ETV Bharat / entertainment

विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या संगीतमधील झलक आली समोर

विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचं लग्न होण्यासाठी काही क्षण बाकी आहे. आता यापूर्वी या जोडप्याच्या संगीत कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

rashmika mandanna and vijay deverakonda sangeet ceremony
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवेरकोंडा संगीत सोहळा (IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 26, 2026 at 10:50 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : अभिनेता विजय देवेराकोंडा आणि अभिनेत्री रश्मिका मंदान्नाच्या लग्नाचा उत्सव उदयपूरच्या अरावली हिल्समधील आयटीसीच्या मेमेंटोस येथे होत आहे. रश्मिका आणि विजयच्या प्रीमियर लीग, पूल पार्टी आणि हळदीच्या झलकांनंतर, संगीत समारंभाची झलक सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. आज 26 फेब्रुवारी 2026 रोजी या जोडप्याचं लग्न होणार आहे. काही क्षणात दोघेही सप्तपदी करतील. दरम्यान या जोडप्याच्या संगीतमधील एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे. यामध्ये हे जोडपे एकामेकांचा हात पकडून असल्याचं दिसत आहेत. या जोडप्यानं संगीत समारंभाची पूर्ण गोपनीयता राखली आहे. या दोघांनी त्यांच्या चाहत्यांना लग्नातील हळदीची झलक दाखवली आहे. मात्र संगीतामधील फोटो त्यांनी अजूनही चाहत्यांबरोबर शेअर केले नाही.

विजयची आईनं दिला संदेश : मात्र व्हायरल झालेल्या फोटोत दोघेही चमकदार पोशाखात असल्याचं दिसत आहे. रश्मिका मंदान्ना एका आकर्षक चांदीच्या पोशाखात खूप सुंदर दिसत आहे. कार्यक्रमस्थळी जोडप्याचे काही जुने फोटो देखील लावले गेले आहेत. या फोटोद्वारे त्यांच्या प्रवासाची एक झलक दाखवण्यात आली आहे. दरम्यान एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत विजयची आई माधवीनं तिच्या मुलासाठी आणि भावी सूनसाठी एक खास संदेश दिला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं, "नमस्कार मित्रांनो, मी हा सरप्राईज परफॉर्मन्स माझ्या लाडक्या बंगाराम (सोना) विजय आणि रुशीला समर्पित करते. आम्हाला तुमच्यावर खूप प्रेम आहे." विजय आईनं हा संदेश दिल्यानंतर हा कार्यक्रम अधिकच विशेष झाला.

दोन संस्कृतींचे मिश्रण : दरम्यान 24 फेब्रुवारी रोजी हळदी आणि मेहंदी समारंभ हा जल्लोषात साजरा करण्यात आला. दरम्यान गुरुवार, 26 फेब्रुवारी रोजी विजय आणि रश्मिका अधिकृतपणे पती-पत्नी बनतील. या दोघांच्या लग्नाच्या निमित्ताने दोन संस्कृतींचा मिलाफ होणार आहे. सकाळी तेलुगू रीतिरिवाजांनुसार आणि दुसरा संध्याकाळी कोडावा (कूर्ग) परंपरेनुसार असे दोन वेगवेगळ्या पद्धतीचे मंगल विधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान 2018 मध्ये 'गीता गोविंदम' चित्रपटाच्या सेटवर विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्नाची प्रेमकहाणी सुरू झाली होती. आता हे जोडपं आपल्या आयुष्यातील एक नवा अध्याय सुरू करत आहे.

हेही वाचा :

  1. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नात कोण पाहुणे येईल, 'विरोश प्रीमियर लीग' झाले फोटो व्हायरल...
  2. रश्मिका मंदान्नानं लग्नापूर्वी जपानी डिनरचं केलं आयोजन, विजय देवरकोंडानं स्विमिंग पूलमध्ये व्हॉलीबॉल खेळण्याचा घेतला आनंद
  3. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना करणार 'या' ठिकाणी लग्न...