केरळ न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर 'द केरल स्टोरी 2'चे प्रदर्शन पुढे ढकलले, तिकिटे विक्रीत चाहते गोंधळले
'द केरल स्टोरी 2'वर केरळ न्यायालयानं 15 दिवसांची अंतरिम स्थगिती लागू केल्यावर या चित्रपटाची तिकिटे कशी विकली जात आहेत, याबद्दल आता रसिक चर्चा करत आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 27, 2026 at 11:56 AM IST
हैदराबाद : सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतरही,'द केरल स्टोरी 2' चित्रपटाला मोठा धक्का बसला होता. केरळ उच्च न्यायालयानं गुरुवारी चित्रपटाच्या प्रदर्शनावर 15 दिवसांची अंतरिम स्थगिती लागू केली. यानंतर हा चित्रपट सोशल मीडियावर चर्चा विषय बनला. आता पुन्हा एकदा या चित्रपटाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. न्यायालयानं या चित्रपटाबाबत सांगितलं होतं की, प्रथमदर्शनी या चित्रपटात जातीय सलोखा बिघडवण्याची आणि एका विशिष्ट समुदायाची बदनामी करण्याची क्षमता आहे. यानंतर हा चित्रपट 27 तारीखेला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार नव्हता.
'द केरल स्टोरी 2' चित्रपट रिलीज झाला ? याशिवाय न्यायालयानं सेन्सॉर बोर्डाच्या (सीबीएफसी) प्रक्रियेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच या चित्रपटाबाबत निर्मात्यांनी तात्काळ स्थगितीविरुद्ध अपीलही केली. यानंतर न्यायालयानं यावर सुनावणी करण्यास सहमती दर्शविली. हा चित्रपट 27 फेब्रुवारी 2026 प्रदर्शित होणार नाही याची आशा कमी झाली होती. दरम्यान न्यायालयाच्या आदेशानंतर, ऑनलाइन तिकीट प्लॅटफॉर्म आणि सिनेमा चेनवर मोठा गोंधळ पाहायला मिळत आहे. PVR, INOX आणि Cinepolis सारख्या प्रमुख राष्ट्रीय चेननं BookMyShow सारख्या प्लॅटफॉर्मवरून चित्रपटाचे प्रदर्शन काढून टाकले आहे, मात्र तरीही शुक्रवारी सकाळपर्यंत इतर अनेक थिएटरमध्ये बुकिंग सुरूच आहे.



सोशल मीडिया प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया : दरम्यान सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल आता वाद पाहायला मिळत आहे. हा चित्रपट खरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला की नाही याबद्दल अनेकजण प्रश्न विचारताना दिसत आहेत. याशिवाय काही चित्रपटगृह असं सांगत आहे की, हा चित्रपट प्रदर्शित झाला. दरम्यान या चित्रपटाबाबत एका यूजरनं लिहिलं, 'जर बंदी असेल तर तिकिटे कशी उपलब्ध आहेत?' दुसर्या एकानं लिहिलं, 'अरे हे काय होत आहे.' केरळ उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं की वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी न करता समाजात असंतोष पसरवू शकणारा चित्रपट प्रदर्शित करणे कायदेशीररित्या चुकीचं ठरेल. दरम्यान या चित्रपटाची निर्मिती विपुल अमृतलाल शाह यांनी केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कामाख्या नारायण सिंह यांनी केलंय. चित्रपटात अदिती भाटिया, उल्का गुप्ता आणि ऐश्वर्या ओझा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तसेच चित्रपट निर्मात्यांकडून स्थगितीबाबत कुठलेही अधिकृत विधान समोर आले नाही. आता या चित्रपटाबद्दल केरळ न्यायालय काय निर्णय देईल यावर सर्वाचं लक्ष आहे.
हेही वाचा :
- 'द केरळ स्टोरी 2'वर सेन्सॉर बोर्डाची लागली कात्री, बलात्कार आणि किससारख्या दृश्यांबाबत 16 कटसह दिले गेले 'हे' प्रमाणपत्र
- 'केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड' चित्रपट होईल 'या' दिवशी रिलीज, वाचा सविस्तर...
- 'द केरल स्टोरी 2 - गोज बियॉन्ड'च्या निर्मात्यांना बसला मोठा धक्का, न्यायालयाच्या स्थगितीनंतर चित्रपटाच्या रिलीजवर आलं संकट

