ETV Bharat / entertainment

रॅपर बादशाहनं लग्नाच्या पाच महिन्यांनंतर ईशा रिखीसोबतच्या घटस्फोटाला दिला दुजोरा, पोस्ट व्हायरल

रॅपर बादशाहनं ईशा रिखीसोबतच्या घटस्फोटाला दुजोरा दिला आहे. लग्नाच्या पाच महिन्यानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.

Badshah, Isha Rikhi Announce Divorce 5 Months After Marriage
बादशाह आणि ईशा रिखी यांनी लग्नाच्या 5 महिन्यांनंतर घटस्फोटाची घोषणा केली. (Photo: ANI/ IANS)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : September 1, 2026 at 10:07 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : रॅपर गायक बादशाह चर्चेत आला आहे. त्यानं दुसरे लग्न केल्याचं उघड केलं असून तो आता घटस्फोट घेत असल्याची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फोटो समोर आले होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर देखील बादशाहनं त्याच्या लग्नाबद्दल काहीही उघड केलं नव्हत. बादशाहनं पंजाबी अभिनेत्री ईशा रिखीबरोबर विवाह केला होता. दरम्यान लग्नानंतर अवघ्या तीन महिन्यांतच त्यांच्या नात्यात तणाव निर्माण झाल्याचं समोर आलं होतं. यानंतर जुलैमध्ये ईशा रिखीनं एक सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट देखील सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली. यानंतर घटस्फोटाच्या अफवांना सुरू झाल्या.

बादशाहनं हे नाते खाजगी ठेवलं : दरम्यान एका पोस्टद्वारे बादशाह आणि ईशा रिखीनं त्यांच्या घटस्फोटाची घोषणा केली आहे. या रॅपरचं नात लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यांतच संपुष्टात आलं. या दोघांनी 31 ऑगस्ट रोजी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करून स्पष्ट केलं की, ते वेगळे होण्याचा निर्णय घेत आहे. तसेच आतापर्यंत, बादशाहनं सोशल मीडियावर लग्नाचे कोणतेही फोटो पोस्ट केले नव्हते, त्यामुळं अनेकांनी अंदाज लावला होता, की तो या लग्नापासून खुश नाही.

बादशाह आणि ईशाची पोस्ट : तसेच रॅपरनं कधीही त्यांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं नाही. मात्र त्यानं आता पोस्ट शेअर करून घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चकित केलं आहे. बादशाहननंत्याच्या संयुक्त पोस्टमध्ये लिहिलं, 'मी आणि ईशा रिखीनं परस्पर संमतीनं वेगळे होण्याचा आणि आपापल्या मार्गानं जाण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय परस्पर आदरानं घेण्यात आला आहे आणि आम्ही सर्वांना विनंती करतो की, यावेळी आमच्या गोपनीयतेचा आदर करावा. या विषयावर हे आमचे एकमेव निवेदन असणार आहे. आम्ही नम्रपणे विनंती करतो की, आमच्या नात्याबद्दल यापुढं कोणतीही तर्कवितर्क लावू नयेत.'

Badshah
बादशाह (Instagram Post)

घटस्फोटाच्या अफवा : आतापर्यंत, बादशाहनं ईशा रिखीसोबतचं लग्न हे खाजगी ठेवलं होतं. बादशाह आणि ईशा यांनी कधीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे चर्चा केली नाही, तसेच त्यांनी लग्नाची अधिकृत घोषणा केली नाही. मात्र ईशाच्या आईनं त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, जे नंतर ईशानं देखील शेअर केले. ईशाच्या अलीकडील काही पोस्ट्समधून असे संकेत दिले होते की, बादशाह आणि तिच्या नात्यात काही ठीक नाही. तिनं जुलै आणि ऑगस्टमध्ये काही भावनिक पोस्ट्स शेअर केल्या. यानंतर बादशाहच्या घटस्फोटाच्या अफवा पसरल्या.

हेही वाचा :

  1. समय रैनाच्या 'इंडियाज गॉट लेटेंट सीझन 2'मुळं हनी सिंग आणि बादशाह चर्चेत, व्हिडिओ व्हायरल...
  2. 'इंडियाज गॉट लॅटेंट 2'ची घोषणा झाल्यानंतर समय रैनाला रॅपर बादशाहनं दिला सल्ला...
  3. गायक-रॅपर बादशाहनं 'या' पंजाबी अभिनेत्रीशी केलं लग्न, फोटोसह व्हिडिओ व्हायरल...