रश्मिका मंदान्ना अभिनीत 'मैसा' होणार 'या' दिवशी रिलीज, जाणून घ्या तारीख
रश्मिका मंदान्नाची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट 'मैसा' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : September 1, 2026 at 4:59 PM IST
हैदराबाद : रश्मिका मंदान्ना अभिनीत, बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या 'मैसा'च्या प्रदर्शनाची तारीख आज, 1 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. 'मैसा' हा सर्वाधिक महिला-प्रधान, पॅन-इंडिया चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे, यात रश्मिका तिच्या आतापर्यंतच्या सर्वात दमदार अवतारात दिसणार आहे. निर्मात्यांनी तिचे अनेक लूक पोस्टर्स आधीच प्रदर्शित केले आहेत. या चित्रपटाचे पोस्टर पाहून अनेकजण उत्सुक झाले आहेत. रश्मिका तिच्या अष्टपैलू अभिनयासाठी, पडद्यावरील प्रभावी उपस्थितीसाठी आणि प्रत्येक भूमिकेत दमदार अभिनय करते. आता, 'मैसा'मध्ये ही अभिनेत्री धमाकेदार अवतारात दिसणार आहे, यापूर्वी कधीही न पाहिलेल्या रूपात पडद्यावर रश्मिका दिसेल.
मैसा' चित्रपटाची होईल बॉक्स ऑफिस टक्कर : 'मैसा' चित्रपट 27 नोव्हेंबर 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच दिवशी इमरान हाश्मीचा 'गनमास्टर जी9' आणि आयुष्मान खुरानाचा 'ये प्रेम मोल लिया' हे चित्रपटही प्रदर्शित होत आहेत. इमरान हाश्मीनं 'आवारपन 2'मधून दमदार पुनरागमन केलंय आणि 'गनमास्टर जी9' चांगली कमाई करेल ही शक्यता आहे. दुसरीकडे, आयुष्मान बऱ्याच काळापासून एका मोठ्या हिट चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहे. बॉक्स ऑफिसवर या तिन्ही चित्रपटांचे एकाच वेळी प्रदर्शित होत असल्यानं कुठला चित्रपट बाजी मारेल हे काही दिवसात समजेल. दरम्यान या तिन्ही कलाकारांचा मोठा चाहतावर्ग आहे.
'मैसा' चित्रपटाच्या निर्मात्यांनी काय म्हटले? : निर्मात्यांनी सोशल मीडियावर रश्मिकाच्या पात्राची एक उत्कंठावर्धक झलक शेअर करून प्रदर्शनाची तारीख जाहीर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, "अनफॉर्म्युला फिल्म्स निर्मित आणि रवींद्र पुल्ले दिग्दर्शित 'मैसा' हा आदिवासी भागांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक भावनिक ॲक्शन थ्रिलर आहे. या चित्रपटात अप्रतिम दृश्ये, उत्कंठावर्धक कथा आणि रश्मिकाचा अविस्मरणीय अभिनय आहे.' दरम्यान या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. रश्मिका मंदान्नाचे चाहते तिच्या लूकचे कौतुक करत आहेत. रश्मिका मंदान्नाच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर ती पुढं 'राणाबाली', 'पुष्पा 3: द रैम्पेज' आणि 'ॲनिमल' पार्क' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

