'द केरळ स्टोरी 2'वर सेन्सॉर बोर्डाची लागली कात्री, बलात्कार आणि किससारख्या दृश्यांबाबत 16 कटसह दिले गेले 'हे' प्रमाणपत्र
'द केरळ स्टोरी 2'ला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं मंजुरी दिली आहे. हा चित्रपट 27 फेब्रुवारी रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 24, 2026 at 5:29 PM IST
हैदराबाद : 'द केरल स्टोरी 2: गोज बियॉन्ड' हा ट्रेलरच्या रिलीजपासून वादात सापडला आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल केली गेली आहे. दरम्यान, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशननं चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, सीबीएफसीनं 'द केरल स्टोरी 2: गोज बियॉन्ड'च्या निर्मात्यांना चित्रपटात अंदाजे 16 कट आणि बदल करण्यास सांगितले आहे. किसचे दृश्ये आणि बलात्कार दृश्य 50 टक्के कमी करण्यात आले आहे. लिप-लॉक दृश्य 7 सेकंदांनी कमी करण्यास सांगितले होते. बलात्कार दृश्य 20 सेकंदांनी कमी करण्यात आले होते. एका महिलेला थप्पड मारल्याचा दृश्य आणि दुसऱ्या एका महिलेच्या डोक्यावर मारल्याचा दृश्य दोन्ही 2 सेकंदांनी कमी करण्यात आले.
'द केरळ स्टोरी 2'मध्ये करायला सांगितले 'हे' बदल : सीबीएफसीनं आरोपीचे घर बुलडोझरनं पाडलेल्या दृश्यात बदल करण्यास सांगितले आहे. त्यांनी तीन संवाद बदलण्याची आणि एक शब्द म्यूट करण्याची विनंती देखील केली आहे. असंख्य कट आणि बदलांव्यतिरिक्त, चित्रपट निर्मात्यांना 'द केरळ स्टोरी 2' हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे असे सांगणारा डिस्क्लेमर जोडण्यास सांगितले आहे. त्यांना डिस्क्लेमर मजकूर 2 मिनिटे आणि 3 सेकंदांनी वाढवण्यास आणि व्हॉइस-ओव्हर समाविष्ट करण्यास सांगितले. सीबीएफसीनं निर्मात्यांना संवादांसह संपूर्ण पटकथा सादर करण्यास सांगितले. कथा खऱ्या घटनांवर आधारित आहे या दाव्याला सिद्ध करण्यासाठी त्यांनी त्यांना सहाय्यक कागदपत्रे प्रदान करण्यास सांगितले. एका अल्पवयीन व्यक्तीच्या कास्टिंगबाबत एक कंसेंट लेटर देखील बोर्डाला सादर करण्यात आले.
'द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड' कधी होणार रिलीज : विविध बदलांनंतर, 16 फेब्रुवारी रोजी चित्रपटाला प्रमाणपत्र देण्यात आले. चित्रपटाचा रनटाइम 131 मिनिटे आणि 24 सेकंदांचा आहे, ज्यामुळे तो 2 तास,11 मिनिटे आणि 24 सेकंदचा असेल. कामाख्या नारायण सिंह दिग्दर्शित, 'द केरल स्टोरी 2: गोज बियॉन्ड' 27 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होईल. सध्या या चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर देखील खूप वाद निर्माण झाला आहे.
हेही वाचा :

