ETV Bharat / entertainment

ऑगस्टचा शेवटचा आठवडा असणार धमाकेदार, मनोरंजनासाठी दमदार चित्रपट आणि सीरीज रिलीज...

या वीकेंडला पाहण्यासाठी काहीतरी नवीन शोधत आहात का? तुम्ही आम्ही सुचवलेले चित्रपट ओटीटीवर पाहू शकता.

bandar and babita singh reporting
'बबिता सिंग रिपोर्टिंग'/'बंदर' (Poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : August 29, 2026 at 5:01 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

हैदराबाद : ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ओटीटीवर विविध प्रकारचे चित्रपट आणि शोज येत आहेत, ज्यात बायोग्राफिकल ड्रामा,क्राइम थ्रिलर, कौटुंबिक मनोरंजक चित्रपट आणि माहितीपटांचा समावेश आहे. या वीकेंडला नेटफ्लिक्स, ॲमेझॉन आणि इतर प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या नवीन चित्रपट आणि शोजची यादी खाली दिली आहे, ज्यांचा आनंद तुम्ही घरबसल्या तुम्ही घेऊ शकता.

'बंदर'

स्ट्रीमिंगची तारीख: 28 ऑगस्ट

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: झी5

अनुराग कश्यपच्या 'बंदर' या चित्रपटात बॉबी देओल आणि सान्या मल्होत्रा ​​यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा एक डार्क ड्रामा आहे. ही कथा एका टेलिव्हिजन कलाकाराची आहे, ज्याचे आयुष्य एका गंभीर आरोपानंतर पूर्णपणे उलटेपालटे होते. हा चित्रपट माध्यमांची छाननी, सामाजिक मत आणि जनमताच्या न्यायालयात पारखले जाण्याचा परिणाम यावर प्रकाश टाकतो.

'अल्फा'

स्ट्रीमिंगची तारीख: 28 ऑगस्ट

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील 'अल्फा' या हाय-ऑक्टेन अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट दोन अत्यंत प्रशिक्षित महिला एजंटची कथा सांगतो, ज्या एका धोकादायक मोहिमेवर निघतात, जी त्यांच्या कौशल्याची आणि निष्ठेची कसोटी घेते.

'चुंबक'

स्ट्रीमिंगची तारीख: 28 ऑगस्ट

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: नेटफ्लिक्स

'चुंबक' हा एक कॉमेडी-ड्रामा आहे, जो विविध व्यक्ती आणि कुटुंबांच्या नात्यांचा वेध घेतो. सुमीत व्यास, नीना गुप्ता, देवन भोजानी आणि अमिरा दस्तूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नाती, रोजचे संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी उलथापालथ दाखवतो.

'बबिता सिंग रिपोर्टिंग'

स्ट्रीमिंगची तारीख: 28 ऑगस्ट

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: ॲमेझॉन प्राइम व्हिडिओ

'बबिता सिंग रिपोर्टिंग' हा एक इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर आहे, ज्यात निमिषा सजयन आणि बरुण सोबती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. निमिषा सजयननं यात बबिता 'बेबी' सिंगची भूमिका साकारली आहे, जी एक नवीन पोलीस अधिकारी असून सर्वांची आवडती बनण्याचा प्रयत्न करत असते. तिला निलंबित केले जाते, पण याच काळात तिला तिच्या वहिनीच्या डोहाळेजेवणासाठी गावी परतण्याची संधी मिळते. मात्र, घरी परतण्याच्या पहिल्याच रात्री तिच्या बालपणीच्या मित्राची, बन्सीची (बरुण सोबती), हत्या झाल्यावर हा प्रवास एक दुःखद वळण घेतो. काय घडले हे शोधण्यासाठी बबिता स्वतःचा गुप्त तपास सुरू करते.

'मायकल'

स्ट्रीमिंगची तारीख: 29 ऑगस्ट

स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म: जिओ हॉटस्टार

'मायकल' हा चित्रपट पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात जाफर जॅक्सननं या दिग्गज गायकाची भूमिका साकारली आहे. हा बायोपिक ड्रामा जॅक्सनचा जागतिक प्रसिद्धीपर्यंतचा विलक्षण प्रवास, त्याचे संगीत आणि सादरीकरण यांचा मागोवा घेतो, तसेच त्याच्या भव्य सार्वजनिक प्रतिमेमागे दडलेल्या वैयक्तिक संघर्षांवरही प्रकाश टाकतो. 'किंग ऑफ पॉप'च्या चाहत्यांसाठी ही आता आनंदाची बातमी आहे.