शाहिद कपूर अभिनीत 'ओ रोमियो'चा टीझर झाला प्रदर्शित, पाहा व्हिडिओ...
शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांचा 'ओ रोमियो'चा टीझर हा रिलीज करण्यात आला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 10, 2026 at 1:48 PM IST
मुंबई : अभिनेता शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाजची 'कमीने' जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. या जोडीचा 'ओ रोमियो' चित्रपट पुढील महिन्यात रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 9 जानेवारी रोजी शाहिद कपूरच्या चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रदर्शित झाले आणि आज, 10 जानेवारी रोजी, टीझरची प्रतीक्षा संपली आहे. 'ओ रोमियो'च्या टीझरमध्ये शाहिद कपूरची शैली पूर्णपणे वेगळी आणि अनोखी असल्याची दिसली आहे. टीझरमध्ये शाहिद कपूरबरोबर दिसणाऱ्या कलाकारांचे चेहरे आणि त्यांच्या भूमिका उघड झाल्या आहेत. शाहिद कपूरच्या नवीन चित्रपट 'ओ रोमियो'चा टीझर कसा आहे, याबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
'ओ रोमियो'चा मॅसी-क्लासी टीझर प्रदर्शित : 'ओ रोमियो'चा 1.35 मिनिटांचा टीझर अॅक्शन आणि हिंसाचारानं भरलेला आहे, ज्यामध्ये शाहिद कपूरचा रोमियोसारखाच लूक दाखवण्यात आला आहे. रक्तानं माखलेला हा शाहिद कपूर पहिल्यांदाच इतकी भव्य आणि क्लासी भूमिका आहे. जरी त्यानं 'कमीने', 'हैदर' आणि 'कबीर सिंग'मध्येही त्याची अनोखी शैली दाखवली असली तरी, हा चित्रपट त्यापेक्षा वेगळा असणार आहे. या चित्रपटामध्ये 'लैला-मजनू'ची भूमिका करणारा आशिष तिवारी हा टीझरमध्ये सर्वात प्रभावी आणि आकर्षक आहे. आशिषच्या लूकला बरीच पसंती मिळाली आहे असे दिसून येत आहे. टीझरमध्ये नाना पाटेकर आणि फरीदा जलाल सारखे दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये देखील दिसत आहेत. तमन्ना भाटिया आणि तृप्ती डिमरीच्या भूमिका देखील या चित्रपटामध्ये धमाकेदार असणार आहेl. टीझरमध्ये दोन्ही सुंदरी सायलेंट मोडमध्ये दिसत आहेत. याशिवाय चित्रपटामध्ये दिशा पटानी आणि विक्रांत मेस्सी एका अनोख्या अंदाजात दिसत आहे.
'ओ रोमियो' चित्रपटाबद्दल : चित्रपटाचे दिग्दर्शन सिनेमाचे मास्टर स्टोरीटेलर विशाल भारद्वाज करत आहेत, ज्यांच्याबरोबर शाहिद कपूरनं यापूर्वी 'हैदर' आणि 'कमीने' यासारखे चित्रपट केले आहेत. शाहिद कपूरबरोबर तृप्ती डिमरी देखील चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत, ज्याची उपस्थिती कथेच्या उत्सुकतेत भर घालण्याचे आश्वासन देते. हा चित्रपट नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटद्वारे निर्मित केला जात आहे आणि 13 फेब्रुवारी 2026 रोजी व्हॅलेंटाईन डे रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय 'ओ' रोमियो' हा फक्त एक चित्रपट नाही, तर प्रेक्षकांसाठी एक तीव्र, अप्रत्याशित आणि भावनिक चित्रपट प्रवास असल्याचं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही.
हेही वाचा :

