ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्नानं लग्नापूर्वी जपानी डिनरचं केलं आयोजन, विजय देवरकोंडानं स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळण्याचा घेतला आनंद

साऊथ अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या लग्नाला काही दिवस बाकी आहेत. आता या जोडप्यानं काही विशेष फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

vijay deverakonda and rashmika mandanna marriage
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचं लग्न (POSTER)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 24, 2026 at 10:58 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना हे लवकरच लग्न बेडीत अडकणार आहेत. या जोडप्यानं अलीकडेच त्यांच्या नात्याची पुष्टी केली असून 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांचा विवाह होणार आहे. या जोडप्याचं लग्न उदयपूर, राजस्थान येथे होत आहे, उदयपूर, भारतातील सेलिब्रिटींच्या लग्नासाठी सर्वात लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे. या जोडप्याचा मुख्य समारंभ 25 किमी अंतरावर असलेल्या अरावली टेकड्यांमध्ये वसलेल्या आयटीसी मोमेंटोस येथे होणार आहेत. सध्या दोघांचे कुटुंब या लग्न सोहळ्यापूर्वी आनंद घेताना दिसत आहे. लग्नापूर्वी, रश्मिकानं तिच्या मित्र आणि मैत्रिणींसाठी एक खाजगी जपानी डिनरचं आयोजन केलं. तर विजय त्याच्या मित्रांसह स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळण्याचा आनंद घेताना दिसला.

रश्मिका आणि विजयचा 'क्वालिटी टाइम' : विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर काही फोटो शेअर केले आहेत, यावरून असं दिसून येते की, लग्नाच्या विधींपूर्वी दोघेही कुटुंब आणि मित्रांबरोबर एन्जॉय करत आहेत. विजयच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या फोटोमध्ये, तो मित्रांबरोबर पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळत असल्याचा दिसत आहे. विजयनं व्हॉलीबॉल नेटच्या मागून घेतलेला एक फोटो पोस्ट केला, यात पूलमध्ये खेळाडूंच्या सावल्या आणि हवेत उडणारा चेंडू दिसत आहे. याशिवाय रश्मिका मंदान्नानेही इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटो जेवणाची झलक दाखवली. तिनं सुंदर सजवलेल्या जेवणाच्या टेबलाचा फोटो शेअर केला. फोटोमध्ये गुलाबी लिली, हिरवे हायड्रेंजिया, हिरवे सफरचंद, मेनू कार्ड, द्राक्षांनी सजवलेले आणि सोनेरी दिव्यांनी सजवलेले एक सुंदर टेबल दाखवण्यात आलं आहे.

vijay deverakonda
विजय देवरकोंडा (विजय देवरकोंडाची पोस्ट)
Rashmika mandanna
रश्मिका मंदान्ना (रश्मिका मंदान्नाची पोस्ट)
vijay deverakonda
विजय देवरकोंडा (विजय देवरकोंडाची पोस्ट)
vijay deverakonda
विजय देवरकोंडा (विजय देवरकोंडाची पोस्ट)

रश्मिका आणि विजय यांच्याबद्दल : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये अफवा पसरल्या होत्या की, रश्मिका आणि विजय दोघांनी हैदराबादमध्ये लग्न केलं आहे. आता हे जोडपे 26 फेब्रुवारी 2026 रोजी उदयपूरमध्ये लग्न करून त्यांच्या चाहत्यांना एक भेट देणार आहे. दरम्यान हा समारंभ अतिशय खाजगी असेल, ज्यामध्ये फक्त कुटुंब आणि जवळचे मित्र उपस्थित असतील अशी माहिती मिळत आहे. या जोडप्याच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं तर दोघंही 2018मध्ये 'गीता गोविंदम'च्या सेटवर पहिल्यांदा भेटले. या चित्रपटामध्ये या दोन्ही स्टार्सची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप पसंत पडली होती. या चित्रपटानंतर दोघेही एकामेकांना डेट करत असल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. यानंतर या दोघांनी 'डिअर कॉम्रेड'मध्ये काम केलं. या चित्रपटानंतर दोघांना खूप लोकप्रियता मिळाली. या दोघांनी कधी आपल्या नात्याबद्दल काहीही सांगितलं नाही, मात्र त्यांच्या डेटिंगच्या चर्चा अनेकदा सोशल मीडियावर पसरत होत्या.

हेही वाचा :

  1. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना करणार 'या' ठिकाणी लग्न...
  2. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाच्या कथित लग्नाच्या बातमीनंतर त्यांच्या व्यवस्थापन टीमनं केलं निवेदन जारी...
  3. कार अपघातानंतर विजय देवरकोंडानं शेअर केली पोस्ट, चाहत्यांना मिळाला दिलासा...