ETV Bharat / entertainment

'शक्तिमान' मालिकेत किल्विशची भूमिका साकारणारे सुरेंद्र पाल यांनी रणवीर सिंगबद्दल केलं विधान

'शक्तिमान' मालिकेत किल्विशची भूमिका करणारे सुरेंद्र पाल यांनी मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगच्या नावाबद्दल विचार करायला पाहिजे असं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

shaktimaan
'शक्तिमान' (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : May 6, 2026 at 11:41 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : ज्येष्ठ अभिनेता मुकेश खन्ना हे 'शक्तिमान'साठी ओळखले जातात. त्यांची ही मालिका प्रचंड गाजली होती. आता मालिकेवर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये रणवीर सिंगला ही भूमिका साकारायची होती, मात्र, मुकेश खन्ना यांनी याला नकार दिला. आता, 'शक्तिमान' मालिकेत किल्विशची भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेते सुरेंद्र पाल यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. सुरेंद्र पाल यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "शक्तिमान'च्या भूमिकेसाठी मुकेश खन्ना हे सर्वोत्तम पारखी आहेत. ही त्यांची निर्मिती आहे. या पात्रासाठी त्यांना सर्वोत्तमच हवं आहे. त्यांनी त्याला स्वतःच्या मुलाप्रमाणे वागवलं आहे. म्हणूनच ते त्याच्याशी तडजोड करणार नाहीत. ते खूप हट्टी आहे. पण रणवीर सिंग वाईट पर्याय नाही. तो मला आवडतो. 'धुरंधर' पाहिल्यानंतर मी त्याचा आणखी मोठा चाहता झालो आहे. मला वाटतं की, या भूमिकेसाठी तो एक आदर्श निवड असू शकतो. मला वाटते की, मुकेशजींनी पुनर्विचार करावा."

मुकेश खन्ना काय म्हणाले? : दरम्यान नुकत्याचं दिलेल्या एका मुलाखतीत मुकेश खन्ना यांनी म्हटलं होतं, "रणवीर सिंग एक उत्कृष्ट अभिनेता आहे. तो 'धुरंधर', 'गली बॉय' आणि 'खिलजी'ची भूमिका साकारू शकतो, पण शक्तिमानसाठी केवळ अभिनेताच नव्हे, तर चेहरा खूप महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ, पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारण्यासाठी त्यांच्यासारखे दिसणे आवश्यक आहे, मात्र अक्षय कुमार चित्रपटाच त्यांच्यासारखे अजिबात दिसत नव्हते. जेव्हा मी ऐतिहासिक भूमिका साकारल्या, तेव्हा वेशभूषा बदलण्यासाठी दीड तास लागत होता." तसेच आणखी एका मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं सांगितलं होतं की, "रणवीरचा चेहरा नकारात्मक आहे. तो किल्व्हिशच्या भूमिकेसाठी योग्य आहे. पण शक्तिमानच्या भूमिकेसाठी नाही. त्याच्यात सकारात्मकतेची कमतरता आहे."

मुकेश खन्ना यांना 'शक्तिमान'साठी पाहिजे नवीन चेहरा : मुकेश खन्ना हे 'शक्तिमान'च्या भूमिकेसाठी एका नवीन चेहऱ्याचा शोधात आहे, जे सकात्मक असेल. याशिवाय मुकेश खन्ना यांचे अनेक चाहते त्यांच्या या चित्रपटाबद्दल अपडेट जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत. दरम्यान 'शक्तिमान'बद्दल सांगायचं झालं तर ही मालिका 1997 ते 27 मार्च 2005 पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. ही मालिका डीडी नॅशनलवर प्रदर्शित होत होती. यामध्ये मुकेश खन्ना आणि सुरेंद्र पालशिवाय वैष्णवी मॅकडोनाल्ड, कितू गिडवाणी, टॉम ऑल्टरनवाब शाह, ललित परिमू, राजू श्रीवास्तव आणि अनेक कलाकार होते. ही मालिका खूप गाजली होती.

हेही वाचा :

  1. मुकेश खन्ना यांनी रणवीर सिंगबद्दल केलं विधान, 'शक्तिमान' पात्रासाठी अभिनेता अयोग्य
  2. मुकेश खन्ना आणि समय रैना यांच्यात शाब्दिक युद्ध अधिकच तीव्र, अभिनेत्यानं पोस्ट शेअर करून केली टीका...
  3. मुकेश खन्नाला कपिल शर्मा का आवडत नाही ? यामागील कारण जाणून घ्या...