ETV Bharat / entertainment

ललित मोदी यांनी सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवल्यानंतर सुष्मिता सेननं स्टायलिश नवीन फोटो केले शेअर

सुष्मिता सेनचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ललित मोदी यांच्या पोस्टनंतर तिची पोस्ट आता चर्चेचा विषय बनली आहे.

lalit modi and Sushmita Sen
ललित मोदी आणि सुष्मिता सेन (ANI)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : June 3, 2026 at 2:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळं चर्चेत आली आहे. अलीकडेच, तिचे नाव ललित मोदींबरोबर जोडले गेले होते. तसेच 2022मध्ये दोघांचे एकत्र मजा-मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अलीकडेच पैशांसाठी नात्यात राहणारी असल्याचं ('गोल्ड डिगर') अभिनेत्रीला म्हटलं गेलं होतं. तसेच 2026मध्ये म्हणजेच अलीकडे ललित मोदी यांनीही अभिनेत्रीला पाठिंबा दिला आणि म्हटलं की, सुष्मिता सेन 'गोल्ड डिगर' नाही. दोघेही पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत विषय बनले आहेत. याचदरम्यान अभिनेत्रीनं स्वतःची एक पोस्ट शेअर केली आहे. सुष्मिता सेनची नवीन पोस्ट सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाली आहे.

सुष्मिता सेनची नवीन पोस्ट : सुष्मितानं काल रात्री तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये अभिनेत्रीनं स्वतःचे दोन स्टायलिश फोटो पोस्ट केले. या फोटोंमध्ये सुष्मिता काळ्या रंगाच्या पोशाखात असल्याची दिसत आहे. ही पोस्ट शेअर करताना अभिनेत्रीनं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, 'मी नेहमीच्या वाटांपेक्षा वेगळ्या वाटांनी जाते... सर्वात आरामदायक आणि सेक्सी स्लिपर्स घालून!!! जेव्हा एखादा पुरुष आपला शब्द पाळतो, तेव्हा खूप छान वाटतं. माझ्या उदार मित्रा स्टुअर्ट पार, तुझ्या ब्रँडकडून दिलेल्या सुंदर भेटवस्तूंबद्दल धन्यवाद. मी सुरुवात करते त्या लालभडक वस्तू दाखवून! त्या मला खूप खूप आवडल्या! 'सोल टू सोल' व्हेनिसमध्ये भेटूया.'

'गोल्ड डिगर' टॅग कसा लागला : 2022मध्ये, जेव्हा सुष्मिता सेनचे ललित मोदींबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते, तेव्हा लोकांनी अभिनेत्रीला 'गोल्ड डिगर' म्हटलं होतं. त्यावर अभिनेत्रीनं उत्तर दिलं होतं, "मी सोन्यापेक्षाही खोल आहे आणि मला हिरे नेहमीच आवडले आहेत!!" आणि हो, मी अजूनही ते स्वतःच विकत घेते!" निरुपयोगी सवयी असलेले लोक आणि क्षुल्लक व कधीकधी हास्यास्पद गप्पा मारणारे अज्ञानी लोक. असे मित्र जे मला कधीच मिळाले नाहीत आणि असे ओळखीचे लोक ज्यांना मी कधी भेटलेच नाही. हे सर्वजण माझ्या आयुष्याबद्दल आणि माझ्या चारित्र्याबद्दल त्यांची मोठी मते आणि सखोल ज्ञान सांगत आहेत, आणि या 'गोल्ड डिगर गोष्टीवरून अमाप पैसा कमावत आहेत असल्याचं म्हणत आहे, हे हुशार लोक!' तसेच 2023च्या एका मुलाखतीत, सुष्मितानं ललित मोदीसोबतच्या तिच्या नात्याचं वर्णन फक्त एक नवीन टप्पा असं केलं होतं.

ललित मोदींची पोस्ट : अलीकडेच, ललित मोदी यांनी सुष्मिता सेनचा बचाव करत म्हटलं होतं, "आम्ही कधीही बाहेर गेलो नाही आणि मला कशासाठीही पैसे द्यावे लागले नाहीत. तिनेच सगळ्याचे पैसे दिले. मी एक प्रकारे तिचा वैयक्तिक प्रियकर होतो. तिनं कोणाकडूनही काहीही घेतलं नाही. तरीही, लोक तिला 'गोल्ड डिगर' म्हणायचे, ते पूर्णपणे खोटे होते. खरे सांगायचं झालं तर, मी खरा 'डायमंड डिगर' आहे."

हेही वाचा :

  1. ललित मोदींनी 'गोल्ड डिगर' या उपाधीविरुद्ध सुष्मिता सेनचा केला बचाव...
  2. सुष्मिता सेननं ३१ वर्षापूर्वी 'या उत्तरा'मुळं जिंकली होती मिस युनिव्हर्स स्पर्धा, तिच्याबद्दल जाणून घ्या
  3. सुश्मिता सेनच्या वाढदिवसानिमित्त अनेक सेलेब्रिटींनी केला शुभेच्छांचा वर्षाव