ETV Bharat / entertainment

'तेरे इश्क में'चं ट्रेलर रिलीज, चित्रपटातील ७ संवाद तुम्हाला करणार घायाळ...

'तेरे इश्क में' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलरमधील हे सात संवाद तुम्हाला चित्रपट पाहण्यास भाग पाडू शकतात.

Tere ishk mein tralier out
'तेरे इश्क में'चं ट्रेलर रिलीज (Tere ishk mein tralier out (Trailer Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : November 15, 2025 at 3:33 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दाक्षिणात्य कलाकार धनुष आणि क्रिती सेनॉन अभिनीत 'तेरे इश्क में' या संगीतमय-रोमँटिक चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 'तनु वेड्स मनू' या चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी यापूर्वी धनुषबरोबर 'रांझणा' या चित्रपटाची सहनिर्मिती केली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता, आनंद एल. राय धनुषबरोबर 'तेरे इश्क में'साठी काम करत आहे. आता हा देखील चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यास सज्ज झाला आहे. 'तेरे इश्क में'च्या टीझरनं प्रेक्षकांच्या मनाला आधीच मोहित केलं आहे. आता 'तेरे इश्क में'चा ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर कसा आहे? : 'तेरे इश्क में' या चित्रपटाची कहाणी खूप भावनिक असणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एक शक्तिशाली आहे, जी आपल्या शरीरात तरंग निर्माण करते. पहिल्याच दृश्यात धनुष भारतीय हवाई दलाचे अधिकारी फ्लाइट लेफ्टनंट शंकरच्या भूमिकेत दिसत आहे. यानंतर क्रिती वेदना आणि पश्चात्तापामध्ये असल्याची दिसत आहे. त्यानंतर क्रिती धनुषची भूमिका स्पष्ट करते आणि कथा फ्लॅशबॅकमध्ये जाते, ज्यामुळं शंकरचा प्रेमाबद्दलचा ध्यास दिसून येतो. ट्रेलरमधील दृश्ये आणि संवाद दोन्हीही शक्तिशाली आहेत, जे चित्रपटासाठी उत्सुकता निर्माण करतात.

'तेरे इश्क में' के ट्रेलर के 5 दमदार डायलॉग

  • अभी भी आक्रामक, अभी भी गुस्सैल, तुम्हें अपनी इस इमेज से प्यार है ना? (क्रिती सेनॉन)
  • अब अगर इतनी सुंदर लड़की का हाथ उठा है, तो किसी गाल पर तो पड़ना ही चाहिए (धनुष )
  • हम प्यार में पढ़ गया तो... दिल्ली फूंक दूंगा.... (धनुष)
  • लड़कियां ना हमेशा राजुकमार के सपने देखती हैं, क्योंकि मोहब्ब्त में समझदारी की आदत होती हैं उन्हें... (क्रिती सेनॉन)
  • मैं ना ऐसे लड़कों की मेंटालिटी जानती हूं, जब वो लड़की को शादी के जोड़े में देख लेते हैं ना, तो वो चले जाते हैं... (क्रिती सेनॉन)
  • मर जाओगे पंडित... प्रेम में मृत्यु है...मुक्ति नहीं... मुक्ति के पीछे भाग मत...अपने इश्क में इतना जल...कि मुक्ति तेरे पैरों में गिरके भीख मांगे..कि स्वीकार करो मुझे..
  • मेरा जी ऊब गया है इस प्यार से... मुझे अब बस लड़ना है.... (धनुष)
  • बता दें, फिल्म आगामी 28 नवंबर को थिएटर में रिलीज होगी.

हेही वाचा :

  1. 'तेरे इश्क में' चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज, पाहा व्हिडिओ...
  2. धनुष स्टारर 'तेरे इश्क में'ची टीझरसह रिलीज डेट जाहीर, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर करणार रोमान्स...