'टॉक्सिक'मधील तारा सुतारियाचा फर्स्ट लूक आला समोर, 'या' भूमिकेत चित्रपटात झळकणार
सुपरस्टार यश आणि कियारा अडवाणी यांच्या प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'टॉक्सिक'मधील अभिनेत्री तारा सुतारियाचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 3, 2026 at 1:00 PM IST
मुंबई : कन्नड सुपरस्टार यश अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपट 'टॉक्सिक' सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट मार्च 2026मध्ये रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. या चित्रपटातील अभिनेत्रींचे फर्स्ट लूक एकामागून एक उघड केले जात आहेत. कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि नयनतारा यांच्यानंतर आता तारा सुतारियाचा चित्रपटातील फर्स्ट लूकही समोर आला आहे. 3 जानेवारी रोजी, 'टॉक्सिक' चित्रपटाच्या निर्मात्यांनी तारा सुतारियाचा फर्स्ट लूक शेअर केला. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. दरम्यान आम्ही ' टॉक्सिक' चित्रपटात तारा सुतारियाची भूमिका काय असणार याबद्दल तुम्हाला सांगणार आहोत.
तारा सुतारियाचं फर्स्ट लूक : गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' या चित्रपटातील तारा सुतारियाच्या फर्स्ट लूकमध्ये ती ऑफ-शोल्डर डार्क ड्रेसमध्ये असून तिच्या हातात बंदूक आहे. खांद्यावर रुळणारे केस आणि लक्ष्यावर असलेल्या नजरेत एक वेगळीच चमक दिसत आहे. ताराचा इंटेन्स लूक हा अनेकांना प्रभावित करणारा आहे. 'टॉक्सिक'मध्ये तारा रिबेकाची भूमिका साकारणार आहे. 'टॉक्सिक' हा एक मास अॅक्शन चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील नयनताराचा डॅशिंग फर्स्ट लूक खूप धमाकेदार होता. 'टॉक्सिक'मध्ये नयनताराची भूमिका गंगा नावाच्या मुलीची आहे. दुसरीकडे हुमा कुरेशी एलिझाबेथची भूमिका साकारणार आहे आणि कियारा अडवाणी नादियाची भूमिका साकारणार आहे. 'टॉक्सिक'मधील या चारही अभिनेत्रींच्या भूमिका खूपच मनोरंजक, आश्चर्यकारक आणि रहस्यमय आहेत.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे? : 'टॉक्सिक' यश आणि गीतू मोहनदास यांनी सह-लेखक म्हणून लिहिलाय. चित्रपटाचं दिग्दर्शन गीतू यांनीच केलंय. या चित्रपटाची निर्मिती वेंकट नारायण आणि यश यांनी केली आहे. कन्नड आणि इंग्रजीमध्ये चित्रीकरण केलेला हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि इतर अनेक भाषांमध्ये डब केला जाणार आहे. 'टॉक्सिक' हा चित्रपट 19 मार्च रोजी गुढीपाडवा, उगादी, आणि ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होत आहे. 19 मार्चला गुरुवार आहे, ज्यामुळं चित्रपटाला चार दिवसांचा उत्सवी वीकेंड अनुभवता येईल. चित्रपटातील यशचा फर्स्ट लूक आधीच प्रदर्शित झाला आहे. तसंच केजीएफ स्टारचे चाहते त्याच्या 'टॉक्सिक'च्या प्रदर्शनाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. या चित्रपटाचं काम वर्षापेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. आता यश चार वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे.
हेही वाचा :

