ETV Bharat / entertainment

सलमान खान स्टारर 'मातृभूमी' हा एक सामान्य वॉरवर आधारित चित्रपट नसेल, नवीन माहिती आली समोर....

सलमानला खानचा 'मातृभूमी' चित्रपट चर्चेत आला आहे. हा चित्रपट कधीही पारंपरिक वॉरचा असणार नाही असं अभिनेत्यानं स्पष्ट केलंय.

salman khan
सलमान खान (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : April 9, 2026 at 11:20 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद: अभिनेता सलमान खान अभिनीत 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' हा चित्रपट काही दिवसात रिलीज होईल.'मातृभूमी' संकल्पना ही नेहमीच थरारक युद्ध दृश्यांऐवजी एका भावनिक कथेवर केंद्रित राहिली आहे. आता असं म्हटलं जात की, अगदी पहिल्यापासूनच सलमाननं हे स्पष्ट होतं की 'मातृभूमी' हा कधीही एक पारंपरिक वॉर चित्रपट असणार नाही.

'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस'मध्ये दाखविण्यात येईल सैनिकाची मानवी बाजू : चित्रपटात एका सैनिकाची मानवी बाजू दाखविण्यात येईल. एक रणांगणावर आणि दुसरे घरी, असे दोन आयुष्य जगण्याचा भावनिक संघर्ष दाखविणं आवयश्क ठरेल असंही अभिनेत्यानं सांगितलं. ही संवेदनशीलता आणि विचारांमधील स्पष्टता याला खऱ्या अर्थानं इतरांपेक्षा वेगळे ठरवते. हा दृष्टिकोन नेहमीच्या युद्धकथांपेक्षा खूप वेगळा आहे, ज्यांमध्ये सैनिकांच्या अंतर्गत संघर्षावर आणि भावनिक गोंधळावर भर दिला जातो. प्रेम, त्याग आणि ओळख यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करून, हा चित्रपट केवळ अ‍ॅक्शन आणि देशभक्तीच्या पलीकडे जाऊन प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणार आहे.

'मातृभूमी' चित्रपटाबद्दल : 'मातृभूमी: मे वॉर रेस्ट इन पीस' या चित्रपटाची निर्मिती सलमान खान फिल्म्सच्या बॅनरखाली सलमा खान यांनी केली असून, दिग्दर्शन अपूर्व लाखिया यांनी केलंय. हा चित्रपट शौर्य, त्याग आणि लढाऊ वृत्तीचे एक धाडसी चित्रण असेल असे आश्वासन देतो. या चित्रपटामध्ये चित्रांगदा सिंग देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यापूर्वी 17 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता प्रदर्शनाची तारीख पुढं ढकलण्यात आली आहे.

'सिकंदर' चित्रपट शेवटचा चित्रपट : सलमान खानचे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची आतुरतेनं वाट पाहत आहेत. सध्या निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत कुठलही माहिती दिली नाही. दरम्यान, सलमान देखील त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. कामाच्या आघाडीवर, तो शेवटचा 'सिकंदर' चित्रपटात दिसला होता. त्याचा हा चित्रपट फ्लॉप ठरला. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत रश्मिका मंदान्ना ही साऊथ अभिनेत्री होती.

हेही वाचा :

  1. सलमान खानचा बॉडीगार्ड शेराची गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात याचिका, लवकरच सुनावणी
  2. साऊथ अभिनेत्री नयनतारा पहिल्यांदा सलमान खानबरोबर करणार काम, निर्मात्यांनी केला खुलासा
  3. सलमान खान, वामशी पैडीपल्ली आणि दिल राजू हे त्यांच्या आगामी 'SVC63' प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी येणार एकत्र