ETV Bharat / entertainment

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांचं मुंबईत निधन, कोकिलाबेन रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

कुकू कोहली 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत राहिले. ते 'बेताब' या चित्रपटाचे सेकंड युनिट दिग्दर्शक होते. हा चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट ठरला.

कुकू कोहली यांचं मुंबईत निधन
कुकू कोहली यांचं मुंबईत निधन (File)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 10:07 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचं आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झालं. कुकू कोहली यांनी अनेक वर्षे राज कपूर यांच्या हाताखाली काम केलं. राज कपूर यांच्याबरोबर काम करताना त्यांनी चित्रपट निर्मिती दिग्दर्शन क्षेत्रातील अनेक कौशल्ये आत्मसात केली. कुकू कोहली 30 वर्षांहून अधिक काळ चित्रपटसृष्टीत कार्यरत राहिले. ते 'बेताब' या चित्रपटाचे सेकंड युनिट दिग्दर्शक होते, या चित्रपटातून सनी देओल आणि अमृता सिंग यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं होतं. त्याच्या पदार्पणाचा हा चित्रपट गोल्डन ज्युबिली हिट चित्रपट ठरला. त्यामुळे दोघांनाही या चित्रपटानं स्टारडम मिळवून दिलं. सनी देओल आणि डिंपल कपाडिया अभिनीत त्यांचा दुसरा चित्रपट 'अर्जुन', हा चित्रपट देखील सिल्वर ज्युबिली हिट ठरला होता.

कुकू कोहली यांनी 'फूल और कांटे' चित्रपट दिग्दर्शित केला, हा चित्रपट डायमंड ज्युबिली हिट ठरला आणि अजय देवगणला त्याची वेगळी ओळख मिळवून देणारा हा चित्रपट ठरला. यानंतर, त्यांनी धर्मेंद्र अभिनीत 'कोहराम', अजय देवगण, अक्षय कुमार, करिश्मा कपूर अभिनीत 'सुहाग' आणि 'नगमा' असे चित्रपट दिग्दर्शित केले. यातील एक चित्रपट पुन्हा गोल्डन ज्युबिली हिट ठरला. 'हकीकत'मध्ये अजय देवगण आणि तब्बू यांनी भूमिका साकारल्या होत्या. या चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारांसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासह 7 श्रेणींमध्ये नामांकन मिळालं होतं. कोहली यांना त्याच चित्रपटासाठी स्क्रीन अवॉर्ड्समध्ये वर्षातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणूनही नामांकन मिळालं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट 'झुल्मी' होता, ज्यात अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी भूमिका केल्या होत्या. हा चित्रपटही सर्वत्र यशस्वी ठरला होता.

कोहली यांचा पुढचा चित्रपट 'अनारी नं. १' होता, ज्यात गोविंदाने दुहेरी भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी 'ये दिल आशिकाना' बनवला. या चित्रपटाद्वारे संगीतकार नदीम-श्रवण यांनी चित्रपटसृष्टीत पुनरागमन केलं. त्यांचा शेवटचा दिग्दर्शित चित्रपट 'वो तेरा नाम था' होता, ज्यात अर्जन बाजवा आणि कांचि कौल यांनी भूमिका केल्या होत्या.

हेही वाचा..

  1. 'राखी'च्या जाहिरातीवरून कंगना राणौतनं 'बिकिनी'बाबत केलेल्या टीकेला क्रिती सेनॉनचं चोख प्रत्युत्तर...
  2. 'गनमास्टर G9'चा टीझर रिलीज, रोमँटिक चित्रपटात इमरान हाश्मी आपल्या प्रेमासाठी लढेल...
  3. दिग्दर्शक सुजय डहाकेचा मराठी चित्रपट 'तुझ्या आयला'चा टीझर प्रदर्शित , पाहा व्हिडिओ...