सनी देओल स्टारर 'बॉर्डर 2'मधील 'या' चार सुंदरींना भेटा, जाणून घ्या भूमिका...
'बॉर्डर' हा चित्रपट 1997मध्ये प्रदर्शित झाला होता. आता 28 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल प्रदर्शित होणार आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : January 3, 2026 at 5:36 PM IST
मुंबई : चित्रपट निर्माते जे.पी. दत्ता यांचा 1997चा चित्रपट 'बॉर्डर' हा खूप गाजला होता. 1997च्या लोंगेवालाच्या लढाईवर आधारित, या चित्रपटातील धैर्य, देशभक्ती आणि बलिदान दाखविले गेले होते. आता या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार आहे. दरम्यान 'बॉर्डर' चित्रपटात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, तब्बू, राखी गुलजार आणि इतर अनेक कलाकारांनी सुंदर अभिनय केला होता. आता, जवळजवळ 28 वर्षांनंतर, 'बॉर्डर 2' हा चित्रपट नवीन पिढीसह पुन्हा जागृती करण्याच काम करण्यासाठी सज्ज आहे. अनुराग सिंग दिग्दर्शित,'बॉर्डर 2' नवीन चेहऱ्यांसह प्रेक्षकांना भेटीला येणार आहे.
'बॉर्डर'मधील कलाकार
- सनी देओल - लेफ्टनंट कर्नल फतेह सिंग कालेर
- सुनील शेट्टी - (छोटी भूमिका) असिस्टंट कमांडंट भैरों सिंग राठोड, एसएम, लोंगेवाला युनिटमध्ये तैनात असलेले बीएसएफ अधिकारी.
- अक्षय खन्ना - (कॅमियो भूमिका) सेकंड लेफ्टनंट धरमवीर सिंग भाकरी, युद्धादरम्यान सेकंड-इन-कमांड.
- सुदेश बेरी - नायब सुभेदार मथुरा दास, एसएम, लोंगेवाला युद्धात सहभागी झालेला सेक्शन लीडर.
'बॉर्डर 2'मधील 8 नवीन चेहरे आणि कोण कोणाची भूमिका साकारते?
- मेजर होशियार सिंग दहियाच्या भूमिकेत - वरुण धवन
- फ्लाइंग ऑफिसर निर्मल जीत सिंग सेखोनच्या भूमिकेत - दिलजीत दोसांझ
- भारतीय नौदलातील अधिकारी लेफ्टनंट कमांडर एमएस रावतच्या भूमिकेत - अहान शेट्टी
- निशान सिंगच्या भूमिकेत - परमवीर चीमा
'बॉर्डर 2'मधील अभिनेत्री
मोना सिंग फतेहची पत्नी : जस्सी जैसी कोई नहीं या टीव्ही मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेली मोना सिंग आता बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिनं हिंदी चित्रपटसृष्टीतील काही मोठ्या स्टार्सबरोबर काम केलं आहे. ती या चित्रपटात फतेह सिंग (सनी देओल)च्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
होशियारची पत्नी धनो देवी म्हणून मेधा राणा : 26 वर्षीय मेधा राणा ही एक उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती 2022 च्या 'लंडन फाइल्स' या चित्रपटामुळं प्रसिद्धीझोतात आली आहे. ती 'फ्रायडे नाईट प्लॅन्स', 'डान्सिंग ऑन द ग्रेव्ह' आणि 'इश्क इन द एअर' सारख्या चित्रपटांमध्येही दिसली आहे. मेधा या चित्रपटात होशियार (वरुण धवन)च्या पत्नीची भूमिका साकारणार आहे.
सोनम बाजवा - मनजीत कौर, निर्मलची पत्नी : सोनम बाजवा ही पंजाबी चित्रपटसृष्टीतील एक स्टार अभिनेत्री आहे आणि तिनं अनेक हिट पंजाबी चित्रपट दिले आहेत. तिनं 2025 मध्ये 'हाऊसफुल 5' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि त्यानंतर 'बागी 4' आणि 'एक दिवाने की दिवानियात' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे. 'बॉर्डर 2' हा तिचा चौथा बॉलिवूड चित्रपट आहे. ती तिच्या पंजाबी चित्रपटातील सह-अभिनेता दिलजीत सिंगची पत्नी निर्मलची भूमिका साकारणार आहे.
अन्या सिंग - रावतची पत्नी : बॉलिवूड अभिनेत्री अन्या सिंग सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तिनं 2013मध्ये 'बजाते रहो' या चित्रपटातून पदार्पण केलं. ती शेवटची ब्लॉकबस्टर चित्रपट 'स्त्री 2'मध्ये दिसली होती. शिवाय, तिनं आर्यन खानच्या 'द बॅडीज ऑफ बॉलिवूड'मध्ये सान्याची भूमिका साकारली होती.
'बॉर्डर 2'मधील 'घर कब आओगे' गाणं : चित्रपट निर्मात्यांनी अलीकडेच 'घर कब आओगे' हे लोकप्रिय गाणे 'संदेसे येते हैं'ची नवीन आवृत्ती प्रदर्शित केली. 2 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेले हे नवीन गाणे मिथून यांनी संगीतबद्ध केलं आहे आणि मनोज मुंताशीर यांनी गीत लिहिली आहेत. हे गाणं सोनू निगम, अरिजीत सिंग, रूप कुमार राठोड, विशाल मिश्रा आणि दिलजीत दोसांझ यांनी गायलं आहे. 1998 मध्ये सर्वोत्कृष्ट गीतांसाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणारे जावेद अख्तर यांनी 'संदेसे येते हैं' 'बॉर्डर'साठी लिहिलं होतं.
'बॉर्डर 2'बद्दल मनोरंजक तथ्ये
पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिर अभिनीत 'सरदार जी 3'मध्ये दिलजीत दोसांझ दिसला होता. पहलगाम हल्ल्यानंतर, पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची मागणी पुन्हा सुरू असताना भारतीय अभिनेत्यानं पाकिस्तानी अभिनेत्रीबरोबर काम केलं होतं, त्यामुळं दिलजीतवर टीका करण्यात आली होती. त्याला 'बॉर्डर 2'मधून वगळले जाईल असा अंदाज लावला गेला होता. आता तो 'बॉर्डर 2'च्या कलाकारांच्या यादीत आहे.
दमदार डायलॉग, 'आवाज कहां तक जानी चाहिए? लाहौर तक, ' हा डायलॉग चित्रपटाची शूटिंग सुरू असताना सेना शिविरमध्ये आर्मी कॅम्पमध्ये कॅडेट्सना प्रेरणा करण्यासाठी एका प्रशिक्षकानं म्हटले होते.
बॉर्डर 2 ची कथा, बजेट आणि प्रदर्शन तारीख : 'बॉर्डर 2' हा 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कथांवर आधारित आहे. हा चित्रपट तरुण भारतीय सैनिकांच्या धाडस आणि एकतेवर तसेच भूसेना, हवाई दल आणि नौदलातील त्यांच्या बलिदानावर प्रकाश टाकतो. दरम्यान चित्रपटाचे बजेट 150-250 कोटींच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात आले आहेत. 'बॉर्डर 2'या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं 23 जानेवारी 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :

