ETV Bharat / entertainment

धनुष आणि क्रिती सेनॉन स्टारर 'तेरे इश्क में'नं केली बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई...

धनुष आणि क्रिती सेनॉन अभिनीत बहुप्रतीक्षित 'तेरे इश्क में' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे.

Tere ishk mein movie
'तेरे इश्क में' चित्रपट (Poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : November 29, 2025 at 11:21 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - अभिनेता धनुष आणि क्रिती सेनॉन अभिनीत बहुप्रतीक्षित 'तेरे इश्क में' या चित्रपटानं रिलीजपूर्वीच बरीच चर्चा निर्माण केली होती. या चित्रपटाचा ट्रेलर खूप गाजला होता. आता चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाची अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील चांगलचं झाली होती. हा चित्रपट शुक्रवारी मोठ्या पडद्यावर रिलीज झाल्यानंतर, प्रेक्षकांनी थिएटरमध्ये गर्दी केली होती. 'तेरे इश्क में'नं बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. धनुष आणि क्रिती सेनॉन स्टारर चित्रपटाच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन किती झाले आहे. याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. यावर्षी 'सैयारा' आणि 'एक दीवाने की दिवानीयत' सारख्या रोमँटिक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे.

'तेरे इश्क में' चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन : सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या ट्रेंड रिपोर्टनुसार, आनंद एल. राय दिग्दर्शित 'तेरे इश्क में' या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी १६.५० कोटींची कमाई केली. हे आता या चित्रपटाच्या कमाईचे प्राथमिक आकडे आहेत. अधिकृत डेटा जाहीर झाल्यानंतर यामध्ये काही बदल होऊ शकते. बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आनंद एल. रॉयचा 'तनु वेड्स मनु' आणि 'रांझणा'नंतर 'तेरे इश्क में' हा चित्रपटही हा खूप धमाकेदार आहे, असं अनेकांनी सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करून म्हटलं होतं. धनुषनं बॉलिवूडमध्ये यापूर्वी 'रांझणा' आणि 'अतरंगी रे' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट त्याच्या चाहत्यांना खूप पसंत आले होते. आता त्याला 'तेरे इश्क में' या चित्रपटाकडून देखील खूप अपेक्षा आहेत.

दिग्दर्शक आनंद एल. रॉयनं सांगितली होती माहिती : दिग्दर्शक आनंद एल. रॉय आणि कलर येलो बॅनरनं चित्रपटाचा टीझर शेअर करताना असं लिहिलं आहे की, 'काही कथा जुन्या मित्रांना भेटण्यासारख्या असतात! ते हात हलवत नाहीत, ते थेट तुम्हाला मीठी मारण्यासाठी येतात... १० वर्षांपूर्वी, आम्हाला अशीच एक कथा भेटली... कुंदनची कथा. तो माझा मित्र होता, पण तो जगू शकला नाही... तो जगण्याच्या मूडमध्ये नव्हता! आता, १० वर्षांनंतर, आणखी एक कथा समोर आली आहे, कुंदन आणि हा मुलगा सारखाच आहे, फक्त तो जग उद्ध्वस्त करण्याच्या मूडमध्ये आहे! फक्त तुमच्यासाठी... 'तेरे इश्क में' आता हा चित्रपट येणाऱ्या दिवसांमध्ये बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करेल असं सध्या दिसत आहे.

हेही वाचा :

  1. 'तेरे इश्क में'चं ट्रेलर रिलीज, चित्रपटातील ७ संवाद तुम्हाला करणार घायाळ...
  2. 'तेरे इश्क में' चित्रपटातील टायटल ट्रॅक रिलीज, पाहा व्हिडिओ...
  3. धनुष स्टारर 'तेरे इश्क में'ची टीझरसह रिलीज डेट जाहीर, 'या' बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर करणार रोमान्स...