विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नाच्या कथित लग्नाच्या बातमीनंतर त्यांच्या व्यवस्थापन टीमनं केलं निवेदन जारी...
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना हे स्टार्स लग्न करणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर समोर आल्यावर त्यांच्या व्यवस्थापन टीमनं आता एक निवेदन जारी केलंय.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 19, 2026 at 4:27 PM IST
हैदराबाद : दक्षिण भारतीय अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 26 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाच्या अफवा सोशल मीडियावर पसरत होत्या. आता या जोडप्याच्या व्यवस्थापन टीमनं गोपनीयतेची विनंती केल्यामुळं पुन्हा एकदा या दोघांच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून, या जोडप्याच्या लग्नाबद्दल काही गोष्टी समोर आल्या होत्या. या स्टार्सच्या लग्नाची अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र या दोघांच्या लग्नाचे कार्ड हे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कार्डमध्ये असे म्हटलं जात होतं की, हे जोडपे 26 फेब्रुवारी रोजी लग्न करतील आणि त्यानंतर 4 मार्च रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स येथील ताज कृष्णा हॉटेलमध्ये एक भव्य रिसेप्शन होणार असल्याची देखील माहिती समोर आली. काही यूजर्सनं निमंत्रण पत्रांवर छापलेले फोन नंबरही सार्वजनिक केले.
विजय आणि रश्मिका टीमनं केलं निवेदन जारी : यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करताना, विजय आणि रश्मिकाच्या व्यवस्थापन टीमनं एक निवेदन जारी करून चाहत्यांना आणि माध्यमांना त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती केली. टीमनं म्हटलं आहे की, 'सोशल मीडियावर लग्नाशी संबंधित वैयक्तिक माहिती शेअर करणे योग्य नाही. यामुळं पाहुण्यांना अडचण येऊ शकते. लग्न हे पूर्णपणे खाजगी प्रकरण आहे. कृपया त्यांच्या गोपनीयतेचा आदर करा.' याशिवाय टीमनं असेही स्पष्ट केलं की, काही पाहुण्यांना आधीच आमंत्रणे मिळाली होती. मात्र कार्ड आणि वैयक्तिक संपर्क तपशील लीक झाल्यामुळं गंभीर सुरक्षा चिंता निर्माण झाली आहेत. या कार्यक्रमाला चित्रपट आणि राजकीय जगतातील प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्यानं, तयारी काळजीपूर्वक आणि गोपनीयपणे केली जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशी माहिती लीक केल्यानं सुरक्षा योजना आणि व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो.
I grew up watching them, and now I’m witnessing their forever ❤️ My fangirl heart has waited for this moment 🫶🏻#VijayDeverakonda #RashmikaMandanna #Virosh pic.twitter.com/XIrq4ZF9xK
— Lilly ✨ (@therwdygirl) February 16, 2026
कुठे होऊ शकते लग्न : समारंभासाठी कडक अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. लग्नादरम्यान पाहुण्यांना फोन वापरू नये, फोटो किंवा व्हिडिओ घेऊ नये अशा सूचना आधीच देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमाशी संबंधित कोणतीही माहिती लीक होऊ नये यासाठी स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, सोनेरी दिवे आणि फुलांनी सजवलेल्या विजयच्या हैदराबाद येथील घराचे फोटो समोर आले आहेत. आता चाहत्यांचा असा विश्वास आहे की, लग्नाचा उत्सव आधीच सुरू झाले आहेत. 'गीता गोविंदम' आणि 'डिअर कॉम्रेड'मध्ये एकत्र काम केलेल्या या जोडप्याच्या नात्याबद्दलच्या अफवा बऱ्याच दिवसांपासून पसरत आहेत. या जोडप्यानं कधीही सार्वजनिकरित्या याची पुष्टी केली नाही. अनेकदा दोघेही एकत्र दिसतात. तसेच विजय किंवा रश्मिका दोघांनीही वैयक्तिकरित्या लग्नाच्या बातमीची पुष्टी केलेली नाही.
हेही वाचा :

