'वेलकम टू द जंगल' विनोदी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ...
'वेलकम टू द जंगल' या विनोदी चित्रपटाचा ट्रेलर हा रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाचा ट्रेलर हा खूप मजेशीर आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : June 11, 2026 at 5:12 PM IST
हैदराबाद :'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर 11 जून रोजी यशराज फिल्म स्टुडिओमध्ये एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट 'वेलकम' फ्रँचायझीमधील तिसरा भाग आहे. या चित्रपटाची मोठी स्टारकास्ट आहे. आता, ट्रेलरबद्दलच्या नवीन माहितीमुळं अक्षय कुमारच्या या विनोदी चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. गुरुवारी, अक्षय कुमारनं 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिलंय, 'तणाव दूर करा, जंगलातील धम्माल सुरू होते. तुमच्या सर्व चिंता दूर करण्यासाठी, तणाव कमी करणाऱ्या 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर आला आहे. 'वेलकम टू द जंगल'- गोंधळ सुरू होतोय, चित्रपटगृहांमध्ये 26 जून रोजी.'
'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर कसा आहे : 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर 4 मिनिटे आणि 10 सेकंदांचा असून, यामध्ये, गोंधळ आणि संभ्रम पाहायला मिळत आहे. 'भारतातील पहिला 2000 कोटींचा बनावटी चित्रपट' या वाक्यानं ट्रेलरची सुरुवात होते. यानंतर संपूर्ण कलाकारांचा समावेश असलेले एक अनोखे इंट्रोडक्शन गाणे येते. त्यानंतर परेश रावल अक्षय कुमारच्या पात्राची ओळख करून देण्यात येते. अक्षय सुरुवातीला एक अव्वल दर्जाचा नायक असतो, पण नंतर तो फ्लॉप स्टार म्हणून ओळखल्या जातो. ट्रेलरमधून हे उघड केले जाते की, 'वेलकम 3'मधील सुनील शेट्टी आणि अर्शद वारसी यांनी साकारलेली प्रसिद्ध पात्रे उदय आणि मजनू यांची भाऊ आहेत. दरम्यान यावेळी अक्षय कुमार आणि त्याची संपूर्ण टीम एकत्र येऊन चित्रपटाला मजेशीर बनवणार आहे.
'वेलकम टू द जंगल'ची स्टार कास्ट : ट्रेलरमध्ये एक गाव दाखवले आहे, जिथे गावकरी स्वत:ला मुक्त करण्यासाठी सैन्याची वाट पाहत असते. चित्रपटाचे शूटिंग त्यांच्याच गावात होणार असते. दरम्यान शूटिंगमधील कलाकारांचे लूक सैन्याच्या गणवेशात असते. गावकऱ्यांचा विश्वास आहे की, त्यांचे गाव मुक्त करण्यासाठी खरे सैन्य आले आहे. खलनायकाची भूमिका साकारणारा जॅकी श्रॉफ आपल्या दरोडेखोरांसह गावात प्रवेश करतो आणि गोळीबार सुरू करतो. यावेळी अक्षय कुमार आणि त्याची संपूर्ण स्टारकास्ट त्याच्यासमोर विनवणी करताना दिसते. अक्षय कुमार फेक चित्रपटाचा एक महत्त्वाचा भाग असतो. दरम्यान बऱ्याच काळानंतर अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांचे पुनर्मिलन या चित्रपटामध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटामध्ये हे तिन्ही कलाकार त्यांची जुनी केमिस्ट्री पुन्हा जिवंत करताना दिसत आहे. दरम्यान या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये 'हेरा फेरी'मधील त्यांच्या प्रसिद्ध त्रिकुटाच्या आठवणी ताजी झाली आहे. या चित्रपटामध्ये अर्शद वारसी, रविना टंडन, दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, लारा दत्ता, जॅकी श्रॉफ, जॉनी लिव्हर, राजपाल यादव, श्रेयस तळपदे, तुषार कपूर, कृष्णा अभिषेक, किकू शारदा आणि दलेर मेहंदी यांनीही विशेष भूमिका साकारली आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट 26 जून 2026 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होईल.

