ETV Bharat / entertainment

वरुण तेज कोनिडेला अभिनीत 'कोरियन कनकराजू' ओटीटीवर होईल 'या' दिवशी रिलीज...

वरुण तेज कोनिडेला स्टारर 'कोरियन कनकराजू' ओटीटी लवकरच रिलीज होणार आहे.

korean kanakaraju
'कोरियन कनकराजू' (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : September 1, 2026 at 3:36 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : वरुण तेज कोनिडेला आणि रितिका नायक अभिनीत 'कोरियन कनकराजू' चित्रपट 7 ऑगस्ट 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. मेरलापाका गांधी दिग्दर्शित हा इंडो-कोरियन हॉरर-कॉमेडी चित्रपट आता ऑनलाइन स्ट्रीम होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी आणि कुठे प्रेक्षकांना पाहायला मिळेल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

'कोरियन कनकराजू'ची कहाणी काय आहे? :' कोरियन कनकराजू'ची कहाणी कनकराजू नावाच्या एका तापट पण बेफिकीर तरुणाभोवती फिरणारी आहे. तो एक पारंपरिक भजन मंडळ चालवत असतो. याद्वारे तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. जवळच्या मोटर प्लांटमध्ये काम करणाऱ्या चैत्रा नावाच्या मुलीच्या तो प्रेमात पडतो. यानंतर तो दक्षिण कोरियाला जाण्याचं स्वप्न पाहतो, तो तिथल्या संस्कृती, के-पॉप आणि के-ड्रामामुळं खूप आकर्षित होत असतो.

कधी होणार रिलीज ? : कनकराजूच्या आयुष्य अचानक एक वळण येते, कोरियन माणसाचे अवशेष असलेले पात्र त्याच्या आयुष्यात येते. यानंतर तो एका विचित्र अपघातानंतर,त्या पात्रातील द्रव पितो आणि त्या माणसाची आत्मा त्याच्या शरीरात प्रवेश करते. जेव्हाही कोरियाचा उल्लेख होत असतो,तो उत्साहात होऊन आपली मार्शल आर्ट्स आणि तलवारबाजी दाखवतो. दरम्यान त्या कोरियन व्यक्तीचा एक उद्देश असतो, जो दक्षिण कोरियाशी जुडलेला असतो. यानंतर कनकराजूला त्या आत्म्याच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आणि सर्व ठीक होण्यासाठी चैत्रा आणि त्याचा फोटोग्राफर मित्र कृष्णप्पा कोरियाला जातात. या देशात जाताच खूप गोंधळ उडतो, दरम्यान 'कोरियन कनकराजू' चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित 4 सप्टेंबर 2026 पासून प्रदर्शित होईल. हा चित्रपट तेलुगू, कन्नड, तमिळ, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये डब आवृत्त्यांसह उपलब्ध असेल. या चित्रपटात वरुण तेज कोनिडेला व्यतिरिक्त रितिका नायक सत्या, दक्षा नागरकर, सुनील वर्मा, व्हीटीव्ही गणेश, महेश अचंथा, श्रीनिवास अवसारला आणि इतर अनेक कलाकार आहेत.

हेही वाचा :

  1. वरुण तेज-लावण्या त्रिपाठी यांच्या घरी गोंडस बाळाचं आगमन, आजोबा चिरंजीवीनं शेअर केली भावनिक पोस्ट...
  2. 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन' चित्रपटाचा ट्रेलर सलमान खान आणि राम चरणने केला लॉन्च
  3. वरुण तेजनं वाघा बॉर्डरवर लॉन्च केले 'वंदे मातरम' गाणे, गाण्यासह टीझरलाही मिळतोय उदंड प्रतिसाद