रजनीकांत स्टारर 'जेलर 2'मध्ये दिसणार 'हा' खलनायक, 'किंग खान' कॅमियोसाठी करेल मार्चमध्ये शूट
रजनीकांतचा आगामी चित्रपट 'जेलर 2' हा सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये आता खलनायक जतिन सरना दिसणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 21, 2026 at 1:29 PM IST
|Updated : February 21, 2026 at 5:19 PM IST
हैदराबाद : अभिनेता रजनीकांत त्याच्या आगामी चित्रपट 'जेलर 2' यामुळं सध्या चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये यावेळी प्रेक्षकांना धमाकेदार पाहायला मिळणार आहे. आता या चित्रपटात रजनीकांतच्या विरुद्ध कोण दिसणार याबद्दल देखील चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये खलनायकाच्या रुपात जतिन सरना हा अभिनेता असणार असल्याचं म्हटलं जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार 'जेलर 2'साठी अभिनेता जतिन सरनाची वर्णी लागली आहे. आता पुन्हा एकदा चित्रपटामध्ये रजनीकांतबरोबर दमदार खलनायक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. तसेच हा चित्रपट जतिन सरनाच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे. दरम्यान गेल्या ऑगस्टमध्ये त्यानं आपल्या भूमिकेसाठी शूटिंग केलं होतं. याशिवाय त्यानं या चित्रपटातील भूमिकेचं वर्णन हे थरारक असल्याचं म्हटलं होतं.
जतिन सरना दिसणार खनायकाच्या भूमिकेत : याशिवाय त्यानं भाषेच्या अडथळ्यावर मात करणे हा प्रवासातील सर्वात फायदेशीर पैलू होता, असल्याचेही म्हटलं होतं. याशिवाय काही दिवसापूर्वी रजनीकांत आणि जतिन सरना यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या दोन्ही स्टार्सचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. दरम्यान चित्रपटामध्ये जतिन सरना हा सीक्वेलची कथा पुढं नेईल. त्यानं यापूर्वी 'सेक्रेड गेम्स'मध्ये देखील उत्तम काम केलं आहे. आता या चित्रपटाद्वारे तो पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना दिसणार आहे. तसेच या चित्रपटामध्ये हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता शाहरुख खानचा देखील कॅमियो असल्याचं म्हटलं जात आहे.
शाहरुख करणार मार्चमध्ये शूटिंग : दरम्यान शाहरुख या चित्रपटाच्या कॅमियोसाठी मार्चमध्ये शूट करणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे. तसेच 'रा.वन' नंतर, रजनीकांत आणि शाहरुख खान पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आता याबद्दल चित्रपट निर्मात्यांनी पुष्टी अद्यापही केली नाही. तसेच 'जेलर' हा नेल्सन दिलीप कुमार 2023च्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या सीक्वेल आहे. या चित्रपटामध्ये रम्या कृष्णन, योगी बाबू, शिवराजकुमार आणि विनायकन यांच्याही विशेष भूमिका असल्याचं म्हटलं जात आहे. 'जेलर 2' हा चित्रपट जून 2026मध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतो.
हेही वाचा :

