ETV Bharat / entertainment

लग्नाच्या 12 वर्षांनंतर रवी दुबे आणि सरगुन मेहताच्या घरात हलणार पाळणा? अभिनेत्रीनं दिली प्रतिक्रिया...

रवी दुबे आणि सरगुन मेहता हे पालक होणार असल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर अभिनेत्रीनं प्रतिक्रिया दिली आहे.

Sargun Mehta and  Ravi Dubey
रवी दुबे आणि सरगुन मेहता (Photo: Special Arrangement)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 21, 2026 at 11:30 AM IST

|

Updated : February 21, 2026 at 3:30 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : अभिनेता रवी दुबे आणि अभिनेत्री सरगुन मेहता हे टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात प्रसिद्ध आणि प्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. हे दोन्ही स्टार्स कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चेत असतात. आता लग्नाच्या 12 वर्षांनंतर सरगुन आणि रवी पुन्हा एकदा गरोदरपणाच्या कथित चर्चांमुळं हायलाईट झाले आहेत. सरगुन आणि रवी दुबे यांनी 2013मध्ये लग्न केलं. यानंतर दोघांनी देखील आपल्या करिअर लक्ष केंद्रित केलं. आता हे जोडपे आपल्या पहिल्या मुलाची अपेक्षा करत अशा अफवा पसवल्या होत्या. आता त्याच्या लग्नाला दशकाहून अधिक काळा झाला आहे. हे जोडपे पालक होणार असल्याचं म्हटलं जात होतं. दरम्यान सरगुन मेहतानं या बातमीबद्दल पुष्टी केली आहे. दरम्यान सरगुन मेहता गर्भवती असल्याची चर्चा यापूर्वी देखील झाल्या होत्या

रवी आणि सरगुन पालक होणार ? : रवी आणि सरगुन 'बिग बॉस 19'मध्ये त्यांच्या 'ज्युलिएट जट्ट दी' या शोच्या प्रमोशनसाठी आले होते, तेव्हाही हे जोडपे पालक होणार असल्याचा अफवा झाल्या होत्या. यानंतर या जोडप्याला रुग्णालयाबाहेर पाहिले गेले, ज्यामुळं चाहत्यांनी असा अंदाज आला की, हे स्टार्स लवकरच पालक होईल. तसेच काही दिवसांनी कळलं की, या अफवा होत्या.

आता सरगुन मेहतानेही प्रतिक्रिया दिली : सतत पसरणाऱ्या अफवांवर अभिनेत्री सरगुन मेहतानेही तिचे मत व्यक्त केले आहे. अभिनेत्रीने लिहिले आहे की, 'गेल्या 2 वर्षांपासून आमच्या गरोदरपणाच्या बातम्या आमच्यासमोर येत आहेत. त्यांच्या मते, मी गरोदर आहे, ही एक दीर्घकाळची गर्भधारणा आहे. 'हे बाळं कुठे जात आहेत आणि मी त्याला किती लवकर जन्म देणार आहे? हा प्रश्न मी विचारत आहे, की मी दोन वर्षांपासून गर्भवती आहे... की त्याहून अधिक काळ? ते माझ्या डॉक्टरांना ओळखतात का? की मी आता सलून किंवा कॅफेमध्ये गेल्यानं गर्भधारणा होते का? रवी आणि मला या गर्भधारणेबद्दल माहितीही नाही, म्हणून इतकी जाणीव ठेवल्याबद्दल धन्यवाद. शांत व्हा आणि निराधार बातम्या पसरवणे थांबवा. आम्हाला किंवा आमच्या टीमला याबद्दल लिहिण्यापूर्वी ही बातमी खरी आहे का असे विचारण्यास वेळ लागणार नाही.'

रवी आणि सरगुनची प्रेमकहाणी : दरम्यान रवी आणि सरगुनच्या प्रेमकहाणीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांची पहिली भेट '12/24 करोल बाग'च्या सेटवर झाली होती. यानंतर या दोन्ही स्टार्सची प्रेमकहाणी सुरू झाली. या मालिकेत त्यांनी एका ऑनस्क्रीन जोडप्याची भूमिका केली होती. त्यानंतर दोघेही खऱ्या आयुष्यात जोडपे बनले, या दोघांनी आपले नाते बराच काळ गुप्त ठेवले होते. तसेच रवीनं 'नच बलिये 5' दरम्यान सरगुनला प्रपोज केलं आणि 7 डिसेंबर 2013 रोजी त्यांनी लग्न केलं. दरम्यान या जोडप्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर सरगुन मेहता पंजाबच्या सर्वात यशस्वी स्टारपैकी एक आहे. याशिवाय रवी दुबे देखील त्याच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करत आहे. त्यानं अनेक हिट टीव्ही शो आणि वेब सीरीज काम केलंय. आता तो रणबीर कपूर अभिनीत 'रामायण'मध्ये दिसणार आहे. या बहुप्रतीक्षित चित्रपटात तो 'लक्ष्मण'ची भूमिका करणार आहे.

हेही वाचा :

  1. सरगुन मेहता आणि रवी दुबे यांनी दिली आनंदाची बातमी, वाचा सविस्तर...
  2. अपारशक्ती-सरगुन मेहताचं 'कुडीये नी' गाणं प्रदर्शित
Last Updated : February 21, 2026 at 3:30 PM IST