ETV Bharat / entertainment

स्वरा भास्करनं घरगुती हिंसाचाराला परवानगी देणाऱ्या तालिबानच्या कायद्यांचा केला निषेध

स्वरा भास्करनं घरगुती हिंसाचाराला परवानगी देणाऱ्या तालिबानच्या कायद्यांचा निषेध केला आहे. आता तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

Swara Bhasker
स्वरा भास्कर (IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 21, 2026 at 12:24 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : सध्या तालिबानी कायद्याची जगभरात चर्चा होत आहे. अफगाणिस्तानात तालिबान सत्तेत आल्यानंतर महिलांसाठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता महिलांना मारण्याची परवानगी देणाऱ्या तालिबानी कायद्यावर हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेत्री स्वरा भास्करनं टीका केली आहे. घरगुती हिंसाचाराला परवानगी देणाऱ्या तालिबानी कायद्यावर स्वरानं एक सोशल मीडियावर पोस्ट देखील शेअर केली आहे. अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अत्यंत कडक कारवाई केली जात आहे. आता तालिबाननं आणलेल्या नवीन कायद्यानुसार पतीला त्याच्या पत्नीला मारहाण करण्याचे स्वातंत्र्य आहे. या कायद्यामध्ये पती पत्नीला मारत असताना तिचे हाड तोडू शकणार नाही आणि दृश्यमान जखमा देऊ शकणार नाही, मात्र तिला मारहान करू शकेल.

स्वरा भास्करनं केला तालिबानी कायद्याला विरोध : पत्नीला पतीनं मारल्यानंतर याला गुन्हा देखील मानला जाणार नाही. मारहान केल्यानंतर पतीला शिक्षा देखील दिली जाणार नाही. दरम्यान स्वरा भास्करनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'मला विश्वास बसत नाहीये. खरं सांगायचं तर, तालिबान हे मानवतेतील सर्वात घृणास्पद लोकांपैकी एक आहेत. पूर्णपणे निर्दयी आणि क्रूर, पूर्णपणे राक्षसी. हा मानवतेचा आणि ते ज्या धर्माचे प्रतिनिधित्व करण्याचा दावा करतात त्याचा अपमान आहे. पूर्णपणे घृणास्पद.' स्वरा भास्करची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय स्वराच नाही तर सोशल मीडियावर अनेक लोक या तालिबानी राजवटीचा निषेध करत आहे. हा काळा कायदा असल्याचं देखील अनेकजण म्हणताना दिसत आहेत.

Swara Bhasker Post
स्वरा भास्करची पोस्ट (Instagram)

स्वरा भास्करबद्दल : दरम्यान आता या कायद्यानंतर पुरुष आणखी महिलांवर अत्याचार करणार याबद्दल देखील सोशल मीडियावर अनेकजण म्हणताना दिसत आहेत. तसेच स्वरा भास्करच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. याशिवाय तिचा 'रांझणा' चित्रपटामधील अभिनय हा अनेकांना आवडला होता. या चित्रपटानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. 'रांझणा' चित्रपटामध्ये तिच्याबरोबर धनुष, सोनम कपूर, अभय देओल आणि मुहम्मद झीशान अय्युब यांनी प्रमुख भूमिकेत काम केलं होतं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

हेही वाचा :

  1. स्वरा भास्करला तिचे ट्विटर अकाउंट परत मिळाले, पोस्ट शेअर करू केला आनंद व्यक्त
  2. कॉपीराइटच्या समस्येमुळे स्वरा भास्करचं एक्स अकाउंट कायमचे निलंबित, वाचा सविस्तर
  3. "आमची बायको हिरोईन नाही म्हणून..."; फहाद अहमदच्या उमेदवारीवरुन राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज