ETV Bharat / entertainment

दिलीप प्रभावळकर स्टारर 'दशावतार' ऑस्कर 2026च्या नामांकन यादीत सामील...

दिलीप प्रभावळकर, अभिनय बेर्डे, महेश मांजरेकर आणि भरत जाधव यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'दशावतार' हा चित्रपट ऑस्कर 2026च्या स्पर्धेत सामील झाला आहे.

Dashavatar movie
'दशावतार' चित्रपट (पोस्टर)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : January 5, 2026 at 2:06 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : 'दशावतार' हा चित्रपट ऑस्कर नामांकन यादीत अधिकृतपणे निवडलेला पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुबोध खानोलकर यांनी केलं आहे. दरम्यान हा चित्रपट ऑस्कर यादीत असल्याचं रविवारी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगण्यात आलं होतं. याबद्दल घोषणा करताना चित्रपटाच्या निर्मात्यांना खूप आनंद झाला होता. ऑस्कर स्क्रीनर्स रूममध्ये प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट बनून 'दशावतार'नं आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. हा चित्रपट आता अकादमीचे सदस्य पाहतील, त्यानंतर मतदान होईल. दरम्यान दिग्दर्शक खानोलकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं की, "हे संपूर्ण टीमच्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीचे प्रतीक आहे. अकादमी पुरस्कारांसाठी अधिकृत शॉर्टलिस्टमध्ये या चित्रपटाचा समावेश करण्यात आला आहे, जो मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे."

ऑस्करमध्ये 'दशावतार' सामील : तसेच ऑस्कर शॉर्टलिस्ट जगभरात सादर झालेल्या 2000हून अधिक चित्रपटांमधून संकलित केले आहे, यापैकी फक्त 150 ते 250 चित्रपट विविध श्रेणींमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात येते. या यादीत स्थान मिळवणे हे ऑस्कर मूल्यांकन प्रक्रियेतील पहिले औपचारिक पाऊल असते. दरम्यान 'दशावतार'ची उत्कृष्ट कथा आणि उत्कृष्ट निर्मितीमुळं या मराठी चित्रपटला ऑस्कर 2026च्या शॉर्टलिस्टमध्ये स्थान मिळाले आहेत. तसेच अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसनं जाहीर केलेल्या यादीत समावेश असल्यानं मराठी चित्रपटसृष्टीत सध्या आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. आता हा चित्रपट ऑस्करमध्ये भारताची शान वाढविण्यासाठी सज्ज आहे.

'दशावतार'ची स्टारकास्ट : पहिल्यांदाच ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये एका मराठी चित्रपटाचा समावेश झाला आहे. आता ही भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक मोठी कामगिरी मानली जात आहे.'दशावतार' या मराठी चित्रपटाचा या विशेष आंतरराष्ट्रीय ऑस्कर शॉर्टलिस्टमध्ये समावेश झाल्यानं या चित्रपटाची टीम देखील खूप खुश झाली आहे. ऑस्करसाठी जगभरातून सादर केलेल्या लाखो चित्रपटांमधून फक्त सर्वोत्तम चित्रपटांची निवड केली जाते. दरम्यान या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिलीप प्रभावळकर आहे. याशिवाय चित्रपटामध्ये सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केनकरे, सुनील तावडे आणि इतर कलाकारांनी देखील महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

हेही वाचा :

  1. ‘दशावतार’ कथा कोकणची, व्यथा संपूर्ण महाराष्ट्राची!! - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे
  2. 'दशावतार'नं केली रुपेरी पडद्यावर धमाकेदार कमाई, वाचा सविस्तर...
  3. मराठी चित्रपटसृष्टीत भव्यतेचं नवं पर्व घेऊन येणाऱ्या ‘दशावतार’ चित्रपटाचं जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित