रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी नेपाळचं काय कनेक्शन? आतापर्यंत पाच आरोपींना झाली अटक
रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबार घटनेत धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. आता मुंबई पोलिसांच्या हाती एक मोठा पुरावा लागला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 28, 2026 at 1:09 PM IST
मुंबई : निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरातील गोळीबार घटनेत आता एक मोठा खुलासा झाला आहे. मुंबई पोलिसांच्या तपासात असं म्हटलं जात आहे की, हा एक आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. दरम्यान या तपासामध्ये खूप काही गोष्टी समोर आल्या आहेत. तपासात असेही उघड झाले की, एका व्यक्तीच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले होते. या खुलाशानंतर, पोलिसांना संशय आहे की, ही संपूर्ण घटना मोठ्या कटाचा भाग असेल. दरम्यान बँकांकडून आरोपींच्या खात्याचे तपशील आणि काय व्यवहार झाले याबद्दल कागदपत्रे मागितली गेले आहेत. आता या घटनेमागे कोण आहे, याबद्दल काहीही समोर आलं नाही.
रोहित शेट्टीच्या घरातील गोळीबार प्रकरण : तपासादरम्यान, नेपाळमधून पैसे दिले गेले असावे याचेही संकेत पोलिसांना मिळाले आहे. दरम्यान 'आग्रा मॉड्यूल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संशयित नेटवर्कची देखील चौकशी केली जात आहे. पोलीस सध्या वेगवेगळ्या पद्धतीनं चौकशी करत आहे. हा एक मोठा कट असू शकतो असाही पोलिसांचा संशय आहे. दरम्यान हे प्रकरण गांभीर्यानं घेत, मुंबई पोलिसांनी अनेक विशेष पथके तयार केली आहेत, ज्यामुळं आता याप्रकरणी खूप वेगानं चौकशी होत आहे. हे प्रकरण आता मुंबई गुन्हे शाखेकडे आहे, ज्यांनी सुरुवातीच्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले.
पाच आरोपींना अटक : तपासात असे दिसून आले की, गोळीबारात वापरलेले वाहन पुण्याहून आणले होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, कार पुण्यातील एका रहिवाशाची होती, ज्यानं ती कार काही दिवसांपूर्वी आदित्य गायकीला 30,000 रुपयांना विकली होती. आदित्य गायकी आणि दुसरा आरोपी समर्थ पोमाजी यांनी नंतर ती कार मुंबईच्या जुहू परिसरातील ठरविलेल्या एका ठिकाणी सोडली होती. यानंतर खरा प्लॉन सुरू झाला. आता ज्यांनी कार खरेदी केली, त्या लोकांना हे माहिती नाही की, खरा गोळीबार करणार कोण आहे. यानंतर शुभम लोंकारनं गोळीबार करणाऱ्याला नियुक्त केलेल्या ठिकाणाहून कार घेण्यास आणि गोळीबार करण्याची सूचना दिल्या होत्या. बहादुरगड स्पेशल टास्क फोर्सनं आतापर्यंत (एसटीएफ) युनिट आणि मुंबई पोलिसांनी पाच आरोपींना अटक केलं आहे.
हेही वाचा :

