यश स्टारर 'टॉक्सिक'चा टीझर रिलीज, पाहा धमाकेदार व्हिडिओ...
सुपरस्टार यश अभिनीत 'टॉक्सिक'चा टीझर हा रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाचा टीझर खूप दमदार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 8, 2026 at 11:38 AM IST
|Updated : January 8, 2026 at 1:02 PM IST
मुंबई : साऊथ सुपरस्टार यश आज, 8 जानेवारी रोजी 40वा वाढदिवस साजरा करत आहे. या विशेष प्रसंगी अभिनेत्यावर चाहते आणि सेलिब्रिटी अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. आता यशनं त्याच्या चाहत्यांना एक रिटर्न गिफ्ट देखील दिले आहे. यशचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'टॉक्सिक'चा अखेर टीझर रिलीज झाला आहे. 7 जानेवारीच्या संध्याकाळी चित्रपट निर्मात्यांनी 8 जानेवारीच्या सकाळी चित्रपटाविषयी एक मोठी अपडेट येईल, अशी माहिती दिली होती. यानंतर यशचे चाहते या तारखेकडे डोळे लावून राहिले होते. आज, यशच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाविषयीच्या एका मोठ्या अपडेटवरून पडदा उचलण्यात आला. 'टॉक्सिक'चा टीझर प्रदर्शित केल्यानं आता त्याचे चाहते खुश झाले आहेत. हा टीझर यशच्या चाहत्यांना आवडत आहे.
'टॉक्सिक'चा टीझर रिलीज : 'टॉक्सिक'च्या 2.51 मिनिटांच्या टीझरनं सोशल मीडियावर कहर निर्माण केला आहे. यशच्या प्रवेशाभोवती डिझाइन केलेला टीझर बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाच्या कामगिरीबद्दल उत्सुकता निर्माण करणारा आहे. टीझर एका दफनभूमीत सुरू होतो, जिथे काही प्रमुख लोक प्रिय व्यक्तीच्या दफनविधीसाठी येतात आणि कुणीही आत येऊ नये म्हणून स्मशानभूमीला कुलूप लावतात. त्यानंतर कानठळ्या बसवणाऱ्या स्फोटांच्या पार्श्वभूमीवर यशची एंट्री होते. गीतू मोहनदास यांनी यशची ओळख रायाच्या भूमिकेमध्ये करून दिली आहे. आता यशचा दमदार लूक हा अनेकांना पसंत आला आहे. 'टॉक्सिक'चा टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाच्या प्रदर्शन तारखेची वाट पाहणे कोणालाही कठीण जाईल. टीझरमध्ये यशच्या तोंडी असलेल्या एका व्याक्यात यशचा स्वॅग दिसतो.
'
'धुरंधर 2' चित्रपटाबरोबर सामना करेल : आतापर्यंत, यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटातील पाच अभिनेत्रींचे फर्स्ट लूक पोस्टर्स सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहेत. गीतू मोहनदास दिग्दर्शित, 'टॉक्सिक' हा 2026 मधील सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांपैकी एक आहे. यशचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत आहेत, कारण तो चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतत आहे. 2022 मध्ये, यशनं 'केजीएफ 2'द्वारे चित्रपटसृष्टीत धमाका केला होता. त्याचा हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील चौथा सर्वाधिक कमाई करणारा ठरला. आता, यश त्याच्या 'टॉक्सिक' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस काबीज करण्याच्या इराद्याने येत आहे. दरम्यान, 'टॉक्सिक' आणि रणवीर सिंगचा 'धुरंधर 2' 19 मार्च रोजी थिएटरमध्ये भिडणार आहेत. यामुळं दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर चांगलीच स्पर्धा पाहायला मिळेल.
हेही वाचा :

