ETV Bharat / entertainment

यश स्टारर 'टॉक्सिक' चित्रपटातील मेलिसाच्या भूमिकेतील रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक प्रदर्शित...

'टॉक्सिक' चित्रपटामधील रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Toxic movie
'टॉक्सिक' चित्रपट (फर्स्ट लूक पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 6, 2026 at 1:00 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : दक्षिण सुपरस्टार यश अभिनीत बहुप्रतीक्षित 'टॉक्सिक' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाचा काही दिवसापूर्वी टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर अनेकांना आवडला होता. आता अनेकजण हा चित्रपट पाहण्यासाठी खूप उत्साहित आहेत. चित्रपटाची रिलीज तारीख जवळ येत असताना निर्माते प्रमुख अभिनेत्रींचे फर्स्ट लूक एकामागून एक प्रदर्शित करत आहेत. तारा सुतारियाचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. याशिवाय कियारा अडवाणी, हुमा कुरेशी आणि नयनतारा यांचे फर्स्ट लूकही आधीच प्रदर्शित केले गेले आहेत. आता 6 जानेवारी रोजी 'टॉक्सिक'च्या निर्मात्यांनी साऊथ अभिनेत्री रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक शेअर केला. या चित्रपटात रुक्मिणी वसंतची भूमिका काय असेल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक : गीतू मोहनदास दिग्दर्शित 'टॉक्सिक' या चित्रपटातील रुक्मिणी वसंतचा फर्स्ट लूक खूपच दमदार आहे. फर्स्ट लूकमध्ये, रुक्मिणी वसंतनं हिरव्या रंगाचा एक आकर्षक ड्रेस परिधान केला आहे. याशिवाय तिचे केस मागे बांधलेले आहेत आणि तिची ग्लॅमरस स्टाईल ही मोहित करणार आहे. या चित्रपटातील तिच्या पात्राचे नाव मेलिसा आहे. यापूर्वी, तारा सुतारियाचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये अभिनेत्री ऑफ-शोल्डर डार्क ड्रेसमध्ये, हातात बंदूक धरून असल्याची दिसली होती. या लूकमध्ये ती खूपच प्रभावी दिसत होती. 'टॉक्सिक' चित्रपटात तारा रेबेकाची भूमिका साकारणार आहे. आता 'टॉक्सिक' या चित्रपटाच्या कहाणीबद्दल अनेकजण उत्सुक आहेत. हा एक मास अ‍ॅक्शन चित्रपट असणार आहे.

'टॉक्सिक' चित्रपटाबद्दल : याशिवाय यापूर्वी चित्रपटातील नयनताराचा डॅशिंग फर्स्ट लूक खूप धमाकेदार होता. नयनताराची भूमिका गंगा नावाच्या मुलीची आहे. तसेच या चित्रपटामध्ये हुमा कुरेशी एलिझाबेथची भूमिका साकारणार आहे. याशिवाय कियारा अडवाणी नादियाची भूमिका करणार आहे. 'टॉक्सिक'मधील या चार अभिनेत्रींच्या भूमिका खूपच मनोरंजक, आश्चर्यकारक आणि रहस्यमय आहेत. यश आणि गीतू मोहनदास यांनी 'टॉक्सिक' चित्रपटाचं सहलेखन केलंय. तसेच गीतू मोहनदास यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाचे निर्माते वेंकट नारायण आणि यश आहेत. हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजीमध्ये चित्रित करण्यात आला आहे, मात्र हा हिंदी, तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि इतर अनेक भाषांमध्ये डब केला जाईल.'टॉक्सिक' 19 मार्च 2026 रोजी उगादी, गुढी पाडवा आणि ईदच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. तसेच रणवीर सिंगचा बहुप्रतीक्षित चित्रपट, 'धुरंधर 2', देखील त्याच तारखेला प्रदर्शित होईल. 'धुरंधर 2' आणि 'टॉक्सिक' यांच्यातील 2026 मधील आतापर्यंतची सर्वात मोठी टक्कर असण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

  1. Exclusive Interview: रुक्मिणी वसंत - 'कांतारा - चॅप्टर १' माझ्यासाठी एक मोठा शैक्षणिक आणि आध्यात्मिक प्रवास ठरला!
  2. 'टॉक्सिक'मधील तारा सुतारियाचा फर्स्ट लूक आला समोर, 'या' भूमिकेत चित्रपटात झळकणार
  3. सुपरस्टार यशच्या बिग बजेट 'टॉक्सिक'चं दिग्दर्शन करणाऱ्या गीतू मोहनदास कोण आहेत?