भावूक होत आहेत. या व्हिडिओमध्ये 'मास्टरशेफ'चे परीक्षक विकास खन्ना आणि रणवीर बरार हे देखील या व्यक्तीचं कौतुक करत आहे. आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेकजण 'मास्टरशेफ'ची आतुरतेनं वाट पाहात आहेत.

हातांशिवाय केला स्वयंपाक : नेपाळमधील काठमांडू येथे राहणारा रत्ना तमांग नावाचा स्पर्धकाचे दोन्ही हात गहाळ असून तो खूप चविष्ट स्वयंपाक बनवतो. त्यानं त्याच्या उजव्या हाताला हुकसारखे उपकरण लावले आहे. याद्वारे तो खूप वेगानं काम करू शकतो. तसेच तो वेगानं भाज्याही कापू शकतो. या शोमध्ये रत्ना तमांग आल्यानंतर त्यानं परीक्षकांना एक सुंदर पकवान बनून दाखविले. यानंतर त्यानं या पकवानची सुंदर पद्धतीनं मांडणी केली. रत्ना तमांग पकवान बनवत असताना परीक्षक देखील खूप भावूक झाले होते. आता या स्पर्धकांची अनेकजण सोशल मीडियावर कौतुक करत आहे. हातांशिवाय रत्ना तमांगनं चविष्ट पकवान बनविले.

आत्महत्या करण्याची झाली होती इच्छा : या शोमध्ये जेव्हा परीक्षकांनी रत्ना तमांगला विचारलं की, त्याच्याबरोबर काय झालं. यावर त्यानं सांगितलं की, 2015मध्ये त्याला विजेचा धक्का बसला होता. यामध्ये त्याला त्याचे दोन्ही हात कापावे लागले. रत्नानं नंतर पुढं सांगितलं की, त्याच्याकडे जीवन जगण्यासाठी फक्त तीन पर्याय होते, यात आत्महत्या करणे, दुसरा भीक मागणे आणि तिसरा स्वयंपाकाची माझी आवड चालू ठेवणे. यामध्ये त्यानं तिसरा पर्याय निवडला. रत्ना, एक स्वयंपाकी असल्याचं देखील त्यानं यावेळी सांगितलं. रत्ना तमांग हा आपल्या प्रतिभेनं आणि आवडीनं 'मास्टरशेफ या कार्यक्रमात पोहोचला आहे. रत्नानं शोमध्ये नूडल्स तयार करून परीक्षकांना भावूक केलं. परीक्षकांना त्यानं तयार केले नूडल्स खूप आवडले, त्यानंतर त्याला 'मास्टरशेफ' शोमध्ये एप्रन देण्यात आला.

Last Updated : January 7, 2026 at 4:18 PM IST