पहिल्या चित्रपटानंतर प्रसिद्धीझोतात, शाहिद कपूरच्या आयुष्यात पत्नी मीरा राजपूतची कशी झाली एंट्री ?
शाहिद कपूर 25 फेब्रुवारी 2026 रोजी आपला वाढदिवस साजरा करत आहे. या दिवशी आम्ही त्याच्याबद्दल काही विशेष गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 25, 2026 at 4:26 PM IST
हैदराबाद : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता शाहिद कपूर यानं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज तो 25 फेब्रुवारी 2026 रोजी तो आपला 45वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहिद आणि मीरा राजपूत कपूर यांच्याबद्दल सांगायचं झालं तर दोघांची ओळख त्यांच्या कुटुंबियांनी राधा स्वामी सत्संग बियास या धार्मिक गटाद्वारे करून दिली. शाहिदला भेटण्यासाठी मीराला सुमारे सहा महिने लागले. पहिल्याच भेटीत दिल्लीतील एका फार्महाऊसवर सात तासांच्या संभाषणात शाहिद हा मीरापासून प्रभावित झाला होता. अभिनेता आपल्या पत्नीपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. शाहिदला मीराचा साधेपणा खूप चांगला वाटला होता. दरम्यान या जोडप्यानं 7 जुलै 2015 रोजी दिल्लीत लग्न केलं. या लग्नात कुटुंबिय आणि मित्र परिवार उपस्थित होता.
शाहिद कपूरचं वैयक्तिक आयुष्य : आज हे दोघे दोन मुलांचे पालक आहेत. या जोडप्यानं त्याची पहिली मुलगी म्हणजेच मीशाचे स्वागत 2016मध्ये केले. तर यानंतर त्याचा मुलगा झैन त्यांना 2018मध्ये झाला. या जोडप्याच्या लग्नाला 10 वर्ष पूर्ण झाले आहेत. आता शाहिद कपूरच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते आणि अनेक स्टार्स त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच शाहिदनं चित्रपटसृष्टीत स्वत:ची जागा निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. त्यानं सुरुवातीला अनेक जाहिरातींमध्ये काम केलं. यानंतर त्यानं बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम केलं. त्यानं 2003मध्ये प्रदर्शित झालेला रोमँटिक कॉमेडी 'इश्क विश्क' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर अमृता राव ही मुख्य भूमिकेत दिसली होती. या चित्रपटामुळं शाहिदीला खूप प्रसिद्धी मिळाली.
ओ'रोमियोची कमाई : दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला, विशाल भारद्वाज दिग्दर्शित शाहिद कपूर स्टारर नवीन रोमँटिक-थ्रिलर 'ओ'रोमियो' हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचं सोशल मीडियावर खूप कौतुक करण्यात आलंय. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर तृप्ती डिमरी, नाना पाटेकर, तमन्ना भाटिया, दिशा पटानी आणि अविनाश तिवारी हे स्टार्स दिसले आहेत. 'ओ'रोमियो' चित्रपटातील शाहिद आणि तृप्तीची केमिस्ट्री चाहत्यांना मोहित करणारी आहे. या चित्रपटानं जगभरात 100 कोटींहून अधिक कमाई केली आहे.
शाहिद कपूरचे हिट आणि सेमी-हिट चित्रपटांची लिस्ट
- कबीर सिंह
- पद्मावत
- उड़ता पंजाब
- हैदर
- आर राजकुमार
- बदमाश कंपनी
- कमीने
- जब वी मेट
- विवाह
- चुप चुप के
- 36 चाइना टाउन
- इश्क विश्क
हेही वाचा :
- शाहिद कपूर अभिनीत 'ओ' रोमियो'नं 'तू या मैं' चित्रपटाला दिला दणका, पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे आले समोर
- Exclusive Interview : माझ्याबरोबर 4 चित्रपट केल्याबद्दल शाहिद कपूरला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला पाहिजे - विशाल भारद्वाज
- शाहिद कपूरच्या 'ओ रोमियो' चित्रपटातील 'इश्क का फीव्हर' गाणं प्रदर्शित, प्रेक्षक अरिजीत सिंगसाठी झाले भावूक

