रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' चित्रपटाचं सहाव्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन
'राजा शिवाजी'नं रिलीजच्या सहाव्या दिवशी म्हणजेच पहिल्या बुधवारी किती कमाई केली याबद्दल जाणून घ्या.

By ETV Bharat Entertainment Team
Published : May 7, 2026 at 1:34 PM IST
हैदराबाद : 'राजा शिवाजी' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत रितेश देशमुख असून त्यानेच याचं दिग्दर्शनही केलंय. हा चित्रपट 1 मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाला. या चित्रपटानं रिलीजच्या पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली. या चित्रपटानं मराठी चित्रपटासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी ओपनिंग देऊन एक इतिहास रचला आहे. या चित्रपटानं ओपनिंग वीकेंडला धमाकेदार कमाई केली. संमिश्र समीक्षणांमुळं, आता आठवड्याच्या दिवसांमध्ये चित्रपटाच्या कमाईमध्ये घट झाला आहे. चला जाणून घेऊया 'राजा शिवाजी'नं प्रदर्शनाच्या सहाव्या दिवशी किती कमाई केली.
'राजा शिवाजी'ची कमाई : रितेश देशमुखचा चित्रपट 'राजा शिवाजी' केवळ वीकेंडलाच नव्हे, तर भारतीय बॉक्स ऑफिसवर देखील छाप पाडत आहे. चित्रपटानं रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी 11.35 कोटींची कमाई केली. यानंतर पहिल्या सोमवार 5.60 कोटींची कमाई केली. मंगळवारी चित्रपटानं 4.90 कोटींचा व्यवसाय केला. आता हा चित्रपट 50 कोटींच्या आकड्याच्या जवळ पोहोचला आहे. हा चित्रपट 'वेड'च्या लाईफटाईम कलेक्शनला टक्कर देण्याच्या मार्गावर आहे. तसेच या चित्रपटाच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर यानं रिलीजच्या सहाव्या दिवशी पहिल्या बुधवारी, 4.25 कोटींची कमाई केली होती. या चित्रपटानं भारतात सहा दिवसात 48.65 कोटींची कमाई केली. आता 'राजा शिवाजी' तिसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याच्या मार्गावर आहे.
'राजा शिवाजी' टाकेल 'वेड'ला मागे : 'राजा शिवाजी' सध्या भारतातील आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाला तिसरे स्थान मिळवायचे असेल तर 61.2 कोटींचा आकडा पार करावा लागेल. 'राजा शिवाजी'नं ' 13 कोटींची कमाई केली तर तो 'वेड'ला मागे टाकेल. येत्या काळात कोणताही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्यानं हा चित्रपट 'बाप भारी देवा'लाही मागे टाकेल असं सध्याचं चित्र दिसत आहे. जिओ स्टुडिओज, मुंबई फिल्म कंपनी प्रॉडक्शनद्वारे प्रस्तुत 'राजा शिवाजी' हा ज्योती देशपांडे आणि जेनेलिया देशमुख यांनी निर्मित केला आहे.
भारतातील आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप 10 मराठी चित्रपटांची यादी
- सैराट – 90 कोटी
- बाई पण भारी देवा – 76.28 कोटी
- वेड - 61.2 कोटी
- राजा शिवाजी – 47.6 कोटी (६ दिवस)
- नटसम्राट - 42 कोटी
- पावनखिंड -37.72 कोटी
- लय भारी – 37 कोटी
- कट्यार काळजात घुसली – 35 कोटी
- ठाकरे - 31.6 कोटी
- टाईमपास – 30 कोटी
हेही वाचा :

