ETV Bharat / entertainment

क्रिती सेनॉनची बहीण नुपूर अडकणार लग्नबंधनात, 'या' दिवशी घेणार सात फेरे...

क्रिती सेनॉनची बहीण उदयपूरमध्ये लग्न करणार आहे. आता तिच्या लग्नाबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू आहेत.

Nupur Sanon, Kriti Sanon and Stebin Ben
नुपूर सेनॉन, क्रिती सेनॉन आणि स्टेबिन बेन (Source : Social Media)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 5, 2026 at 4:55 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

उदयपूर : तलावांचे शहर असलेले उदयपूर पुन्हा एकदा एका भव्य लग्नाचे साक्षीदार होत आहे. यावेळी स्पॉटलाइट एका आंतरराष्ट्रीय उद्योगपतीवर नाही तर संगीत आणि चित्रपट उद्योगातील एका प्रसिद्ध जोडप्यावर आहे. प्रसिद्ध गायका स्टेबिन बेन आणि अभिनेत्री नुपूर सेनॉन 11 जानेवारी रोजी उदयपूरमध्ये लग्न करणार असल्याचं समजत आहे. या लग्नाची आता गोपनीयता बाळगण्यात आली आहे. स्टेबिन आणि नुपूर यांनी लग्न पूर्णपणे कुटुंब आणि अगदी जवळच्या मित्रांपुरते मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय उदयपूरमधील समारंभात चित्रपट आणि संगीत उद्योगातील निवडक व्यक्ती उपस्थित राहतील. तसेच कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था देखील विशेष कडक असेल.

नुपूर सेनॉन घेणार सात फेरे : अभिनेत्री क्रिती सेनॉनची धाकटी बहीण नुपूर सेनॉन हिने अलीकडेच सोशल मीडियावर एंगेजमेंट फोटो शेअर करून तिच्या नात्याला अधिकृत केलं होतं. यानंतर क्रितीनं देखील या प्रसंगी भावनिक प्रतिक्रिया शेअर करत म्हटलं होतं की, ती या लग्नात स्वतःला रडण्यापासून रोखू शकणार नाही. नुपूर सेनॉनचं लग्न हे उदपूरमधील पूर्णपणे खाजगी असेल. याशिवाय मुंबईमध्ये इंडस्ट्रीतील मित्रांसाठी एक भव्य रिसेप्शनचे नियोजन करण्यात येणार आहे. हे रिसेप्शन 13 जानेवारी रोजी होणार असल्याचं आता म्हटलं जात आहे. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि संगीत उद्योगातील अनेक प्रमुख व्यक्ती उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

नुपूर सेनॉनचं वर्कफ्रंट : दरम्यान नुपूरच्या कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर, तिनं 2019 मध्ये बी प्राकच्या सुपरहिट म्युझिक व्हिडिओ, 'फिलहाल'पासून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं, यामध्ये तिच्याबरोबर अक्षय कुमार होता. यानंतर तिनं , 'फिलहाल 2' आणि 'पॉप कौन'मध्ये काम केलंय. यानंतर तिनं तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं. आता ती लवकरच 'नूरानी चेहरा' या हिंदी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. स्टेबिन बेन हा संगीत उद्योगातील एक प्रसिद्ध नाव आहे. 2018 पासून सक्रिय असलेल्या स्टेबिननं अनेक बॉलिवूड चित्रपट आणि अल्बममध्ये आपला आवाज दिला आहे. आता, तो त्याच्या लग्नामुळं चर्चेत आहे.

हेही वाचा :

  1. क्रिती सेनॉन आणि धनुष अभिनीत 'तेरे इश्क में' होईल 'या' दिवशी ओटीटीवर रिलीज...
  2. धनुष आणि क्रिती सेनॉन स्टारर 'तेरे इश्क में'नं केली बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी धमाकेदार कमाई...
  3. 'तेरे इश्क में'चं ट्रेलर रिलीज, चित्रपटातील ७ संवाद तुम्हाला करणार घायाळ...