ETV Bharat / entertainment

अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांच्या 'रामजी आके भला करेंगे' गाण्याचा टीझर प्रदर्शित...

'भूत बंगला' चित्रपटामधील 'रामजी आके भला करेंगे' गाण्याचा टीझर हा प्रदर्शित केला गेला आहे.

Ram ji aake bhala karenge song teaser out
'भूत बंगला'मधील 'रामजी आके भला करेंगे'चा टीझर रिलीज (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : February 25, 2026 at 5:12 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : 'भूत बंगला' हा 2026 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाद्वारे 14 वर्षांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन दिग्गज, अक्षय कुमार आणि प्रियदर्शन एकत्र येत आहेत. बालाजी मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली निर्मित होणाऱ्या या चित्रपटानं रिलीजपूर्वी खूप लोकप्रियता मिळवली आहे. या जोडीचे कल्ट कॉमेडी चित्रपट हे संपूर्ण हिटचे झाले आहेत. आता प्रेक्षकांना 'भूत बंगला' याबद्दल देखील प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. दरम्यान निर्मात्यांनी चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचा, 'रामजी आके भला करेंगे'चा टीझर रिलीज केला आहे, जो खूप मजेशीर आणि मनोरंजक आहे. या टीझरमध्ये अक्षयचा विनोदी अंदाज आणि वेडेपणा दिसत आहे. त्यामुळं चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. गाण्याच्या टीझरमध्ये अक्षय कुमार त्याच्या जुन्या व्यक्तिरेखेत दिसतो. या चित्रपटामधील पूर्ण गाणं उद्या म्हणजेच 26 फेब्रुवारी 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

'भूत बंगला'मधील 'रामजी आके भला करेंगे'चा टीझर रिलीज : 'भूत बंगला' या चित्रपटामधील 'रामजी आके भला करेंगे' गाणं उत्साही असणार असं टीझरवरून दिसून येत आहे, आकर्षक बीट्स आणि अक्षयच्या सिग्नेचर कॉमिक टायमिंगनं परिपूर्ण गाण्याला संगीत प्रीतम यांनी दिलंय. या गाण्याला कुमार यांनी लिहिलेले आहे. हे गाणे देव अरिजीत यांनी गायले आहे. यासोबतच मेलो डी यांनी लिहिलेले आणि सादर केलेले रॅप सेगमेंट हे गाण्याला आणखी विशेष बनवते. या गाण्याची सुरुवात खूप धमाकेदर आहे. 'रामजी आके भला करेंगे' टीझरची झलक दिग्गज सर्जनशील जोडीच्या पुनरागमनाचे प्रतीक आहे. 'भूत बंगला' या चित्रपटावर बऱ्याचं दिवसांपासून काम सुरू आहे.

'भूत बंगला' चित्रपटातील स्टारकास्ट : बालाजी मोशन पिक्चर्स (बालाजी टेलिफिल्म्स लिमिटेडचा एक विभाग) आणि केप ऑफ गुड फिल्म्स संयुक्तपणे 'भूत बंगला' सादर करत आहे. या चित्रपटामध्ये अक्षय कुमार व्यतिरिक्त वामिका गब्बी, परेश रावल, तब्बू आणि राजपाल यादव हे स्टार्स देखील आहेत. प्रियदर्शन दिग्दर्शित, हा चित्रपट अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता आर. कपूर यांनी निर्मित केला आहे. हा चित्रपट 10 एप्रिल 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. आता या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना हॉरर कॉमेडी पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा :

  1. 'भूत बंगला' चित्रपटातील पोस्टरसह नवीन रिलीज तारीख आली समोर
  2. अक्षय कुमारच्या कारला धडक, अपघात ऑटोरिक्षा चालक झाला जखमी...
  3. बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना आणि इतर सेलिब्रिटींनी केले मतदान...