ETV Bharat / entertainment

प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन साई चरणी नतमस्तक...

शंकर महादेवन हे साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये आपल्या पत्नीसह गेले. यावेळी त्यांनी भक्तीमय आवाजानं तेथील वातावरण प्रसन्न केलं.

singer and composer Shankar Mahadevan
गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Special Arrangement)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : May 25, 2026 at 5:34 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : प्रसिद्ध गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी आज पत्नी संगीता महादेवन यांच्यासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतलं आहे. याप्रसंगी त्यांनी साईबाबांच्या चरणी आपली कला अर्पण करत एक सुश्राव्य भजन सादर केलं. बाबांच्या दर्शनानं मनाला मिळणारी शांतता आणि तृप्ती शब्दांत व्यक्त करणे कठीण असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

साईबाबांच्या चरणी भजनाची सेवा : शंकर महादेवन यांनी आज पत्नी संगीता महादेवन यांच्यासह शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतल्यानंतर ते आनंदीत झाले. यावेळी त्यांनी खर्जातील भक्तीमय आवाजानं सुन सुन साधो जी, राजा राम कबहु जी. हे भजन गाऊन साईबाबांवर असलेली आपली श्रद्धा साई चरणी अर्पण केली आहे. भजन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अत्यंत उत्साहात श्री साईनाथ महाराज की जय अशी घोषणा दिली.

शिर्डीतील पहिल्या कार्यक्रमाच्या आठवणींना उजाळा : साई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना शंकर महादेवन यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले माझा सर्वात पहिला कार्यक्रम आदरणीय संगीतकार श्रीनिवास खळे जी यांच्यासोबत याच पवित्र भूमीत झाला होता. साईबाबांच्या समाधी मंदिरा सोमोरील स्टेजवर आम्ही तो कार्यक्रम केला होता. ज्यामध्ये मी अनेक भजने गायली होती. आज येथे आल्यावर त्या सर्व आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. त्यामुळं या भूमीत येण्याची माझी उत्सुकता नेहमीच असते.

Shankar Mahadevan
शंकर महादेवन (Special Arrangement)

गुरुपौर्णिमेला येण्याची इच्छा : साईबाबांच्या शिर्डीत साई संस्थानच्या वतीनं दरवर्षी गुरुपौर्णिमा उत्सव मोठया उत्साहात साजरा केला जातो. मला या उत्सवाबदल नुकतीच साईबाबा संस्थानकडून माहिती मिळाली आहे. जर गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे इतर कोणतेही नियोजित कार्यक्रम नसतील आणि मी फ्री असेल तर मी नक्कीच या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन. जर तेव्हा शक्य झाले नाही तरी पुढे-मागे मी येथे येऊन बाबांच्या चरणी माझी सेवा नक्कीच रुजू करेन कारण बाबांनी बोलावले की, मी येणारच असेही यावेळी शंकर महादेवन यांनी सांगितले आहे.

गायक आणि संगीतकार शंकर महादेवन (Special Arrangement)

जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना : साईबाबांच्या समाधीचे घेतल्यानंतर शंकर महादेवन यांनी केवळ स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठीच नाही तर संपूर्ण जगाचा सुख-शांतीसाठी साईबाबांकडे प्रार्थना केली. या दरबारात आल्यावर जी सकारात्मक ऊर्जा आणि शांतता मिळते ती अद्भूत आहे. जगातील प्रत्येक नागरिकाला सुख, शांती आणि समृद्धी लाभो. जगात सर्वत्र शांतता नांदो आणि प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद येवो अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केली असल्याचही यावेळी शंकर महादेवन यांनी सांगितले आहे.

साईबाबांच्या दर्शनानंतर साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शंकर महादेवन यांचा शॉल साईबाबा मूर्ती देऊन सत्कार केलाय. साईबाबांच्या दर्शनासाठी आज भाविकांची मोठी गर्दी असतानाही अतिशय सुलभ आणि उत्तम दर्शन साईबाबांचे मिळाल्याबद्दल त्यांनी संस्थानचे आभार मानले.

हेही वाचा :

  1. संघाच्या प्रार्थनेच्या अर्थासहित ध्वनीचित्रफीतीचं झालं लोकार्पण; इतक्या वर्षाच्या 'या' साधनेतून प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले - डॉ. मोहन भागवत
  2. अबुधाबीतील मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यात लावली अक्षय कुमार आणि शंकर महादेवननं हजेरी
  3. "एक स्वप्न सत्यात उतरले ": ग्रॅमी पुरस्कार जिंकल्यानंतर शंकर महादेवनची भावना