'बॉर्डर २' चित्रपटामधील वरुण धवनचं फर्स्ट लूक आलं समोर...
'बॉर्डर २' हा लवकरच प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटामधील वरुण धवनचं फर्स्ट लूक रिलीज केलं गेलं आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : November 5, 2025 at 12:40 PM IST
मुंबई - सनी देओल, दिलजीत दोसांझ , वरुण धवन आणि अहान शेट्टी स्टारर 'बॉर्डर २' चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेनं अनेकजण वाट पाहत आहेत. या चित्रपटाबद्दल अपडेट्स दररोज येत असते. आता ५ नोव्हेंबर रोजी चित्रपटातील वरुण धवनचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला आहे. अभिनेत्यानं सोशल मीडियावर त्याचा फर्स्ट लूक शेअर केला आणि त्याच्या पात्राचे नावही चाहत्यांना सांगितलंय. आता त्यानं शेअर केलेली पोस्ट अनेकांना आवडत आहे. दरम्यान या चित्रपटामधील पोस्टरमध्ये वरुण हा त्याच्या हातात बंदूक घरून शत्रूंविरुद्ध लढताना दिसत आहे.
'बॉर्डर २'मधील फर्स्ट लूक : वरुण धवननं इंस्टाग्रामवर चित्रपटातील त्याचा फर्स्ट लूक पोस्टर शेअर करताना कॅप्शन लिहिलं आहे, 'देशाचा सिपाही पीव्हीसी होशियार सिंह दहिया.' 'बॉर्डर २' २३ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. आता 'बॉर्डर २'च्या नवीन पोस्टरवर करण जोहरनं एक फायर इमोजी पोस्ट केला आहे. दरम्यान एका चाहत्यानं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'आता, लांडगा नाही तर सिंह 'बॉर्डर २'मध्ये शिरला आहे.' दुसऱ्या एकानं या पोस्टवर लिहिल, 'सर्वात मोठा भारतीय चित्रपट. वरुणचा फर्स्ट जबरदस्त लूक' आणखी एकानं लिहिलं, 'मला आशा आहे की हा चित्रपट ब्लॉकबस्टर होईल.' आता वरुणच्या पोस्टरला काही मिनिटांतच हजारो लाईक्स मिळाले आहेत.
'बॉर्डर २'मधील स्टारकास्ट : 'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनबरोबर सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटातील सनी देओलचा फर्स्ट लूकही प्रदर्शित झाला होता. हा लूक देखील प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता, वरुणच्या लूकनंतर, अहान आणि दिलजीत फर्स्ट लूक हे प्रदर्शित होईल, याबद्दल आता सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहेत. दरम्यान हा १९९७ मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाचा सीक्वेल आहे, ज्याचे दिग्दर्शन अनुराग सिंग यांनी केलं होतं. 'बॉर्डर २' प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं प्रदर्शित होत असल्यानं प्रेक्षकही आता खूप खुश आहेत.
हेही वाचा :

