रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नात कोण पाहुणे येईल, 'विरोश प्रीमियर लीग' झाले फोटो व्हायरल...
अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाला फक्त एक दिवस बाकी आहे. आता लग्नापूर्वी काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

By ETV Bharat Entertainment Team
Published : February 25, 2026 at 10:57 AM IST
हैदराबाद : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनची सुरुवात राजस्थानमधील उदयपूरच्या तलावांच्या शहरात झाली आहे. आता हे जोडपे लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. याशिवाय या जोडप्याच्या चाहत्यांनी त्यांना टोपणनाव, 'विरोश' दिलंय. सध्या त्याचं नवीन दिलं गेलेलं नाव सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. विजय आणि रश्मिका त्यांच्या कुटुंबासह आणि जवळचा मैत्र परिवार देखील त्यांच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी राजस्थानमध्ये पोहोचले आहेत. या जोडप्याचा लग्नाचा सोहळा खूप भव्य पद्धतीनं होणार आहे. 23 फेब्रुवारीपासून प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू झाले आहेत. दरम्यान मंगळवारी, विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर सामन्याची एक झलक शेअर केली, ज्यामध्ये 'विरोश प्रीमियर लीग' लिहिलेली क्रीम रंगाची लाकडी बॅट आणि लाल क्रिकेट बॉलचा ग्राफिक असलेला एक सजावटीचा बॉक्स दाखवला गेला, ज्यावर त्यांच्या लग्नाची तारीख 26.02.26 लिहिलेली होती. 24 फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये त्यांच्या लग्नापूर्वीच्या सेलिब्रेशनचा भाग म्हणून 'विरोश प्रीमियर लीग' नावाचा क्रिकेट सामना आयोजित केला, जिथे त्यांनी जवळच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि मित्रांसह एक मजेदार खेळ खेळला.
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नात कोण येईल : अलीकडेच पूलसाईडवरील मजामस्तीपासून ते एका भव्य जपानी डिनरपर्यंतेचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. आता या दोन्ही स्टार्सच्या लग्नात कुठले स्टार्स येणार, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. रश्मिकाच्या आगामी 'द गर्लफ्रेंड' चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल रवींद्रन आणि अभिनेत्री आशिका रंगनाथ हे आता उदयपूरला लग्नासाठी पोहोचले आहेत. दिग्दर्शक तरुण भास्कर आणि ईशा रेब्बा यांनी देखील लग्नासाठी हजेरी लावली आहे. तसेच कबीर सिंग आणि अॅनिमल सारखे चित्रपट बनवणारे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा, सलमान खान, अल्लू अर्जुन, करण जोहर,विकी कौशल, क्रिती सेनॉन आणि रणबीर कपूर हेही लग्नात सहभागी होऊ शकतात. सध्या सोशल मीडियावर या जोडप्यांच्या लग्नाच्या चर्चा होत आहेत. काही दिवसापूर्वी विजय देवरकोंडाचे हैदराबादमधील घर हे एका वधूप्रमाणे सजवले गेले होते.


रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्याबद्दल : सध्या उदयपूरमध्ये अनेक स्टार्सचं आगमन सुरू झालंय. आता या दोन्ही स्टार्सच्या लग्नासाठी त्यांचे चाहते देखील खूप उत्साहित आहे. दरम्यान रश्मिका आणि विजयची प्रेमकहाणी 2018 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'गीता गोविंदम' दरम्यान सुरू झाली, त्यानंतर ते 2019मध्ये 'डियर कॉम्रेड'मध्ये एकत्र दिसले. रश्मिकानं यापूर्वी रक्षित शेट्टीबरोबर 2017मध्ये साखरपूडा केला होता. मात्र काही दिवसानंतर तिनं आपला साखरपुडा तोडला दुसरीकडे विजयचे यापूर्वी एका बेल्जियन महिलेशी नाव जोडले गेले होते.
हेही वाचा :

