मीरा राजपूतनं पती शाहिद कपूर आणि तिच्या दोन गोंडस मुलांचा फोटो केला शेअर...
शाहिद कपूरची पत्नी उद्योजिका मीरा राजपूत आता चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावर एक आकर्षक फोटो शेअर केला आहे.

By ETV Bharat Entertainment Team
Published : December 30, 2025 at 5:09 PM IST
मुंबई : बॉलिवूड स्टार शाहिद कपूरची पत्नी उद्योजिका मीरा राजपूतनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा पती, अभिनेता शाहिद कपूर, आणि त्यांची दोन गोंडस मुले, मिशा आणि झैन एकत्र दिसत आहेत. या फोटोमध्ये शाहिद नदीच्या काठावर उभे राहून आपल्या दोन्ही मुलांना सुंदर निसर्गरम्य दृश्य दाखवण्यात मग्न असल्याचे दिसत आहे. मिशा आणि झैन दोघेही आपल्या वडिलांकडे काळजीपूर्वक पाहत असून त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत आहेत. आता मीरानं शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. मीरा ही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, ती अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबरची फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
मीरा राजपूतनं शेअर केला फोटो : दरम्यान मीरा आणि शाहिद यांना त्यांची मोठी मुलगी मिशा ही ऑगस्ट 2016मध्ये झाली होती. यानंतर त्यांचा मुलगा झैन सप्टेंबर 2018मध्ये झाला होता. दरम्यान या जोडप्याच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर शाहिद आणि मीरा यांचं लग्न हे 7 जुलै 2015 रोजी गुरुग्राममध्ये खूप भव्य पद्धतीनं झालं होतं. त्यांचा हा विवाह कौटुंबिक होता, यामध्ये जवळचे मित्रमंडळी देखील उपस्थित होते. शाहिद हा त्याच्या लग्नानंतर खूप चर्चेत होता. दरम्यान याशिवाय काही दिवसापूर्वी मीरानं आपल्या जुन्या आठवणींचा उजाळा देत मुलगी मिशा आणि तिच्या आजीच्या घरी केलेल्या पहिल्या सहलीची आठवण सांगितली होती. तसेच मिशा आणि झैन हे आपल्या वडिलांबरोबर मस्ती करताना दिसतात.

मिशानं लावला होता बेकिंग स्टॉल : याशिवाय अनेकदा शाहिद देखील आपल्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. दरम्यान नोव्हेंबरमध्ये मीरानं इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या 8 वर्षाच्या मुलीनं म्हणजेच मिशानं स्वत:चा बेकिंग स्टॉल लावला होता, याबद्दल सांगितलं होतं. याशिवाय मिशाचे काही तासाच कुकीज आणि मफिन्स विकले गेले, हेही तिनं अभिमानानं सांगून तिचे कौतुक केले होते. तिनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं, 'आज माझ्या मुलीचा खूप अभिमान वाटतो! मिश मॅश बेकरी कुटुंबातील सर्वात तरुण संस्थापक. ' या पोस्टमध्ये मीरानं ओट्स अँड रेझिन्स आणि डीप डिश चोको चिप यांसारख्या चविष्ट कुकीजच्या चित्रांची झलक देखील शेअर केली होती. या चविष्ट कुकीजची किंमत प्रत्येकी 200 रुपये होती. दरम्यान शाहिदच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तो पुढं 'ओ'रोमियो' आणि 'कॉकटेल 2' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.
हेही वाचा :

