'द केरळ स्टोरी 2'नं पहिल्या दिवशी केली धमाकेदार कमाई, आकडा घ्या जाणून...
'द केरळ स्टोरी 2' चित्रपट रिलीज झाला आहे. आता या चित्रपटानं पहिल्या दिवशी किती कमाई केली याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 28, 2026 at 10:48 AM IST
मुंबई - केरळ हायकोर्टानं वादग्रस्त 'द केरळ स्टोरी 2' रिलीजला परवानगी दिल्यानंतर 27 फेब्रुवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर संमिश्र पुनरावलोकनं समोर आलंय.'द केरळ स्टोरी 2'नं बॉक्स ऑफिसवर चांगलं कलेक्शन केलंय. हा चित्रपट येणाऱ्या दिवसामध्ये चांगली कमाई करेल असं सध्याचं चित्र दिसत आहे. बॉक्स ऑफिस ट्रॅकर सॅकनिल्कनुसार,'द केरळ स्टोरी 2 गोज बियॉन्ड'नं पहिल्या दिवशी भारतात 3.5 कोटींची कमाई केली. याशिवाय जगभरात 4 कोटींहून अधिक कमाई केल्याचं म्हटलं जात आहे. रिपोर्टनुसार या चित्रपटाला बनविण्यासाठी 28 कोटी लागले.
पहिल्या दिवशी 'द केरळ स्टोरी 2'नं कुठल्या चित्रपटांना मागे टाकले : दरम्यान तापसी पन्नू स्टार 'अस्सी'बद्दल सांगायचं झालं तर या चित्रपटानं पहिल्या दिवशी 1 कोटींची कमाई केली. यानंतर दुसऱ्या आठ दिवसांत, चित्रपटानं भारतात फक्त 7.45 कोटी आणि जगभरात एकूण फक्त 8.2 कोटींची कमाई केली आहे. दुसरीकडे सिद्धांत चतुर्वेदी आणि मृणाल ठाकुर अभिनीत चित्रपटानं पहिल्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली. या चित्रपटाचं आठ दिवसांचं कलेक्शन 6.38 कोटी आहे. याशिवाय जगभरात या चित्रपटानं एकूण 7.5 कोटींची कमाई केली. आता 'द केरळ स्टोरी 2'मध्ये कुठलाही मोठा चेहरा नसताना देखील यानं खूप कमाई केल्यामुळं अनेकजण चकित झाले आहेत.
'द केरळ स्टोरी 2'बद्दल : 2023मध्ये सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरळ स्टोरी'चा 'द केरळ स्टोरी 2' सीक्वेल आहे. या चित्रपटानं तीन वर्षांपूर्वी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. 'द केरळ स्टोरी'मध्ये अदा शर्मानं मुख्य भूमिकेत काम केलं होतं. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप पसंत आला होता. या चित्रपटानं 303 कोटींची कमाई बॉक्स ऑफिसवर केली होती. हा चित्रपट फक्त 15 ते 20 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. या चित्रपटानं पहिल्या दिवशी 8.03 कोटींची कमाई केली होती. मात्र 27 फेब्रुवारी रिलीज झालेला 'द केरळ स्टोरी 2' चित्रपट किती कमाई करेल हे काही दिवसात समजेल.
हेही वाचा :
- केरळ न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर 'द केरल स्टोरी 2'चे प्रदर्शन पुढे ढकलले, तिकिटे विक्रीत चाहते गोंधळले
- 'द केरळ स्टोरी 2'वर सेन्सॉर बोर्डाची लागली कात्री, बलात्कार आणि किससारख्या दृश्यांबाबत 16 कटसह दिले गेले 'हे' प्रमाणपत्र
- 'केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड' चित्रपट होईल 'या' दिवशी रिलीज, वाचा सविस्तर...

