मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटातून प्राजक्ता कोळीसह 'हे' स्टार्स देणार महत्वाचा संदेश...
'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटातून यूट्यूबर प्राजक्ता कोळी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आता अनेकांना आवडत आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : December 20, 2025 at 1:21 PM IST
मुंबई - मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक दमदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. हेमंत धोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर एक चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटामध्ये प्रसिद्ध यूट्यूबर प्राजक्ता कोळी दिसणार आहे. तिचा हा मराठीमधील पहिला चित्रपट आहे. ती या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम'ची निर्मिती क्षिती जोग करत असून या चित्रपटामध्ये प्राजक्ता कोळी व्यतिरिक्त सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ हे कलाकार देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. आता काही दिवसापूर्वीचं प्राजक्ता कोळीनं या चित्रपटाबद्दल खुलासा करत विशेष गोष्टी सांगितल्या होत्या.
प्राजक्ता कोळीनं व्यक्त केल्या भावना : यावेळी तिच्याबरोबर सचिन खेडेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि अमेय वाघ हे कलाकार होते. तिनं आपल्या बालपणीच्या शाळेबद्दल उल्लेख करत तिच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला होता. या चित्रपटामध्ये प्राजक्ता ही एका वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याशिवाय ती तिच्या पहिल्या मराठी चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याची देखील दिसली. तसेच तिनं यावेळी सांगितलं की, जर तिच या चित्रपटामध्ये अभिनय करताना काही चूकलं असेल तर तिला प्रेमानं सांगाव. प्राजक्तासाठी तिचा हा पहिला मराठी चित्रपट खूप विशेष आहे. ती पुढेही मराठी चित्रपटसृष्टीत काम करेल असेही तिनं सांगितलं. आता प्राजक्ताच्या या आगामी चित्रपटाला पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. दरम्यान काही दिवसापूर्वी ट्रेलर प्रकाशन सोहळा प्रत्यक्ष त्याच शाळेत आयोजित करण्यात आला होता, जिथे चित्रपटाचं शूटिंग झालं होतं.
'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपटाबद्दल : दरम्यान हा चित्रपट यशस्वी मराठी चित्रपट 'झिम्मा'च्या टीमनं तयार केला आहे. 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' चित्रपट मराठी-माध्यम शाळेवर आधारित आहे, ज्या आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या चित्रपटामध्ये संघर्ष समुदाय आणि मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहेत. दरम्यान वैयक्तिक पातळीवर शिक्षकांना मराठी माध्यामाची शाळा चालवत असताना किती आव्हाने येतात, हेही यात दाखविण्यात आलं आहे. या चित्रपटाच्या माध्यामातून या चित्रपटातील स्टार्स प्रेक्षकांना महत्वाचा एक संदेश देणार आहे. दरम्यान प्राजक्ता कोळीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर ती शेवटी 'सिंगल पापा' या सीरीजमध्ये कुणाल खेमूबरोबर दिसली होती. या सीरीजमध्ये तिनं खूप चांगला अभिनय केला आहे.
हेही वाचा :

