ETV Bharat / entertainment

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाह तेलुगू परंपरेनुसार झाला संपन्न...

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा तेलुगू परंपरेनुसार विवाह झाला आहे. आता त्यांच्यावर अनेकजण अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

rashmika mandanna and vijay deverakonda Wedding
रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचा विवाह (Photo: IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 26, 2026 at 1:24 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांचं लग्न तेलुगु परंपरेनुसार झालं आहे. दुसरे लग्न रश्मिका मंदान्नाच्या कोडावा (कूर्ग) परंपरेनुसार काही क्षणात होईल. आता हे जोडपे अधिकृतपणे पती पत्नी झाले आहेत. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या फोटोंची चाहत्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे. रिपोर्टनुसार रश्मिकाचा कोडावा परंपरेनुसार विवाह सूर्यास्तदरम्यान सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास होईल. विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना लग्नबंधनात अडकल्यानंतर त्यांचे चाहते देखील खूप खुश झाले आहेत. आता चाहते सोशल मीडियावर या जोडप्याला शुभेच्छा देत आहेत.

विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांचं झालं लग्न : दरम्यान विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्नाच्या लग्नाचा उत्सव उदयपूरमध्ये मोठ्या जल्लोषात झाला आहे. आज 26 फेब्रुवारी 2026 हा दिवस या दोघांसाठी खूप विशेष आहे. या जोडप्याच्या लग्नामध्ये अनेक स्टार्सनं हजेरी लावली आहे. तसेच त्यांच्या लग्नाच्या गोपनीयतेसाठी फोन न वापरण्याचे कडक नियम लागू केले गेले आहेत. पाहुण्यांना त्यांचे मोबाईल प्रवेशद्वारावर ठेवावे लागले. यामुळे या लग्नातील आणि कार्यक्रमादरम्यान कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले नाही. याशिवाय या जोडप्यानं संगीत समारंभाची पूर्ण गोपनीयता राखली असून त्यांनी फक्त लग्नातील हळदीची झलक चाहत्यांना दाखवली.

2025 मध्ये साखरपुडा झाल्याची बातम्या पसरल्या : लग्नाचे सर्व कार्यक्रम उदयपूरमध्ये झाले असून त्यानंतर हैदराबादमध्ये रिसेप्शन होणार आहे. दरम्यान विजय आणि रश्मिका यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं होत की, त्यांच्या चाहत्यांनी त्यांना विरोश हे नाव दिले होतं, म्हणून त्यांनीही त्यांच्या लग्नाचे नाव 'विरोशचे लग्न' ठेवलंय. तसेच हे जोडपे बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. या दोघांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही उघडपणे सांगितलं नाही. दरम्यान ऑक्टोबरमध्ये 2025 मध्ये त्यांचा साखरपुडा झाल्याची बातमी समोर आली होती. यानंतर त्यांच्या लग्नाबद्दल बातम्याही सोशल मीडियावर येत होत्या.

हेही वाचा :

  1. विजय देवेराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या संगीतमधील झलक आली समोर
  2. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्नापूर्वी सेटवर प्रेमात पडल्यानंतर 'या' स्टार्सनं केलं लग्न, पाहा यादी
  3. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नात कोण पाहुणे येईल, 'विरोश प्रीमियर लीग' झाले फोटो व्हायरल...