ETV Bharat / entertainment

सुनील शेट्टी चारधाम यात्रेच्या व्यवस्थेवर खूश, उत्तराखंडमधील पोलिसांची केली प्रशंसा...

अभिनेता सुनील शेट्टी उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील यात्रेत सामील झाला. यानंतर त्यानं या यात्रेचा अभनुव शेअर केला.

sunil shetty
सुनील शेट्टी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 27, 2026 at 4:28 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

डेहराडून : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सुनील शेट्टी सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर आहे. त्यानं उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे काही काळ घालवला. दरम्यान यावेळी त्यानं उत्तराखंडमधील चारधाम यात्रेच्या व्यवस्थेचं कौतुक केलं. त्यानं सांगितलं की, तो या वेळीही नक्कीच चारधाम यात्रेला जाईल. सुनील शेट्टीनं म्हटलं, "यात्रेदरम्यान लोकांना वाहतूक कोंडी आणि गर्दीमुळं त्रास होतो हे ऐकणे सामान्य आहे. उत्तराखंड चारधाम यात्रेची व्यवस्था चांगली आहे, परंतु त्याचा अनुभव पूर्णपणे वेगळा होता." ऋषिकेशमधील त्यानं पोलीस आणि सर्व व्यवस्थेबद्दल सकात्मक भाष्य केलं.

सुनील शेट्टीनं ऋषिकेशमधील त्यांचा अनुभव चांगला असल्याचं सांगितलं : सुनील शेट्टीनं सांगितलं की "येथील व्यवस्थापन खूप प्रभावी आणि सुसंघटित आहे. कडक ऊन आणि प्रचंड गर्दी असूनही यात्रेकरूंना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही." चारधाम यात्रेदरम्यान ऋषिकेशमधील त्यांचा अनुभव खूप चांगला होता आणि तेथील व्यवस्थेनं तो प्रभावित झाला. त्यानं भविष्यात पुन्हा चारधाम यात्रेसाठी परत येण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, सुधारित व्यवस्थापन आणि प्रशासकीय प्रयत्नांमुळं चारधाम यात्रा यात्रेकरूंसाठी अधिक सुलभ आणि सोयीस्कर होत आहे.

चारधाम यात्रा : सुनील शेट्टी आपल्या पत्नी माना शेट्टीबरोबर ऋषिकेशमध्ये आहेत. ऋषिकेशमध्ये सुनील शेट्टी आणि त्याची पत्नी यांनी परमार्थ निकेतन गंगा घाटावर आयोजित गंगा आरतीमध्येही भाग घेतला. यावेळी त्यांनी आरती करून गंगा मातेचा आशीर्वाद घेतला. तसेच यावर्षी उत्तराखंड चारधाम यात्रा 19 एप्रिल रोजी सुरू झाली. मोठ्या संख्येनं भाविक चारधाम येथे पोहोचत आहेत. याच कारणानं गेल्या 9 दिवसांतच अडीच लाखांहून अधिक भाविकांनी चारधामला भेट दिली. भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी पोलीस आणि प्रशासन सातत्यानं व्यवस्था करत आहेत. दरम्यान सुनील शेट्टीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो पुढं तो 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी 3'मध्ये चित्रपटांमध्ये दिसणार आहे. त्याचे हे दोन्ही चित्रपट खूप चर्चेत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बॉर्डर 2'च्या यशानंतर सुनील शेट्टीनं बाबा महाकालचं घेतलं दर्शन...
  2. सोशल मीडियावर नातीसोबतचे फोटो विनापरवानगी वापरल्याविरोधात सुनील शेट्टीची हायकोर्टात याचिका
  3. पुढील सुट्टीचं नियोजन काश्मिरमध्येचं करा, एकजूट दाखवून द्या, सुनिल शेट्टीचं नागरिकांना आवाहन