ETV Bharat / entertainment

पोलीस बँडबरोबर गाणं गाताना सोनू निगम झाला भावूक...

मुंबई पोलीस दलाच्या नायगाव संकुलातील सभागृहात आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस बँडबरोबर सोनू निगमनं विशेष परफॉर्मन्स दिला.

Sonu Nigam
सोनू निगम (IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 8, 2026 at 2:00 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांनी बुधवारी मुंबई पोलीस बँडसह एका कार्यक्रमात आपल्या सुमधूर आवाजात मुंबई पोलिसांना एक अनोखी मानवंदना दिली. येत्या 23 जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणाऱ्या 'बॉर्डर 2' या आगामी सिनेमाच्या प्रसिद्धीकरता सोनू निगम गेला होता. त्यावेळी सोनू निगमनं 28 वर्षांपूर्वी 'बॉर्डर' या सिनेमात गायलेल्या 'संदेसे आते है' या अजरामर गाण्याशी जोडलेल्या काही आठवणीही सांगितल्या आहेत.

नायगाव पोलीस संकुलात सोनू निमगची खास भेट : मुंबई पोलीस दलाच्या नायगाव संकुलातील सभागृहात बुधवारी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पोलीस बँडतर्फे बॉर्डरमधील 'ए जाते हुए लम्हो...' 'हिंदुस्तान...' आणि 'संदेसे आते है...' ही गाणी वाजवण्यात आली. या कार्यक्रमाला सोनू निगमच्या विशेष उपस्थितीमुळं एक वेगळ्याच उंचीवर नेलं. सोनूनेही मग उपस्थितीतांना आपल्या आवाजानं काहीकाळ मंत्रमुग्ध केलं. सोनू निगमनं त्याचं गाणं भारत देशासाठी आपले प्राण समर्पित केलेल्या जवानांना अर्पण केले.

Sonu Nigam
सोनू निगम (ETV Bharat)
सोनू निगम (ETV Bharat)

'बॉर्डर'च्या आठवणींनी सोनू निगमही झाला भावूक : 'संदेसे आते है...' हे गाणं आपल्या करिअरला कलाटणी देणारी घटना होती. असं सांगताना यावेळी सोनू निगमनं संगीतकार अन्नू मलिक यांचे विशेष आभार मानले. 28 वर्षांपूर्वी एका नवोदित गायकाला हे इतकं मोठ गाणं देऊन त्यांनी माझ करिअर घडवलं असंही सोनूनं आवर्जून सांगितलं. तसेच मुंबई, मुंबईकर आणि मुंबई पोलीस यांचं आपल्या जीवनात फार विशेष स्थान असल्याचंही यावेळी सोनूनं कबूल केलं. त्यामुळं जेव्हा जेव्हा मुंबई पोलीसांबरोबर एखादा मंच शेअर करायची संधी मिळते, तेव्हा तो आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असतो असंही सोनूनं सांगितलं. दरम्यान 'बॉर्डर 2' चित्रपटाबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ, सोनम बाजवा, मेधा राणा, मोना सिंग आणि अन्या सिंग हे स्टार्स दिसणार आहेत. आता अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहात आहेत. या चित्रपटामधील 'घर कब आओगे' गाणं हे देखील रिलीज केलं गेलं आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी खूप पसंत केलं आहे. 'घर कब आओगे' गाण्याला सोनू निगम आणि अरिजित सिंग विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांनी गायलं आहे.

हेही वाचा :

  1. सोनू निगमनं व्हायरल झालेल्या व्यक्तीबरोबर गायलं गाणं, वाचा सविस्तर...
  2. सोनू निगम यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं 'सजना'चं टायटल सॉन्ग प्रदर्शित!
  3. सोनू निगमच्या शोमध्ये दगडफेकीच्या घटनेवर झाला खुलासा, वाचा सविस्तर