क्रिती सेनॉन आणि वरुण शर्मा यांचा 'लॉलीपॉप लागलेलू'वर धमाकेदार डान्स, नुपूर -स्टेबिन बेन यांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल...
नुपूर सेनॉन आणि स्टेबिन बेन यांच्या लग्नामधील संगीत समारंभाचा सोहळा पार पडला. यामधील क्रिती सेनॉन आणि वरुण शर्माचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 10, 2026 at 12:35 PM IST
मुंबई - अभिनेत्री नुपूर सेनॉन आणि गायक स्टेबिन बेन यांच्या संगीत समारंभातील मजेदार आणि रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओंना चाहत्यांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. दरम्यान, नुपूर आणि स्टेबिनच्या संगीत समारंभातील 'लॉलीपॉप लागलेलू' या लोकप्रिय भोजपुरी गाण्यावर बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि अभिनेता वरुण शर्मा यांचा डान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगानं व्हायरल झाला आहे. या गाण्यामुळं आणि डान्सनं समारंभाच्या भव्यतेत भर वाढली आहे. या समारंभात अनेक स्टार्स आले होते.
संगीत समारंभ : नुपूर सेनॉन आणि स्टेबिन बेनच्या संगीत समारंभात क्रिती आणि वरुणचा नृत्याचं सादरीकरण हे खूप विशेष होतं. या चित्रपटामध्ये त्यांनी उत्सवाच्या संध्याकाळी आपल्या नृत्यानं धमाका केला. 'लॉलीपॉप लागलेलू' या गाण्यावर क्रिती आणि वरुणचं नृत्य इतकं आकर्षक आहे, की त्याच्या डान्सला अनेकजण पसंत करत आहे. याशिवाय सोशल मीडियावर त्यांच्या डान्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. वरुण हा काळ्या रंगाच्या डिझायनर शेरवानीमध्ये असून तो यामध्ये देखणा दिसत आहे. दुसरीकडे क्रिती लेहेंग्यात खूपच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमामध्ये क्रिती आणि नुपूर सेनॉननं तिच्या गर्ल गँगबरोबर मजा केली, दुसऱ्या क्लिपमध्ये वधू आणि वर 'गल्लान गुडियाँ'वर एकत्र नाचताना दिसले.
नुपूर सेनॉन आणि स्टेबिन बेन कधी लग्न करणार? : याशिवाय आणखी एका व्हिडिओमध्ये नुपूर आणि क्रिती तिच्या गर्ल गँगबरोबर 'सजनजी वारी वारी'वर मजेदार सादरीकरण करताना दिसत आहे. तसेच आणखी हळदीच्या व्हिडिओनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे, यामध्ये क्रिती सेनॉन, नुपूर सेनॉन आणि स्टेबिन बेन सर्वाधिक चर्चेत आहेत. हे तिघेही ढोलाच्या तालावर उत्साहानं नाचताना दिसले. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनच्या बहीण नुपूरच्या लग्नाच्या उत्सवांना उदयपूरमध्ये सुरुवात झाली आहे. नुपूर आणि गायिक स्टेबिन बेन 11 जानेवारी रोजी लेक सिटीमधील रॅफल्स हॉटेलमध्ये सात फेरे घेणार आहे. सध्या हे लग्न खूप चर्चेत आहे.
हेही वाचा :

